Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर वेश्या व्यवसायावर धाड टाकण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव – औरंगाबाद महामार्गावर एमआयडीसी हद्दीतील हॉटेल वजा लॉजवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलिस पथकाच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात दोन महिला व दोन पुरुष नको त्या अवस्थेत आढळून आले. काशिनाथ चौकानजीक असलेल्या हॉटेल अमरनाथ येथे सदर छापा टाकण्यात आला. जळगाव शहरातील जळगाव – औरंगाबाद रोडवरील अमरनाथ लॉजीगचे मालक लॉजमध्ये पुरुषांना काही महिला उपलब्ध करुन वेशा व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहत शेड क्रमांक २० मधील जय केबल इंडस्ट्रीमध्ये धाडसी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या तारांचे बंडल आणि २५ हजार रोख असा ऐकून २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. औद्योगिक वसाहत शेड क्रमांक २० मधील जय केबल इंडस्ट्री आहे. अज्ञात चोरट्यांनी २८ जानेवारीच्या रात्री ८ ते ३० जानेवारीच्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान, २ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीचे २० तांब्याच्या तारांचे बंडल याच बरोबर ५५ तांब्याच्या तारांचे बंडल आणि २५ हजार रोख असा ऐकून २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी नरेश काकुमल अठवाणी यांच्या फिर्यादीवरून…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा रोहित पवार मित्र मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र गुजर यांच्यासह अनेकांनी जिल्हा सदस्य प्रताप पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे शिवसेना उपजिल्हा डॉक्टर मनोहर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अजिंठा हुन नाशिक कडे शेंदुर्णी मार्गाने युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ही जात असताना शेंदुर्णी शहर तालुका शिवसेना शाखेतर्फे आदित्य साहेब ठाकरे यांचा स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात शेंदुर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रवींद्र गुजर कैलास काबरा अशोक गुजर कुणाल गुजर सय्यद भाई अल्लारखा भाई ज्ञानेश्वर पवार यांच्यासह अनेक तरुणांनी जिल्हा परिषद…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला असून ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. सुरूवातील विद्यार्थ्यांना समजावण्याच प्रयत्न केला मात्र आक्रमक विद्यार्थी काही केल्या ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. पोलिसांच्या लाठीमारानंतर विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा संपूर्ण…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । भाजप नेते गिरीश महाजन हे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळावा म्हणून ट्रस्टींना धमकावल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. याप्रकरणी महाजनांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल असलेल्या तीन वर्षापूर्वीच्या फौजदारी गुन्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत महाजन यांच्यासह अन्य दोघांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करु नये असे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. तसेच पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांनी जबाब नोंदवून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सोमवारी हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात गिरीष महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात धमकाविल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याविरोधात दोघांनी याप्रकरणी…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आजच्या आधुनिक युगात फेसबुक पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकवर चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलसाठी मेसेंजर अ‍ॅप वापरलं जातं. याच मेसेंजरमध्ये आणखी एक नवीन फीचर जोडण्यात आलंय. नव्या फीचरनुसार मेसेंजरवर केलेल्या चॅटिंगचा जर कोणी स्क्रीनशॉट घेत असेल, तर समोरच्या व्यक्तीला त्याबाबत नोटिफिकेशन पाठवलं जाईल. याआधी, ‘व्हॅनिश मोड’ मध्ये ही सुविधा उपलब्ध होती. जेव्हा व्हॅनिश मोडमध्ये कोणतरी स्क्रीनशॉट घ्यायचं तेव्हा या अलर्ट सिस्टमच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला कळायचं. परंतु यापुढे सर्वच मोड आणि सर्व चॅटसाठी कंपनीने स्क्रीनशॉट नोटिफिकेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच फेसबुक मेसेंजरवरील सर्व चॅट्स ही एंड-टू-एंड एनक्रिप्टेड देखील आहेत. एका पोस्टमध्ये, फेसबुक मेसेंजरची पॅरेंट कंपनी…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । येथील कांग नदीच्या बोदवड पुलाखाली बोदवड येथील शुभम नंदू माळी वय २५ या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. बोदवड येथील शुभम नंदू माळी हा युवक पहूर येथील खाजगी ट्रकवर चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली असून तो पहूर येथून आप ला ट्रक खाली करून मालकाच्या ताब्यात देऊन आपल्या गावाकडे म्हणजे बोदवड कडे त्याने दुसऱ्याची गहाण ठेवलेल्या मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डी एस २६४१ घेऊन तो निघाला असल्याची माहिती मिळत आहेत. तो बो दवड कडे जात असताना त्याचा मृतदेह जामनेर शहराला लागून असलेल्या कांग नदीवरील बो दवड पुलाखाली आढळून आला आहे. तर त्याची…

Read More

बोदवड, प्रतिनिधी । तालुक्यातील नाडगांव रेल्वे गेट शनिवारच्या दिवशी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरणे नित्याचेच झाले आहे. जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी शिरसाळा मारोती येथे येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. अश्यातच ; रेल्वे गेट प्रत्येकी अर्धा तास विलंबाने ऊघडत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. या पार्श्वभूमिवर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील मुक्ताईनगरहून बोदवड कडे येत असतांना रेल्वे गेट बंद होते. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. तद्नंतर दहा पंधरा मिनिटांनंतर गेट उघडत असल्याने वाहनांची कोंडी होत होती. त्यामुळे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील रस्त्यावर उतरत त्यांनी ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यानंतर , स्वतःचे खाजगी वाहन रांगेत अडकले असल्याने नियोजित कार्यक्रमाला…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । येथील महिलेला ट्रकची जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील सकाळच्या सुमारास पायी फिरणार्‍या प्रौढ महिलेस ट्रकने उडविल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील गांधी पुतळ्याजवळ घडली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळच्या रस्त्यावरून जात असलेल्या मीनाबाई मोहन अग्रवाल (वय५५) या महिलेला या मार्गावरून जाणार्‍या ट्रकने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मंदिरात दर्शनासाठी जात असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत महिला ही तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा…

Read More