Author: saimat team

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खर्चना गावी शेतीशाळा व शेतकरी दिन साजरा करण्यात आला. जामनेर तालुका कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा अंतर्गत शेती शाळा व शेतकरी दिन निमित्त महिला शेतकरी तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांची शेतीशाळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य योगेश भडांगे प्रकाश पाटील किरण खैरनार पोलीस पाटील सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जामनेर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक महाजन आत्मा समन्वयक राकेश पाटील कृषी सहाय्यक गायकवाड किशोर पाटील पी पी पवार सचिन सानप रुपेश बिराडे आदी कृषी अधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना कपाशी मका केळी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । १९ वर्षीय तरुणीचे लग्न मोडण्यासाठी फोटो सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका गावातील तरुणीचे लग्न मोडण्यासाठी तरुणीच्या मित्रासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका गावात १९ तरुणी वास्तव्यास आहे. ती शिक्षण घेत असून तिचे लग्न जुळले आहे. तरुणीचे लग्न तुटावे या कारणाने इन्टाग्रामवर विशूनेमाने हे खाते असलेल्या व्यक्तीने तरुणीचे तिच्या मित्रासोबत फोटो इन्स्टाग्रामवरुन टाकले. तसेच तरुणीचे लग्न जुळलेल्या तिच्या भावी पतीलाही संबंधित फोटो पाठवून तिची बदनामी केली, अशी तक्रार तरुणीने जळगाव सायबर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । बॅटरी चोरी करणारा संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याजवळ असलेली बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून ट्रॅक्टरची बॅटरीची चोरी करणाऱ्या संशयित आरोपी आतीष नरेश भाट रा. नवल कॉलनी जळगाव याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील बॅटरी जप्त करण्यात आली आहे. दिलीप शिवप्रकाश चांगरे (वय- ६०) हे नवल कॉलनी शिंधी कॉलनी शेजारी, जळगाव इथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. चांगरे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. दरम्यान १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर त्यांनी घरासमोर ट्रक्टर पार्किंग करून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भाजपाने जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाच्या दहा पदाधिकाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकात मोर्चा काढला. त्यानंतर टॉवर चौकात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक बॅनर जाळून आंदोलन केले होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना काळात जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन व आंदोलन करण्याची कोणतीही परवानगी नसतांना आंदोलन…

Read More

ढाका, वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह सापडला आहे. ढाक्यातील केरानीगंज येथील एका पुलाजवळ तिचा मृतदेह गोणीत सापडला होता. सोमवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी कदमटोली भागातील अलीपूर पुलाजवळ परिसरातील स्थानिक लोकांनी अभिनेत्रीचा मृतदेह पाहिला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतदेह ताब्यात आल्यानंतर आम्ही कारवाई करत अभिनेत्रीच्या पतीला ताब्यात घेतले आहे,असेही पोलिसांनी सांगितले. शरीरावर अनेक जखमा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. हत्येनंतर रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह रविवारी पुलाजवळ गोणीत फेकून दिला होता. रविवारी शिमू बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कलाबागन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनैसर्गिक…

Read More

यावल, प्रतिनिधी । आज दि.19 बुधवार रोजी यावल नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक तथा आश्रय फाऊंडेशनचे संचालक येथील डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडा सिम येथे सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळाच्या ठिकाणी मोफत/ निशुल्क “ई”-श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास सुरुवात करण्यात आली. सदर अभियानास सावखेडा ग्रामस्थांकडून बहुसंख्येने प्रतिसाद मिळाला.एकूण278 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कुंदन फेगडे,सरपंच सौ.बेबाबाई पाटील.उपसरपंच मुबारक तडवी, वसंत पाटील,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील,भूषण पाटील, कालू तडवी,प्रकाश पाटील, विनोद पाटील,सलीम तडवी, खतीब तडवी,मुबारक तडवी आदींची उपस्थिती होती. सदरील अभियानास दिनेश पाटील,सलीम तडवी सर,सागर लोहार,विशाल बारी,जयवंत माळी,चेतन कापुरे यांचे सहकार्य लाभले.

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती मार्फत विविध विकास कामे जे होत आहे त्यापैकी 95 टक्के विविध बांधकामे ही राजकीय प्रभावामुळे आणि काही ठेकेदारांकडून टक्केवारी वाटप केली जात असल्याने तसेच अनेक ठिकाणी झेरॉक्स ठेकेदाराना,काम करण्याची माहिती नसलेले, आवश्यक यंत्रसामग्री नसलेले काही ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यात यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांची बांधकामे, फुलाची बांधकामे,पुलावरील गटावर ढापे,घरकुले,नाला बांध, पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत विविध कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने नायगाव,किनगाव,पाडळसे येथील मनुदेवी रस्त्यावर भालोद, बामणोद परिसरात किनगाव डांभुर्णी,डोंगर कठोरा,सातोद कोळवद,वड्री…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यालय, रिंग रोड हॉटेल सायली समोरील आमदार राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानाबाहेर तसेच आमदार राजुमामा भोळे यांच्या स्टेडियम कॉम्प्लेक्सजवळील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री बारा वाजता अज्ञात व्यक्तींनी टाटा हॅरिअर चारचाकी वाहनातून येऊन चार महिला व चार पुरुषांनी या ठिकाणी गलिच्छ आणि शिवराळ भाषेत रांगोळीने लिखाण केले आहे. सदर लिखाणातून आमचे नेते खासदार उन्मेश पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजु मामा भोळे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. असून अज्ञात समाजकटंकांविरुद्ध गंभीर कारवाई करून सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे केली आहे. दिलेल्या निवेदन नमूद केले आहे…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील तत्वज्ञान विभाग आणि नवी दिल्ली च्या भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . मोहनभाऊ फालक होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री महेशभाऊ फालक, सचिव – श्री विष्णुभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष – श्री संजयजी नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ .बी .एच. ब-हाटे , उपप्राचार्य डॉ . एस . व्ही .पाटील ,उपप्राचार्य डॉ . एन . ई . भंगाळे ,उपप्राचार्य डॉ . ए . डी . गोस्वामी .…

Read More

अरुणाचलप्रदेश, वृत्तसंस्था । अरुणाचल प्रदेशचे खासदार तापिर गाओ यांनी काल एक धक्कादायक दावा केलाय. चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मी म्हणजेच पीएलएने भारताच्या हद्दीमध्ये येऊन सियांग जिल्ह्यामधील एका 17 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचे गाओ यांनी म्हटलेय. गाओ यांनी अपहरण झालेल्या मुलाचे नाव मिराम तरोन असे असल्याचाही दावा केलाय. गाओ यांच्या सांगण्यानुसार चिनी लष्कराने सियुंगला क्षेत्रामधील लुंगता जोर परिसारमधून या मुलाचं अपहरण केलेय. यापूर्वीही चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळच्या भागांमध्ये घुसखोरी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गाओ यांनी लोअर सुबनसिरी जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयामधून फोनवर पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये, पीएलएच्या तावडीतून वाचलेला तरोनचा मित्र जॉनी यइयिंगने स्थानिक अधिकाऱ्यांना अपहरणासंदर्भातील माहिती दिल्याचा दावा केलाय. अपहरण करण्यात…

Read More