जळगाव ( प्रतिनिधी)- सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे पालक यांना झेंडा फडकवण्याचा मान देण्यात आला. भगवान जगताप ,दिपाली जगताप यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर अजय बारी ,शशिकला बारी यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. विद्यार्थ्यांनी थर्माकोलच्या मनी पासून तिरंगा साकार केला तसेच रंग भरण करून तिरंगा सादर केला तसेच वेशभूषेमधून शुभेच्छा व्यक्त केल्या. या उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांचे लाभले. सहकार्य संस्थेच्या संचालिका प्रतीक्षा पाटील प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरे तसेच सर्व शिक्षक…
Author: saimat team
जळगाव:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थितांना शुभेच्छापर भाषणात पालकमंत्री पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोना सारख्या साथरोगाने ग्रासले असतांना सुद्धा जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासन व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य व सामंजस्य दाखवल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण न होता प्रगती अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करुन जिल्हावासियांचे आभार मानले. ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून महत्वाकांक्षी जलजीवन मिशन सुरु करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विकासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा मिळत असून डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावलेले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध विकासकामांचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले. प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व…
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरुवातीला सकाळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ध्वजारोहण करीत ध्वजाला सलामी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. रामानंद यांनी, उपस्थित वैद्यकीय यंत्रणेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर्सपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वच घटकांनी सर्वोत्तम कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीत देखील खंबीरपणे उभे राहत केलेली रुग्णसेवा हि प्रशंसनीय आहे, असेही डॉ. रामानंद म्हणाले. यावेळी दोन्ही उप…
जळगाव : येथील अंजूमन खिदमते खल्क संचलित के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ७३ वा गण तंत्र दिवसा निमित्त संस्था सदस्य जाहीद भाई शाह यांच्या हस्ते संपन्न झाला.या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भारतीय संविधान ने जनतेला दिलेले अधिकार जागतिक पातळीवर उल्लेखनीय आहे. तर मुख्याध्यापक अकिल खान यांनी या दिनाचा परिचय करून सुभेच्छा व्यक्त केली. सुत्रसंचालन मझहरुदिन शेख व झाकीर शाह यांनी केली. या वेळी गाईड विभागा तर्फे गाईड ध्वजारोहण ही करण्यात आले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासकीय नियमानुसार सामाजिक आंतर ठेउन कार्यक्रम पार पडले.
जळगाव : येथील ईकरा शिक्षणं संस्था संचलित एच जे थीम कॉलेज कॅम्पसमध्ये 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इकरा शिक्षण संस्थे चे उपाध्यक्ष तसेच एच.जे थीम कॉलेज चे चेअमन डॉ. इकबाल शाह,यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी ईकरा संस्थेचे डायरेक्टर डॉ.जबिअल्ला शाह , कॉलेज चे प्रभारी प्राचार्य, इब्राहिम पिंजारी , उप प्राचार्य , युसुफ पटेल, ईकरा हजी गुलाम नबी आय. टी.आय चे प्राचार्य जुबैर मलिक, प्राध्यापक,बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. ईकरा शिक्षण संस्थेचे ऊपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, यांनी ध्वजारोहणानंतर उपास्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रजासत्ताक दिना चे महत्व …
सोयगाव प्रतिनिधी (विजय चौधरी) तालुक्यातील जरंडी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जरंडी ग्रामपंचायत सरपंच वंदनाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,स्वाती पाटील, नीलिमा पाटील,अमृत राठोड, कल्पना भास्कर, ग्रामसेवक सुनील मंगरुळे, लिपिक संतोष पाटील यांच्या सह इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील, प्रकाश पवार,यांच्या सह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
चोपडा – प्रतिनिधी ( संदिप ओली) येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात २५ जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध मतदार जागृतीपर कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी व संविधानाने दिलेल्या हक्काचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी चहार्डी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा निवडणूक विषयक कार्यक्रमांचे मार्गदर्शक नरेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेऊन लोकशाही सुदृढ करण्याचे काम केले जात आहे.…
सोयगाव : प्रतिनिधी (विजय चौधरी ) १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुका निवडणूक विभागाकडून ६४० नव मतदारांना ओळखपत्राची अनोखी भेट दिली आहे.सोयगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून हि कार्यवाही करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून मंगळवारी सोयगाव तालुक्यात मतदान केंद्रांवर बारावा मतदार दिन साजरा करण्यात आला यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या नव मतदारांना ओळखपत्र भेट घरपोच देण्यात आली.यामध्ये सोयगाव तालुक्यात ९६ मतदान केंद्रांवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.तहसीलदार रमेश जसवंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार हेमंत तायडे,अव्वल कारकून सुधीर जहागीरदार,सचिन ओहोळ आदींनी हा उपक्रम राबविला.
चाळीसगाव : प्रतिनिधी (मुराद पटेल ): राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त बी. पी. आर्टस् , एस. एम. ए. सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालय, एन.एस.एस.विभाग, मतदार साक्षरता मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विविध कार्यक्रम २५ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी ऑनलाइन वेबिणार आयोजित करण्यात आला प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी लोकशाहीच्या सक्षमिकारानाशी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असून प्रत्येकाणे मतदान जागृती करावी, प्रा. डी. एल. वसईकर यांनी . लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी सर्वाना मतदार दिनाची शपथ दिली, मा. श्री अमोल मोरे तहसीलदार यांनी सर्व मतदार यांनी सतर्क,सुरक्षित आणि जागरूक राहून सर्वाना मतदार नोदणी करण्याचे आव्हान केले व…