Author: saimat team

कुऱ्हाड प्रतिनिधी चेतन साळुंके कुर्‍हाड खुर्द येथे आज सकाळी १५ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण प्रतिबंधक शिबिर पार पडले. सध्या कोरणा चा वाढता प्रादुर्भाव व तिसरी लाट थोपविण्यासाठी शासनाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी, मुले व मुलीसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेशान्वये आज दि.१७ रोजी सकाळी १० वाजता कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात लसीकरण शिबिर

Read More

सोयगाव-प्रतिनिधी  जरंडी च्या कोविड केंद्रात उपचारासाठी असलेले कोरोना बाधित रुग्ण गंभीर लक्षणांची नाहीत या रुग्णांना खोकला सर्दी आणि ताप अशी लक्षणे नसून केवळ घशातील खवखव हाच प्रकार उपचारादरम्यान आढळून आला आहे त्यामुळे तिस-या लाटेची सोयगाव करांनी चिंता करू नये अशी माहिती कोविड वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियदर्शनी पवार यांनी दिली  जरंडी च्या एकमेव तालुक्याच्या कोविड केंद्रात डॉ. प्रियदर्शनी पवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी रुग्णावर उपचार करत असून या रुग्णांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले तालुक्याची रुग्ण संख्या १५ वर गेली असता त्यातील एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे उर्वरित १४ रुग्णांपैकी अकरा रुग्ण होमआयसोलेशन मध्ये असून कोविड वैद्यकीय अधिकारी डॉ.…

Read More

 जामनेर (प्रतिनिधी):-  अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधु पित्यानी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ शोधणे सुरू करण्या अगोदर फक्त एक वेळेस तुम्ही जिथे राहत असत त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोर्टात एक वेळेस फेर फटका मारून या आणि मग घरी येऊन विचार करा की नेमके कसे स्थळ तुम्हाला पाहिजे तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत स्थळ तुम्हाला हवे की सर्वसाधारण असले तरी चालेल परंतु चांगली माणसे हवीत, याचा विचार मुलामुली पालकांकडून आवश्य व्हावा.  सध्या कोर्टात गुन्हेगारांपेक्षा जास्त घटस्फोट घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या जास्त दिसायला लागली आहे, थोडं खोलात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर घटस्फोट का हवा आहे तर खूप मजेशीर उत्तर मिळतात मुलगा व मुलीकडून, मागच्या…

Read More

इंडियन इलेक्ट्रॉनिक ब्रँड Ptron ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टवॉच Ptron FORCE X11 ला लाँच केले आहे. ही एक ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच असून, याची किंमत २,८०० रुपयांपेक्षा कमी आहे. ही वॉच Boat, Fire-Boltt आणि CROSSBEATS च्या वॉचला टक्कर देईल. या वॉचमध्ये १.७ इंच डिस्प्ले, बिल्ट-इन माइक आणि ब्लूटूथ कॉलिंग सारखे फीचर्स मिळतील. Ptron FORCE X11 ची किंमत वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६८ रेटिंगसह येणारी ही वॉच ओनिक्स ब्लॅक आणि स्वेड पिंक रंगात येते. वॉचला अ‍ॅमेझॉन इंडियावरून २,७९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर एक वर्षाची वॉरंटी देखील मिळते. स्मार्टवॉचचे फीचर्स या वॉचमध्ये ब्लूटूथ वी५.१ चिपसेट आणि बिल्ट-इन मायक्रोफोनद्वारे वायरलेस कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजे तुम्ही स्मार्टफोनशिवाय मित्रांशी बोलू…

Read More

वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका मुंबई: कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायुरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल…

Read More

  सोयगाव -प्रतिनिधी  बचत गटाची रक्कम भरणा करण्यासाठी पाचोराकडे जाणाऱ्या सोयगावचं दोघांना पाचोरयाकडून येणाऱ्या भरधाव वाहनाने उडवून झालेल्या समोर समोर अपघातात सोयगावचे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना वरखेडी-अंबेवडगाव रस्त्यावर सायंकाळी घडली. सोयगाव शहरातील नारळीबाग येथील रहिवासी आशा सेविका सौ. सविता काकडे(वय ४०) व विष्णु राजनकर(वय २९) हे दोघे बचतगटाचे पैसे भरण्यासाठी सोयगाव येथून एम.एच.२०/फ,झेड ५९३७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पाचोरा जात असतांना वरखेडी ते अंबे वडगाव दरम्यान वरखेडी येथून जवळच असलेल्या ऑईल मिल जवळ पाचोऱ्याकडून भरधाव येणाऱ्या इको गाडी क्र-एम-एच-०२ सी.झेड-८३९९ जोरदार धडक दिल्याने या अपघातात सौ.सविताबाई  काकडे व विष्णू राजनकर हे जबर जखमी झाले. अपघात घडताच जोरदार आवाज आल्यामुळे याच…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । युवक काँग्रेसच्या वतीने आज डिजिटल मेंबरशिप साठी युवक मेळाव्याचे आयोजन शहरातील काँग्रेस भवन येथे करण्यात आले आगामी काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवकांचे संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार, प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार शिरीषदादा चौधरी व प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील उपस्थित होते. आगामी काळात डिजिटल मेंबरशिप च्या माध्यमातून प्रत्येक घरा घरात युवक काँग्रेस पोहचणार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून डिजिटल मेंबरशिप काँग्रेसची प्रत्येक गावात खेड्यांमध्ये तालुक्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये करायची असून याच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने ‘सुसाईड नोट’मध्ये नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत २६ वर्षीय विद्यार्थी हा मास्टरच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने कॅम्पस इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. पवई पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत विद्यार्थ्यावर नैराश्यावरील उपचार सुरू होते. “आम्हाला सांगण्यात आले आहे की तो काही काळ नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याने त्याच्या खोलीत एक संदेश देखील सोडला आहे की त्याच्या मृत्यूसाठी…

Read More

अबुधाबी, वृत्तसंस्था । येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. अबुधाबी पोलिसांनी माहिती दिली आहे की बंडखोरांनी मुसाफा भागात ड्रोन हल्ला केला. परिसरातील तीन ऑईल टँकरवर ड्रोन टाकण्यात आले. यानंतर तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाची आग अबुधाबी विमानतळापर्यंत पोहोचली. या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, तेल टँकरवर ड्रोनचा स्फोट इतका जोरदार होता की अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागली. मात्र, विमानतळावर…

Read More