Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात मुद्रांकशुल्क सवलत ३१ डिसेंबरपर्यंत मिळत असल्याने नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी एकच गर्दी केली आहे. प्रत्यक्षात ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत असली तरी त्या तारखेच्या आत मुद्रांक शुल्क अदा केले तर असे दस्तऐवज नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादनापासून चार महिन्यापर्यंत केव्हाही दस्तनोंदणीस दाखल करता येतात. ही बाब जनतेने लक्षात घ्यावी व कार्यालयात गर्दी करु नये असे आवाहन सुनिल मधुकर पाटील सहजिल्हा निबंधक वर्ग २ जळगाव यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

Read More

मुक्ताईनगर ः अमोल वैद्य शहरामध्ये लॉकडॉऊनच्या काळापासून ते आजतागायत पोलीस व राज्य उत्पादन शुल्काच्या ‘अर्थ’पूर्ण संंबंधातून अवैध दारू विक्रीची दुकाने ठिकठिकाणी सर्रासपणे सुरू आहेत. इतकेच नव्हे तर सट्टा-मटका या अवैध धंद्यांना ऊत आला आहे.राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर तसेच भुसावळ रोडवर उघडपणे अवैध मद्यविक्री होत असते.थातूरमातूर कारवाई करून बड्या माश्यांना सोडले जाते तर तेथील नोकरांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा प्रकारचे ‘अर्थ’पूर्ण समायोजन अवैद्य धंदेवाल्यांसह कारवाई करणार्‍या पोलीस तसेच उत्पादन शुल्क पथक यांंच्यामध्ये असल्याने केवळ वरच्यावर कारवाई करण्यात येते. ही कारवाई केवळ केसेस वाढवण्यासाठी तसेच संबंधित विभाग आपले कर्तव्य सतत व इमानदारीने पार पाडत आहेत याचा दिखावा करण्यासाठीच केल्या जात असल्याचाही…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा कहर कमी झाला असून कोरोना काळात गरजू आणि गरीबांना बरेच संस्थांनकडून विविध प्रकारची मद्त करण्यात आली होती, आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुस्लिम सुटडेन्ट ऑर्गनाइज़ेशन ऑफ इंडिया ही सूफी संत विचारधाराची संस्थेतर्फे पूर्ण भारतात अमीन ए मिल्लत यांच्या आदेशानुसार गरजुंना कंबळ वाटप करण्यात येत आहे . जळगावातही फुटपाथ, मन्दिर, दरगाह, रेलवे स्टेशन, बस स्टैंड, मार्केट कॉम्प्लेक्स परिसरात राहणार्या गोर – गरीब, भिक मागणार्या गरजुंना उबदार कंबळ वाटप करण्यात आले. कंबळ वाटपच्या आधी मेहरूण येथे दहा ते बार लोकांची उपस्थितीत कंबळ वाटपचे नियोजन करण्यात आले . या कार्यक्रमात सर्वप्रथम मुफ़्ती गुलाम…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शेतकरी बंधु व भगिनींना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार असून आज रोजी या योजने अंतर्गत जळगाव जनता सहकारी बँकेच्या १९९२ खातेदारांच्या खात्यात दिनांक २५.१२.२०२० रोजी रु ३९.८४लाख इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे असे जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. जळगाव जनता सहकारी बँक नेहमीच आपल्या खातेदारांना तत्पर व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यास कटिबद्ध असते.बँकेमार्फत तत्परतेने जमा करण्यात आलेल्या या रकमेचा लाभ बँकेच्या खातेदारांना घेता येणार आहे. तसेच या व अशा सर्व…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी तळवेल येथील रहिवासी व भुसावळ शहरात वास्तव्यास असणारे आणि वरणगावमध्ये वासुदेव नेत्रालय आणि ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठित भुसावळच्या माध्यमातून भुसावळ तालुका परिक्षेत्रात जागतिक महामारी कोरोनाच्या काळात विविध सामाजिक, आरोग्य क्षेत्रात, वैद्यकीय प्रबोधन, जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल डॉ.नितु पाटील आणि डॉ.रेणुका पाटील यांचा मुंबई येथील राजभवनात जनराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते गुलाबपुष्प आणि कोरोनावीर सम्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील आरोग्य क्षेत्रात खाजगी सेवा करणारे विविध शाखेतील सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडीओ ग्राफर आदी सर्व आरोग्यसेवक यांच्या कोरोनावीर सम्मान सोहळ्यात समावेश होता. राजभवनात सर्व शासकीय नियमानुसार हा सत्कार समारोह पार पडला. जनराज्यपालांनी सर्व आरोग्य सेवकांची सेवा नसून ही एक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी केंंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात काल जळगावात महिला रस्त्यावर उतरल्या. राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी कार्यालयासमोर महिलांंनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापल्या. या आंंदोलनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिलांनी सहभाग घेतला. गेल्या दीड महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर तब्बल २०० रुपयांंनी वाढले आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून, केंद्र सरकार पेट्रोलियम कंंपन्यांच्या फायद्यासाठी गॅस आणि पेट्रोलसारखी इंधन दरवाढ करीत आहे.गॅस दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. महिलांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप या वेळी महिलांनी केला. आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, प्रदेश उपाध्यक्षा वंंदना चौधरी, डॉ.सुषमा चौधरी,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील साफसफाईचा ठेका असलेल्या वॉटरग्रेस कंंपनीकडून पूर्ण क्षमतेने काम होत नाही.वजन वाढवण्यासाठी माती भरली जात आहे. अनेक वाहने बंंद आहेत त्यात वॉटरग्रेस कंपनीने पोटठेका दिल्याबाबत चर्चा आहे. त्यामुळे मक्तेदाराचे काम शंंकेला वाव देणारे आहे. अटी व शर्तींचा भंंग झाला असेल तर त्याची दखल घ्यावी अशी सूचना उपमहापौर सुनील खडके यांंनी केली आहे. महापौर भारती सोनवणे यांच्या पाठोपाठ उपमहापौर खडके यांंनीदेखील साफसफाईच्या ठेक्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त सतीश कुलकर्णी यांंना पत्र दिले आहे. बर्‍याच दिवसांपासून नगरसेवक, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांच्या समक्ष पाहणीत मक्तेदाराकडून साफसफाईचे काम समाधानकारक होत नसल्याचे दिसते. प्रभागातून यासंदर्भात तक्रारी प्राप्त करणे,…

Read More

चाळीसगाव ः दिलीप घोरपडे चाळीसगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव नगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असून या कामामुळे शहरातील चांगले बनवलेले रस्ते उखडले जात आहेत आणि सर्वत्र खड्डेच खड्डे शहरभर झाले असून शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचे खोकल्याचे आजार होत असून धूळ डोळ्यात जात असल्याने डोळ्यांच्या देखील समस्या निर्माण होत आहेत यामुळे सर्व नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. वास्तविक या कामात पाईपलाईन बुजल्यानंतर जे रस्ते जेथे डांंबरीकरण असेल तेथे डांबरीकरण व जेथे काँक्रिटीकरण असेल तेथे काँक्रिटीकरण करून पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र यापैकी काही…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी खोटे दस्तावेज बनवत भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील जयश्रीराम ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थेस आर्थिक नुकसान पोहोचविल्याप्रकरणी भाजपाचे ओबीसी सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस अजय एकनाथ भोळे व जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांचे मोठे बंधू प्रमोद नाना पाटील यांच्यासह तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बाजार पेठ पोलिसांना दिले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील जयश्रीराम ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा विस्तारीत कक्ष भुसावळ येथे आहे. सदरील पतसंस्थेचे कार्यालय १२/१२/२००५ पासून नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समधील गाळा नं.जी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही चांगला,भाजपसारख्या कपटी मित्रांकडून आपल्याला मिळालेली वागणूक सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंत एवढी वर्षे आपले राजकीय शत्रू राहिलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जुळवून घेत भाजपला गावातच रोखण्याची वेळ आली आहे. आगामी सर्व निवडणुकीत यापुढे महाविकास आघाडीचा पॅटर्न राहणार आहे.त्यामुळे एक पाऊल मागे घेऊन दिलदारपणा दाखवा आणि ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आणा, असे आवाहन शिवसेना नेत्यांनी जिल्हा बैठकीत केले. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचा मेळावा सरदार वल्लभभाई पटेल लेवाभवन येथे आयोजित केला होता. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत,आमदार चिमणराव पाटील,आ.किशोर पाटील,…

Read More