मुंबईः करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं सर्वसामान्यांसाठी तब्बल १० महिने बंद असलेली मुंबई लोकलसेवा फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा सुरु झाली. मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या या नाराजीनंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकलच्या वेळेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईतील करोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेच बंधन घालण्यात आलं आहे. त्यानुसार, पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ व रात्री ९ वाजल्यानंतर या वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात…
Author: saimat team
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावर विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. नवी दिल्ली : संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा शब्द समोर आणला होता… हा शब्द होता ‘आंदोलनजीवी’… प्रत्येक आंदोलनात दिसणाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा शब्द वापरला होता. परंतु, पंतप्रधानांच्या याच शब्दावर विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आंदोलनजीवी’ शब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना ‘संयुक्त किसान मोर्चा’ या शेतकरी संघटनेनं व्यक्त केलीय. गेल्या ७५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू…
जळगाव : प्रतिनिधी पर्यावरणाचा र्हास थांबवून वसुंधरा मातेला जैवविविधतेने वैभवशाली करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जळगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी केले. तालुक्यातील असोदा येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व सार्वजनिक विद्यालय असोदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. यावेळी मुलांना पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी सार्वजनिक शपथ देण्यात आली. रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही झाले . या कार्यक्रमास शिक्षण विस्ताराधिकारी प्रतिमा सानप पंचायत समितीच्या कक्षअधिकारी श्रीमती तडवी , केंद्रप्रमुख श्री वाघे , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ खाचणे,…
जळगाव ः प्रतिनिधी जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिन अध्यापिका महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. याठिकाणी होनेसटी शॉपचे इन्स्टॉलेशन तसेच एकात्मताची शपथ विद्यार्थीना देण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख सुवर्णा चौधरी मॅडम यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले तसेच जिनल जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्याप्रसंगी उपस्थित अध्यक्ष सुशील अगरवाल, सचिव सुवर्णा चौधरी, भारती काळे, ललित नेमाडे, अर्चना सूर्यवंशी, कुलदीप बुवा, विशाल शर्मा, राकेश कंडारे, योगेश वाणी, फिरोज शेख प्रकल्प प्रमुख जेसी कुलदीप बुवा यांनी परिश्रम घेतले
कासोदा ता.एरंडोल ःप्रतिनिधी भारतीय पत्रकार महासंघ एरंडोल तालुका अध्यक्ष नूरुद्दीन मुल्लाजी यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी (ग्रामीण) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रासह पत्रकारितेत उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल भारतीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिग राजपुत, केंद्रीय उपाध्यक्ष, राकेश कोल्हे, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील, केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, जयवंत देवरे, प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार जैन, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) नंदलाल मराठे, जिल्हाध्यक्ष (शहर ) हेमंत काळुंखे, सरचिटणीस संजीव शिरसाठ, एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर, चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे, ग्रामीण…
जळगाव ः प्रतिनिधी येथील मेहरुण परिसरातील राम नगरमधील रहिवासी पत्रकार संतोष पितांबर ढिवरे यांचे सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज दि. ९ रोजी सकाळी ९.३० वाजता मेहरुण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील पत्रकार संतोष ढिवरे यांची प्रकृती काही दिवसापूर्वी खालावली होती. त्यांच्या प्रकृतीत जळगाव येथे उपचारात कुठलीही प्रगती होत नसल्याने त्यांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले होते. दि.८ रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. संतोष ढिवरे हे सायंदैनिक ‘साईमत’सह ‘साईमत लाईव्ह’चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत होते. ते सुमारे १० ते १५ वर्षापासून पत्रकारीतेत कार्यरत होते. महाराष्ट्र…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील रायपूर व कुसुंबाजवळील काढण्यात आलेल्या डीपीविषयी वृत्त ‘साईमत’ वृत्तपत्रात प्रकाशित होताच महावितरण कंपनीतर्फे डीपी बसविण्यात आली. यामुळे रायपूर येथे विजेच्या सप्लायअभावी बंद असलेला पाणीपुरवठा पुर्ववत सुरू झाला आहे. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबाबत रायपूर ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले. रायपूर गावाला लागूनच असलेल्या कुसुंबा गावाजवळच काही अंतरावर रायपूर येथे पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहिर आहे. तालुक्यातील रायपूर-कुसुंबा गावाला वीज पुरवठा करण्यासाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गाला लागूनच डीपी बसविण्यात आली होती. परंतु महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे व अडथळा ठरत असल्यामुळे ही डीपी काढण्यात आली होती. पुरेसा विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे रायपूर येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद…
जळगाव : प्रतिनिधी येथील मेहरुण परिसरातील राम नगरमधील रहिवासी पत्रकार संतोष पितांबर ढिवरे यांचे आज सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. संतोष ढिवरे यांच्यावर मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ‘साईमत लाईव्ह’चे जिल्हा प्रतिनिधी होते.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील बेटावद बु॥ येथील २५ हजार रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेटावद बु॥ येथील शेतरी उखर्डू तोताराम काळे (वय ७१) यांच्या मालकीची ट्रॅक्टर व ट्रॉली आहे. त्यांनी त्यांच्या बोदवड रोडवरील शेतात ट्रॉली (क्र.एम.एच.२८-ई-१८५५) ही लावून ठेवली होती. ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ही ट्रॉली चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जामनेर पोलीसात काळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. जनार्दन सोनोने हे करीत आहेत.
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील हलखेडा येथे औषधीला वापरात येणारी काळी हळद देतो असे म्हणत एका व्यापार्याची ८६ हजाराची फसवणूक केली. तसेच त्यास मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुर्हा येथील शुभम संजय पाटील याने औषधीसाठी लागणारी काळी हळद देतो असे सांगत गुजरातमधील व्यापारी साकीर अमहद हासीन आमलीवाला (वय ४५, रा. वालाड, जि.वापी) यास गुगल पे वरुन ८६ हजार ३०० रुपये मागवून घेतले होते. साकीर याने औषधीची हळद का दिली नाही म्हणून जाब विचारला असता शुभम पाटील हा टाळाटाळ करीत होता. शेवटी साकीर यांनी पाटील यास…