जळगाव, प्रतिनिधी । आज शुक्रवार , दिनांक २८ जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता अयोध्यानगर परिसरातील कौतीक नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा ( महानगर ) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महानगर चिटणीस अमोल सोनार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान राबविले . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. रोहिणी खडसे खेवलकर (माजी चेअरमन जे.डी.सी.सी. बँक , जळगाव ) होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटन गुलाबराव देवकर ( चेअरमन जे.डि.सी.सी. बँक जळगाव ) यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर रोहिणीताई खडसे व गुलाबरावजी देवकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचे लहान मोठे…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे शहरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर प्रकाश सपके यांना नुकतेच दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिका येथील लिंब्रा फायनान्स इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेतील येथील सुधा फायनान्शिअल गोल फाईंडर ही पदवी देवून सन्मानित केले आहे. शहरात आजवर किशोर सपके यांनी टिमवन कन्सल्टन्सच्या 7 ट्रॉफ्या पटकविल्या असून आतापर्यंत त्यांनी तब्बल 38 वेळा रक्तदान करून रुग्णांना वाचविले आहे. कोरोना काळातही त्यांनी प्लाझमा दान करूनही आपली सामाजिक सेवा अविरत सुरु ठेवली होती. श्री.सपके यांना सन्मानित करतांना विनोद ठोळे, चंद्रशेखर आगरकर, मयुर तुपकरी, श्रीकांत देवरे, प्रभाकर बारी, अरूण जोशी आदी उपस्थित होते.
धरणगाव : प्रतिनिधी जिल्हा नियोजन मंडळातून वारकरी आणि लोककला भवन उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली असली तरी यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यात लवकरच भव्य वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तालुक्यातील वाघळूद बुद्रुक येथील श्रीमद भागवत सप्ताहाच्या समारोप प्रसंगी काल्याच्या किर्तनाला उपस्थिती दिल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्री बोलत होते. कीर्तन हे आपल्यासाठी उर्जास्त्रोत असून आपल्याला यातून सकारात्मक विचार मिळतात आणि अर्थातच जनसेवेची प्रेरणा मिळत असल्याचे ना. गुलाबराव पाटलांनी आवर्जून नमूद केले. तर ना. गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे काल्याचे संपूर्ण कीर्तन ऐकून नंतर वारकर्यांशी संवाद साधला. तालुक्यातील वाघळूद बुद्रुक…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील तरूणाचा खून केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थागुशाच्या संशयितांना ताब्यात घेतलेले आहे. शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा. उस्मानियॉ पार्क, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. तर अटकेतील शेख शाबीर शेख सूपडू (वय-३३) आणि शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) दोन्ही रा. श्रीरामपेठ जामनेर ,जळगाव असे दोन्ही संशयित मारेकऱ्यांचे नावे आहे. याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवर उस्मानियॉ पार्क येथील रहिवाशी शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याचे गुरूवारी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. मयत शेख…
जळगाव: भारतीय प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने हिंदुत्व स्वाभिमान, रिद्धी जानवी फाउंडेशन, सेवक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक शाम देश के नाम,व भारतीय सैन्य मधे सेवा केलेल्या माजी सैनिकांना पुष्पगुच्छ,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा,आमदार मनिषदादा जैन उपस्थित होते,माजी सैनिक किरण पाटील, किशोर पाटील,दिपा तापड़िया,आदी व्यासपीठा वर विराजमान होते. कार्यक्रम च्या शुरूवातीला मान्यवररांचे हस्ते भारत माता च्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी भारत माता की जय, वंदेमातरम च्या जयघोष करण्यात आले. कु,रिद्धी मालपाणी या बालिकेने भारत माते ची वेशभूषा साकारली होती. कार्यक्रम च्या यशस्वीते साठी रिद्धी जानवी फाउंडेशन च्या चित्रलेखा मालपाणी, जानवी मालपाणी,पद्मावती राणा,कीर्ती राणा,संगीता…
जळगाव प्रतिनिधी : पवन चारिटेबल ट्रस्ट तर्फे ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक यांना नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात वाहण्यात आली. डॉ.अनिल अवचट यांनी वैद्यकीय व्यवसाय न करता जीवनामध्ये समाजकार्य केलेले असून ,त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत सहभाग घेतला व सामाजिक क्षेत्रातील अनुभवांची निगडित अशा प्रकारचे लेखन साधना साप्ताहिक, वेध इत्यादी बाबीतून त्यांनी आपले वैचारिक लेखन केले होते . युवकांसाठी सुद्धा त्यांनी विविध प्रकारचे लेखन केलेले आहे आजही हे लेखन युवकांना प्रेरणा देत राहील .त्यांच्या जाण्यामुळे साहित्य क्षेत्र- सामाजिक क्षेत्र याचे व्यापक प्रमाणावर नुकसान झालेले आहे. श्रद्धांजली वाहताना डॉ विलास नारखेडे यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले व संस्थेच्या एका साहित्य संमेलनास त्यांनी अध्यक्ष म्हणून येण्याबाबत होकार…
मुंबई, वृत्तसंस्था । भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवक-युवतीने स्वसंमतीने विवाह करणे, हे कायदेशीर आहे; मात्र त्याचा राजकीय दृष्टीने लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचलित कथेनुसार कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमान सुनेचा आदर केला, तिचे धर्मांतर केले नाही; परंतु त्याच वेळी त्यांनी बजाजी निंबाळकर आदी जबरदस्तीने मुसलमान बनवलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात परत घेतले आणि त्यांच्याशी सोयरीक जोडली. आज ‘लव्ह जिहाद’चे भयंकर षड्यंत्र चालू असतांना त्यात अडकलेल्या हिंदू युवतींना पुढे जबरदस्ती इस्लाम कबूल करण्यासाठी अत्याचार करण्यात येतात. तसेच अनेकींची हत्याही केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. उद्या या कुटुंबाला मुले झाल्यास ती ‘हिंदू’…
प्रतिनिधी | नाशिक त्रिमुर्ती चौक व मायको सर्कलवरील येथील वादग्रस्त २५० कोटीच्या उड्डाणपुलांसाठी २०० वर्ष पुरातन वृक्षांसह तब्बल ५८८ वृक्ष तोडण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात आज शुक्रवारी (दि. २८) दुपारी बारा वाजता तातडीची सुनावणी होणार अाहे. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी साडेतीन वाजता प्रत्यक्ष पाहणी येथे करणार असल्यामुळे उड्डाणपुलाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. पर्यावरण प्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेत राज्य शासन, वनविभागाचे वनसंरक्षक तसेच नाशिक महापालिका अायुक्त कैलास जाधव, शहर अभियंता, मुख्य म्हणजे संपूर्ण वृक्ष प्राधिकरण समितीलाच प्रतीवादी करण्यात आल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. यापूर्वी भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दाखल…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगांव येथील समाजसेवक दत्तु रोकडे हे आपल्या आईच्या नावाने श्रीमती सिंधुताई रोकडे या नावाने दरवर्षी सामाजिक,पोलीस,शिक्षण व इतर क्षेत्रात विशिष्ट कार्य कार्यरत असणार्या लोकांचा गौरव २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी करत असतात. या वर्षी करोना सारख्या महामारीत उत्कृष्ट असे कार्य करणारे सोयगांव पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,व शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असणारे सोयगाव येथील सोयगाव केंद्रप्रमुख मोतीराम जोहरे व तर गलवाडा येथील नवकवी गोपाल इंगळे यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून.सर्व गौरवार्थींचे समाजसेवक दत्तू रोकडे,मुख्याध्यापक रामदास फुसे,राजेंद्र दुतोंडे,कदीर शहा,समाजसेवक विष्णू मापारी मुख्याध्यापक किरण पाटील,रवींद्र तायडे,झगाजी पोतरे,सुदर्शन चौधरी,शेख सय्यद,नसीर शेख,प्रशांत पाटील यांच्या सह अनेकांनी…
खिर्डी ता रावेर प्रजासत्ताक दिनाच्या औचीत्ये साधुन रेंभोटा येथील ज्ञानेश्वर रामु गाढे यानी जि. प . मराठी शाळेला प्रिंटर झेरॉक्स मशीन भेट दिली असून. रें भोटा येथील इंजीनीयर ज्ञानेश्वर रामु गाढे यांनी आपल्या मोठे बंधू कै.नंदलाल रामु गाढे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही भेट दिली आहे. आज खाजगी शाळे मुळे प्रत्येक गावातील जि.प शाळा ही बंद पडल्या आहे परंतु रेंभोटा येथील शाळेला दानशूर व्यक्तीकडून देनगी स्वरुपात विवीध व स्तु दान देण्याचे अवाहन प्राथमीक शिक्षीका भाग्यश्री बेंडाळे यांनी केल्यावर गावातील इंजीनीयर ज्ञानेश्वर गाढे यानी अवाहनाला प्रतीसाद देत एक पाऊल पुढे टाकुन आपली शाळा डीजीटल व्हावी या दिशेने पुढे आले व प्रिंटर झेरॉवस…