सोयगाव तालूक्यातील गलवाडा येथे रविवार ता.१६ मकरसंक्रांतनिमित्त हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन गलवाडा गावच्या मा.सरपंच सुरेखाताई भारत तायडे,मंजुळाबाई इंगळे,राधाबाई औरंगे,अशाबाई इंगळे यांनी केले होते यावेळी स्वामी महिला बचत गटाच्या अध्यक्षा राधाबाई औरंगे,उपाध्यक्ष अशाबाई इंगळे, सिंधुबाई औरंगे,महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंजुळबाई इंगळे,उपाध्यक्ष कोकीलाबाई इंगळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर बचत गटाच्या अध्यक्ष मायाबाई जगताप,उपाध्यक्ष कविताबाई वाघ, मा.सरपंच सुरेखाताई तायडे,पूनम तळेले,पो. कॉ.कविता मिस्तरी, ग्रा.प.सदस्य सुशीला इंगळे,शारदाबाई पाटील,अनुसायबाई आरके,मनीषा मोरे, मीनाबाई सोनवणे,योगिता तायडे,प्रमिलाबाई सुरडकर,पुष्पाबाई सोनवणे,लक्ष्मीबाई सोनवणे,इंदूबाई इंगळे,संगीताबाई बिऱ्हारे, अंजनाबाई घन, सिंधुबाई बिऱ्हारे, अलकाबाई वाकडे, कविताबाई कांबळे,रुपाली इंगळे,पुष्पाबाई तायडे, यांच्यासह …
Author: saimat team
चाळीसगाव (वार्ताहार)-आज दिनांक 16 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात चाळीसगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठक आयोजित कण्यात आली होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच खरजई गावचे दिपक शेटे व माळशेवगा गावचे रमेश पाटील यांना तालुक्याची जबाबदारी द्यावी कारण त्यांचे समाजकार्य आम्ही जवळून बघितले आहे. असे मत मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांना चाळीसगाव शहर मराठा महासंघ च्या वतीने विनंती करण्यात आली. त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्हाध्यक्ष भोसले यांनी *चाळीसगावतालुकाध्यक्षपदी दीपक शेटे, चाळीसगाव तालुका संघटक पदी रमेश पाटील यांना नियुक्ती पत्र देऊन दिपक शेटे, रमेश पाटील यांना पुढील…
पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पुणे मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या कामांची संपूर्ण माहिती जाणून घेत अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. शरद पवार यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा संपूर्ण आढावा जाणून घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचे काम कुठपर्यंत पोहचले? उरलेले काम कधीपर्यंत पूर्ण होईल? कामात काही अडचण येत आहे का? मेट्रोच्या कामासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आदी माहिती या अधिकाऱ्यांकडून पवारांनी जाणून घेतली. दरम्यान, यावेळी पवारांनी फुगेवाडी ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे…
अमरावती, वृत्तसंस्था । अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक पुतळा हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. दर्यापूर येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने हटवत कारवाई केली आहे. शिवसेनेकडून हा पुतळा बसवण्यात आला होता. याआधी शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये परवानगी नसतानाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं पुतळा हटवण्याची कारवाई केली. आमदार रवी…
भारतीय बाजारात जगभरातील टेक कंपन्या आपल्या स्मार्टफोन्स सादर करत आहेत. नवनवीन फोन्सला भारतीय ग्राहकांची प्रचंड मागणी पाहायला मिळत आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या दरआठवड्याला एंट्री लेव्हल स्मार्टफोनपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करत आहेत. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले फोन्स उपलब्ध आहेत. तुमचे बजेट थोडे अधिक असल्यास फ्लॅगशिप स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. जवळपास ५० हजारांच्या बजेटमध्ये OnePlus 9RT, OnePlus 10 Pro 5G, Realme GT 2, Samsung Galaxy S21 5G आणि Vivo X70 Pro या फोन्सला खरेदी करू शकता. यातील काही फोन्स भारतात काही दिवसांपूर्वीच लाँच झाले आहेत. या फोनमध्ये शानदार डिस्प्ले, पॉवरफुल…
आज आम्ही त्या १० कार संबंधी माहिती देत आहोत. ज्याला देशात सर्वात जास्त खरेदी केले जात आहे. डिसेंबर महिन्यात टॉप १० बेस्ट सेलिंग कारची (best selling cars in india) यादी समोर आली आहे. गेल्या महिन्यात Maruti Suzuki WagonR (मारुती सुझुकी वेगनआर) देशातील सर्वात जास्त विकणारी कार राहिली आहे. गेल्या महिन्यात वेगनआरने Maruti Suzuki Baleno (मारुती सुझुकी बलेनो), Tata Nexon (टाटा नेक्सॉन), Maruti Suzuki Ertiga (मारुती सुझुकी अर्टिगा) पासून Maruti Suzuki Alto (मारुती सुझुकी ऑल्टो) आणि Hyundai Venue सारख्या कारला मागे टाकून देशातील सर्वात जास्त विकणाऱ्या कारचा किताब आपल्या नावावर केला आहे. जाणून घ्या डिटेल्स. १. Maruti Suzuki WagonR (मारुती सुझुकी…
उनपदेव हे सातपुडा पर्वत माथाच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि जिल्ह्यात भेट देणाऱ्या दुर्गम धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. सातपुडा पर्वत रांगेतले इतर गरम पाण्याचे झरे म्हणजे सुनपदेव आणि निझारदेव. तीनही ठिकाणे रामायण महाकाव्यात आढळली आहेत आणि अयोध्येतील चौदा वर्षांच्या बहिष्कारानंतर प्रभू राम यांचा स्पर्श आहे. गोड पाणी वर्षभर संपूर्णपणे वाहणारे गाईच्या तोंडून वाहते असे दिसत आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाला आणखी एक परिमाण जोडते. असे म्हटले जाते की गरम पाण्यात त्वचेची कमतरता बरा करण्याची क्षमता आहे. हे पवित्र स्थान रस्तेंद्वारे उत्तम प्रकारे जोडलेले आहे. पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक जळगाव रेल्वे स्थानक आहे
बोदवड, प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीच्या दुसर्या टप्प्यातील निर्णायक क्षणांमध्ये आमदार गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची बोदवड येथे झालेली भेट चर्चेचा विषय बनली आहे. बोदवड नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुध्द चांगलेच रंगले होते. यात नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांची शहरात एकमेकांच्या समोर झालेली सभा प्रचंड गाजली होती. यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. यात आ. गिरीश महाजन यांनी बोलण्याच्या ओघात खडसे यांनी खूप प्रयत्न करून देखील आमचे चंद्रकांत पाटील हे जिंकल्याचे नमूद केले होते. यातील आमचे या शब्दावरून निवडणुकीच्या रणांगणात बर्याच काथ्याकुट करण्यात आला.…
मुंबई, वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या ८ जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. करोनासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे. काल रात्रीच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याची अफवा पसरली होती. मात्र लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने केली आहे. लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवदेनानुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. लतादीदींबाबत खोट्या बातम्या पसरवताना पाहून त्रास होतो. त्यामुळे कृपया लक्षात घ्या की लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. कृपया त्या घरी लवकर परतण्यासाठी प्रार्थना करा, असे ते म्हणाले. लता…
जळगाव- श्री राजपूत करणी सेनेने फक्त राजपूत समाजासाठीच मर्यादित न राहता इतर समाजबांधवांना सुध्दा सोबत घेऊन विविध क्षेत्रात सर्वांसाठी विकासाचे कार्य करावे. सर्व समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन श्री राजपूत करणी सेनेचे राज्याध्यक्ष श्यामसिंग ठाकूर यांनी केले. श्री राजपूत करणी सेनेच्या नूतन पदाधिकऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या सत्कार समारंभ कुसुंबा येथे झाला. याप्रसंगी श्यामसिंग ठाकूर बोलत होते. या संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांची आता राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उज्ज्वला पवार, महिला विभागाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी मनीषा पाटील, युवती प्रदेश अध्यक्षपदी वैशाली साळुंके, महिला प्रदेश संघटकपदी आशा…