नंदूरबार प्रतिनिधी इंजिनियरींगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तरूणीचा वसतीगृहात मृतदेह आढळला आला आहे. तरुणीने गळपास घेत आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, वसतिगृहात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोंडाईचा येथील बस स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावरील शासकीय वस्तीगृहातील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. वैशाली तापेदास गावित वय १९ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. वैशाली इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षी पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिकत होती. वैशालीने हे टोकाचं पाऊल का उचलल हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. वैशालीचा बुधावरी गणिताचा पेपर होता आणि पेपर देऊन आल्यानंतर…