Author: saimat team

चोपडा ः प्रतिनिधी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी सी-२ सर्वे घेण्यात येतो. वेळोवेळी महाविद्यालयानी जागतिक स्तरावर शैक्षणिक बदलांना अनुसरून केलेल्या बदलांचा मागोवा घेऊन याचे मानांकन देण्यात येते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकमेव चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाला सुवर्ण मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाला २०१६ पासून एनबीए मानांकन मिळाले असून महाविद्यालय नेहमी विद्यार्थी केंद्रीत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून त्याचेच प्रमाण हे असून या यशाचे श्रेय हे संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, महाविद्यालयाचे भागधारक, एमओयू पार्टनर्स, विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे आहे, अशी प्रतिक्रिया…

Read More

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील महामार्गांची रखडलेली कामे तसेच धिम्या गतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून आपण व्यक्तिगत लक्ष घालावे व तसेच जिल्ह्यातील मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी व जिल्ह्यातील वाढीव विजबिलांसंंदर्भात राज्य सरकारला निर्देश देण्यात यावेत यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ता योगेश देसले यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांंची विशेष भेट घेतली व त्यांच्या या मागण्यांबाबत आग्रह धरला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी देसले यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील,ग्रंंथालय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे १ ते ३ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून व आसन क्षमतेच्या ५० टक्के रसिकांनाच महोत्सवास उपस्थित राहता येणार आहे. आज सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. एकोणिसाव्या बालगंधर्व महोत्सवाची सुरूवात आजपासून होत असून उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक सुधांशू सिंग, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्राचार्य अनिल राव, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक डॉ. अजित मराठे, बँक ऑफ महाराष्ट्रचे परिमंडळ व्यवस्थापक राजेश देशमुख, वेस्टर्न…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी स्व.निखील एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस स्व.निखील खडसे स्मृतीस्थळ, आदिशक्ती मुक्ताईसह सुतगिरणी मुक्ताईनगर येथे अभिवादन करण्यात आले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याहस्ते स्व.निखीलभाऊ खडसे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी स्व.निखील खडसे यांच्या स्मृतीला उजाळा देत रोहिणी खडसे म्हणाल्या, स्व.निखील दादा यांनी त्यांच्या जि.प. सदस्य काळात भरपूर विकास कामे केली. त्याचबरोबर युवकांचे संघटन उभारले. आज राज्यात कुठेही गेलो तरी त्यांच्या मित्र परिवारातील सदस्य भेटतात व स्व.निखील भाऊ यांची आठवण काढतात. एकनाथराव खडसे यांनी स्थापन केलेल्या मुक्ताई सूतगिरणीचे काम पूर्णत्वास जाऊन सूतगिरणी सुरू व्हावी व स्थानिक युवकांना महिलांना रोजगार मिळावा हे निखील भाऊंचे स्वप्न होते.…

Read More

जळगाव ः शहर प्रतिनिधी स्व. निखिल खडसे यांच्या जयंती निमित्ताने आज नाथ फाऊंडेशनच्या वतीने जळगाव मनपा मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट,सॅनेटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले तसेच गोरगरीब अंध व दिव्यांग बंधूंना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील ,युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, नाथ फाऊंडेशनचे अशोक लाडवंजारी, सुनिल माळी यांच्या हस्ते मूकबधिर विद्यार्थ्यांना ब्लँकेट तसेच पाच लिटर सॅनेटायझर, थर्मामीटर, मास्क इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. निखील खडसे जयंतीनिमित्त या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते.त्यानंतर जळगाव वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती कक्षात महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनिल माळी,दीपक फालक, माजी नगरसेवक राजू मोरे,…

Read More

पाचोरा ः प्रतिनिधी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशिल मराठे यांच्या मालकीच्या भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटला आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसक्रीटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलच्या प्रवेशद्वारा जवळच असलेले किचन जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपालिकेचे सफाई मुकादम बापु ब्राम्हणे व त्यांचे सहकार्‍यांना आग लागल्याची घटना लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न करत तात्काळ न.पा.अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे राजु कंडारे,आबा पाटील, भिकन गायकवाड, युसुफ खान यांनी आग विझविण्यात यश आले. सदरची घटना पहाटे घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली व किचनमध्ये असलेले गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील होणारा अनर्थ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पत्रकार संंघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संंघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग यांंच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि.१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता येथील कांंताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा ठराव पद्मालय विश्राम गृह येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बैठकीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्यशासनाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यभर रक्तदान शिबिरं आयोजित केले आहे. यावेळी कार्यक्रमास्थळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सदस्य नोंदणी देखील केली जाणार आहे. तरी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी तर्फे सभासदांना व सभासदाचे पत्नीस हृदयरोग शस्त्रक्रिया,एड्स,कॅन्सर, मुत्रपिंड रोपण या गंभीर आजारासाठी सेवेत असलेल्या सभासदांना ४१ हजार रु. व सेवानिवृत्त झालेल्या पण पतपेढीचे सभासद असलेल्या सभासदांना ५१ हजार रु.आर्थिक मदत सभासद कल्याण निधीतून करण्यात येत असते तर सभासदाचे नैसर्गिक अथवा अपघाती निधन झाल्यास एक लाख रुपयांची मदत सभासद कल्याण निधीतून धनादेशाद्वारे देण्यात येते. या योजनेंतर्गंत संस्थेचे सभासद प्रमोद रामदास बेंडाळे यांच्या पत्नीच्या हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी ४१ हजार रुपयाची मदत सभासद कल्याण निधीतून चेकद्वारे संस्थेचे चेअरमन इंजि.साहेबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचे घरी जाऊन देण्यात आली. याप्रसंगी सचिव प्रेमराज निंबा पाटील व लिपीक…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी येथील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीला सुमारे १० कोटी रुपयांची एकरकमी सबसिडी मिळाल्यामुळे प्रकल्प आर्थिक चणचण संपून स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करणार आहे. तालुक्यातील सभासद व शेतकर्‍यांना सुतगिरणीचा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून स्वतःची जिनिंग प्रेसिंग कार्यस्थळावर सुरु करणार असल्याची घोषणा करीत १५ दिवसात भुमिपूजन करणार असल्याचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. कैलास पाटील म्हणाले की, सूतगिरणी प्रकल्प तालुक्याला वैभवशाली बनविण्याकडे वाटचाल करीत असतांना सद्यस्थितीत १०० कोटींचा प्रकल्प उभा झाला आहे. सुतगिरणी उभी करताना राज्य शासनाची मोठी मदत झाली. २७ कोटी रुपये भागभांडवल शासनाने उपलब्ध करुन दिले. शेतकर्‍यांनी तीन करोड रुपये भाग भांडवल उपलब्ध केले. त्यामुळे चोपडा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अतिशय उपयुक माहिती असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या सन २०२१ सालच्या दिनदर्शिकेचे विमोचन काल रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात जळगाव येथील कोविड काळात आपले अमूल्य योगदान देणारे बँकेचेे ग्राहक डॉ.परीक्षित बावीस्कर,तिरुपति कडक्टरचे संचालक अतुल अग्रवाल,जोशी मेडीकल्सचे गोविंद जोशी,शीतल कलेक्शनचे मनोहर नाथानी,दालमिल व्यावसायिक पंकज बर्‍हाट, व सुवाद्य तुतारीवादक लक्ष्मण अंभोरे,शाहीर सखाराम जोशी यांंचे नातू शाहीर संग्राम जोशी, विवेकानंद शाळेतील शिक्षक व दिनदर्शिकेतील माहिती ज्यांंनी एकत्रित केली असे ज्ञानेश्वर पाटील सर व दिनदर्शिकेतील शूर मावळ्यांचे स्केच ज्यांंनी साकारले असे नितिन पाटील सर व मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंंगी केशवस्मृती सेवा समुहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर,बंँकेचे अध्यक्ष अनिल राव,उपाध्यक्षडॉ. प्रताप जाधव, बँकेचे…

Read More