चोपडा प्रतिनिधी संदीप ओली येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा विजय पाटील, प्रमुख अतिथी डॉ. प्राजक्ता भामरे, प्राचार्य राजेंद्र महाजन, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, एन. एस. सोनवणे, प्रा. डी. एस. पाटील, डॉ. ए. एल. चौधरी, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा परीक्षक डॉ. एस.आर. पाटील, डॉ. लालचंद पटले, डॉ. हनुमंत सदाफुले तसेच चित्रकला परीक्षक प्रा. सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, पालक प्रतिनिधी दीपक सोमाणी, धनराज पाटील, संदेश क्षीरसागर,…
Author: saimat team
चाळीसगाव(प्रतिनिधी)- संपूर्ण भारतात लोककला शाहिरी क्षेत्रात “डि.लीट. पदवी (डॉक्टरेट) प्राप्त एकमेव शिवशाहिर, चित्रकार, शिल्पकार, सिनेमा व सिरियल कलाकार, लेखक, कवी, तसेच छत्रपती शिवाजीराजे अभ्यासक व्याख्याते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व बहुआयामी व्यक्तिमत्त्व व शतावधानी कलाकार शिवशाहीर डॉ राजुजी राऊत यांनी चाळीसगाव येथील ” सिंहगड” या निवासस्थानी व “भालेराव फर्निचर” शोरुम — येथे सदिच्छा दिली यावेळी शिवशाहीर शामराव खडके सर – शिक्षण क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शाहिर (कोल्हापूर) तसेच श्रीमती इंदुमती गोविंद भालेराव संजय गोविंद भालेराव नगरसेविका सविता राजपूत रंजना पाटील प्राध्यापक आर् एम पाटील तुषार महाजन पत्रकार आरडी चौधरी जिजाबराव वाघ कवी रमेश पोद्दार लालचंद बजाज अजय विसपुते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित…
गुरुवार ३ मार्च रोजी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत संचार करेल. या दिवशी कुंभ राशीतून जाणारा चंद्र मीन राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल. पण त्यांना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागेल. चंद्राचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांना प्रेम जीवनात आनंद देईल, पाहा गणेशाच्या कृपेने आजचा दिवस कसा जाईल. मेष : आयुष्यातील त्रास दूर होईल आणि घराच्या देखभालीशी संबंधित कामाकडे लक्ष दिले जाईल. तुमच्या जवळच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या रागावर आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रलंबित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाच्या प्रचंड ताणामुळे थकवा जाणवेल. यासोबतच तुमच्या प्रमोशनची शक्यताही वाढेल. कुटुंबात प्रेम आणि आनंदी सुसंवाद राहील. प्रेमाच्या…
साई,
???? तोंडातले छाले तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी. कथ्या बरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात. जीभेवर छाले झाल्यास एक केळे गाईच्या दुधा बरोबर खावे. काहीं दिवस घेतल्यास छाले बरे होतात. ???? हिरडयांतुन रक्त येणे मीठ, हळद, आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे फार गरम किंवा फार थंड पेय घेऊ नये. गाजर, सफरचंद, आवळा यासारखी फळे खावीत. ???? दात हलणे तिळाच्या तेलात काळे मीठ वाटून हिरड्यांवर चोळल्याने दात हलायचे बंद होतात. ???? दात दुखणे दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून द्यावे. वेदना बंद होतील.…
जळगाव:- भारतीय कंपनी सचिव संस्थान यांनी नुकत्याच घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी (सी. एस) परीक्षेत वीणा नारखेडे या उत्तीर्ण झाल्या. सीए पदम पाटील आणि सीए करण काबरा यांच्या मार्गर्शनाखाली वीणा यांनी कंपनी सेक्रेटरी हा कोर्स यशस्वी रित्या पूर्ण केला. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेत देखील वीणा यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. वीणा या साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांची नात तसेच सुहास आणि प्रिया नारखेडे यांची कन्या आहे.
चाळीसगाव प्रतिनिधी मुराद पटेल शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसिल कार्यालयाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाला चाळीसगाव मतदारसंघाचे जनसेवक आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून नवचैतन्य प्राप्त झाले. लोकप्रतिनिधी व प्रशासन एकत्र आले तर काय सकारात्मक बदल होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे सदर चौंक सुशोभीकरण काम होय.!!! आमदार मंगेश चव्हाण यांच्या निधीतून १६ लाख रुपये खर्चून झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौक व तहसीलदार कार्यालय – चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.२६/०२/२०२२ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता संपन्न होणार आहे. यानिमित्ताने जेष्ठ विचारवंत तथा सावरकर अभ्यासक प्रकाशजी पाठक यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर…
मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरांवरून याचे कौतुक करण्यात येत आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल १० कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटानं शुक्रवारी १.५ कोटींची कमाई केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, बाजीप्रभूंच्या भूमिकेत असलेल्या अजय पुरकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दुसरीकडे समीर धर्माधिकारी यांनी सिद्दी जौहरची भूमिका उत्तम वठवली आहे. सिद्दी मसूदच्या भूमिकेत असलेला आस्ताद काळे यानेही चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडू आणि चंदीगड दरम्यानचा गुवाहाटी येथे सुरू असलेला सामना इंद्रजीत आणि अपराजीत बाबा ह्या जुळ्या भावंडांनी स्पेशल बनवला आहे. ह्या दोघांनी तामिळनाडूच्या पहिल्या डावात शतकं झळकावली आणि एकाच डावात शतकं झळकावणारी ही जुळ्या भावांची केवळ तिसरीच जोडी ठरली. बाबा भावंडांच्या आधी आॕस्ट्रेलियाचे स्टीव्ह आणि मार्क वाॅ हे आणि न्यूझीलंडचे जेम्स आणि हमीश मार्शल ह्या जुळ्या भावांनी असा पराक्रम केलेला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मात्र पहिल्यांदाच जुळ्या भावांनी एकाच डावात शतकं झळकावली आहेत. इंद्रजीत हा 127 धावा काढून बाद झाला तर अपराजीत हा दुसऱ्या दिवशी उपहारावेळी 144 धावावर नाबाद आहे. 8 जुलै 1994 अशी या दोन्ही भावांची…