Author: saimat team

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍्यारी यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या फाईलवर स्वाक्षरी केली त्याचप्रमाणे त्यांनी 12 आमदारांच्या फाईलवरही सही केली तर आम्ही राज्यपालांचा जाहीर सत्कार करू, असा टोला शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लगावला. केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका करताना ते म्हणाले, हे बजेट केवळ काही उद्योगपतींसाठीचे बजेट आहे. यामधून गुजरातच्या गिफ्ट सिटीला झुकतं माप दिल आहे. मात्र, मुंबईवर अन्याय केला आहे. मुंबईतले उद्योग पळविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. इतर पक्षांना मुंबईवर कब्जा करायचा आहे. मुंबईला ओरबडायचं आहे. मात्र, आमच्यामुळे मुंबईची प्रतिष्ठा टिकून राहीलीय असे राऊत म्हणाले. पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । स्वच्छता सर्वेक्षण अभियान 2022 अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे रात्रपाळी स्वच्छता अभियानाचा काल मंगळवार,दि.1 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री शहरातील महात्मा फुले मार्केटमधील तळमजल्यात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करीत प्रारंभ केला. यावेळी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी सांगितले, की महापालिकेच्या मालकीच्या शहरातील विविध मार्केटमधील स्वच्छता आता दररोज केली जाणार आहे. त्यासाठी त्या-त्या मार्केटमधील व्यापारी, दुकानदारांनी आपली स्वतंत्रपणे डस्टबिन घेऊन दिवसभरातील कचरा त्यात टाकावा. त्यानंतर महापालिकेतर्फे रोज सायंकाळी 7.30 ते रात्री 8 दरम्यान शहरातील प्रत्येक मार्केटजवळ घंटागाडी येईल तेव्हा संबंधित…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेकदा विविध मुद्द्यांवर उघडपणे आपले मत मांडते. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाला ट्रोलही केले जाते. नुकतंच कंगनाने केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे. कंगनाने सोशल मीडियाद्वारे संरक्षण मंत्रालयाच्या एका निर्णयाचे स्वागत करत त्याचे कौतुक केले. भारत सरकारने भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु असलेल्या पायलट योजनेचे कायमस्वरूपी योजनेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. राजनाथ सिंह यांनी ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे कौतुक केले. यानंतर कंगना रणौतनेही…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटलेक्चुअल पापर्टी राईट अ‍ॅण्ड रिलेटेड पोसीजर अर्थातच बौद्धीक संपदा हक्क व विविध पद्धती या विषयावर यशस्वी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी फाऊंडेशनचे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इन्स्टीट्यशनस इनोवेशन काऊंसील (खखउ) व इंडियन पेटंट ऑफीस, मंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, इंटलेक्चाल पापी राईट व रिलेटेड पोसीजर या विषयावर ऑनलाईन संवादाप्रसंगी सर्वप्रथम डॉ.विजयकुमार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच महाविद्यालयाने इनोव्हेशन संदर्भात कार्यान्वित केलेल्या विविध कार्याची माहिती दिली. आय पी आरचे महत्व लक्षात आणुन देत ते म्हणाले की, आय पी आर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि भविष्यातील संशोधन क्षेत्राचा विकास व नोकरीच्या संधी, आरोग्य व साक्षरता यासाठीही…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना काळात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोने दरात चढ-उतार सातत्याने दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी सोने दरात वाढ दिसून आली. परंतु आज सोने – चांदी दरात घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हा सराफा व्यवसायावर दिसून येत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती तसेच रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे. असे असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 44,900 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 44,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. ॠेेव ठर्शीीींपी…

Read More

बोदवड, प्रतिनिधी । बोदवड उपसा सिंचन योजने अंतर्गत येवती, जामठी, लोणवाडी या तीन गावांचा प्रामुख्याने समावेश आहे. येथील शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील नोंदी कमी करण्याबाबत बोदवड तहसील कार्यालयामध्ये तक्रार केली असता तत्कालीन मा. तहसिलदार थोरात यांनी लोणवाडी येथील आठ ते दहा शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढली होती. उर्वरित प्रकरणे दि.३१/०१/२०१९ रोजी जिल्हा उपविभागीय कार्यालयांमध्ये पाठवण्यात आली होती. अडीच वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना न्याय मिळेना. सदर प्रकरण हे आर टी एस डिव्हिजन/२०१९ क्र. ४२५ ते ५१० ही प्रकरणे प्रलंबित आहे व्यापाऱ्यांना उपविभागीय कार्यालयातर्फे रजिस्टर पोस्ट तीन नोटीस बजावून ही एक ही तारखेला प्रतिवादी हजर राहिले नाहीत. शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील बेकायदेशीर नोंदी कमी करण्यात यावे व…

Read More

बोदवड, प्रतिनिधी । तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये त्यांचे वडिल बाबुराव लक्ष्मण निकम यांच्या नावे असलेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान लाटले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी दि.०४ ऑक्टोबर २०२१ रोजी गौतम बाबुराव निकम यांनी सन २०१२-२०१३ व बाबुराव लक्ष्मण निकम यांनी सन २०१५-२०१६ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान घेतले होते परंतु निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ पैकी ९० आर मध्ये १ विहीर खोदकाम व बांधकाम न करता शासनाचा निधी लाटला आहे अशी तक्रार दाखल केली होती, संबंधित अधिकारी यांनी चौकशी व…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये (गिफ्ट सिटी) सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे गेली पाच वर्षे मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राला गिफ्ट सिटीशी स्पर्धा करावी लागणार आहे. यानंतर आता राजकारण तापू लागले आहे. मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. “मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून पाहवत नाही. भाजपाच्या मुंबईतल्या नेत्यांची यावर काय भूमिका आहे हे स्पष्ट व्हायला हवे. काँग्रेसच्या राजवटीत…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगर परिषद हद्दीतील विकासक व लेआउट धारक यांनी कोणतेही सुविधा न देता भूखंड विकसित केल्या बाबतचा अहवाल यावल तहसीलदार यांनी गेल्या 6 महिन्यात प्रांताधिकारी यांना न दिल्याने प्रांताधिकारी यांनी दि. 28 जानेवारी 2022 रोजी यावल तहसीलदार महेश पवार यांना स्मरण पत्र देऊन चौकशी अहवाल पुराव्यासह 7 दिवसाच्या आत सादर करण्याचे स्मरण पत्र दिले आहे यामुळे आता यावल तहसीलदार काय कार्यवाही करणार? याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे. यावल नगरपरिषद हद्दीतील विकासक,लेआउट धारक यांनी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून न देता भूखंड विकसित करून प्लॉट विक्री करून टाकलेले आहेत यांची चौकशी होऊन कार्यवाही करणेबाबत यावल येथील राजेश…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात पूर्व भागात डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी तसेच पश्चिम भागात यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी वाळू चोरटी वाहतूक करणारे वाहन पकडून गुन्हे दाखल केले परंतु याच दरम्यान महसूल पथकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून एक वाळूचे ट्रॅक्टर पकडून 70 ते 80 हजारात तडजोड करून सोडल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा असून वाळू तस्करांमधील आपआपसातील व्यवसायिक स्पर्धेमुळे वाळू प्रकरण चव्हाट्यावर येत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. 31जानेवारी 2022 रोजी दुपारी15:30 वाजेच्या दरम्यान मनवेल थोरगव्हाण रस्त्यावर पिळोदा फाट्याजवळ ट्रॅक्टर द्वारे अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची खबर यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशानुसार पो.कॉ.सुशील घुगे,मुजफ्फर…

Read More