Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी येथील सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी पंडित अटाळे, उपाध्यक्षपदी प्रमोद पाटील तर सचिवपदी मिना लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली. एमआयडीसीतील सुप्रिम कॉलनीतील शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळ या संस्थेची २०२० ते २०२५ या कालावधीसाठी नुकतीच निवडणुक पार पडली. संस्थेची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांनी काम पाहिले तर त्यांना सागर इच्छाराम झांबरे यांनी मदत केली. संस्थेच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी पंडित बाजीराव अटाळे, उपाध्यक्षपदी प्रमोद जगन्नाथ पाटील, सचिवपदी मिना दिनकर लोखंडे, सहसचिव…

Read More

धानोरा, ता. चोपडा ः वार्ताहर धानोरा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली असून सरपंचपदी शिवसेनेच्या सुनिता संतोष कोळी तर उपसरपंचपदी विजय चौधरी ांची निवड करण्यात आली. सुनिता संतोष कोळी यांनी गजानन कोळी यांचा पराभव केला. सुनिता कोळी यांना ९ तर गजानन कोळी यांना ८ मते मिळाली. उपसरपंच विजय चौधरी यांना ही ९ मते मिळाली. त्यांनी सावंत महाजन यांचा पराभव केला. सरपंचपद एस.टी.जनरल निघाल्याने पाच उमेदवार दावेदार होते. तत्पुर्वी सरपंच पदासाठी सुनिता कोळी, रज्जाक तडवी, गजानन कोळी यांनी अर्ज दाखल केले होते. रज्जाक तडवी यांनी माघार घेतली. उपसरपंचपदी विजय चौधरी व सावंत महाजन यांचा प्रत्येकी एक अर्ज आला होता.…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्रीसंत मुक्ताबाई, योगराज चांगदेव महाराज माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी आयोजीत केलेल्या यात्रा पुर्व आढावा बैठकीत सांगीतले. दरवर्षीप्रमाणे आदिशक्ती मुक्ताबाई व योगराज चांगदेव महाराज या गुरू-शिष्य भेटीनिमित्त माघ कृष्ण दशमी ते महाशिवरात्रीपर्यंत भव्यदिव्य यात्रोत्सव साजरा होतो. राज्यभरातील शेकडो दिंड्यांसह लाखावर वारकरी भाविक या वारीत सहभागी होतात. गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे अनेक उत्सव साजरे करताना शासनाने निर्बंध घातले आहे. यावर्षी दि.८ ते १२ मार्च पर्यंत येत आहे. नेमका याच कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने लाकडाऊन नव्याने करण्याचे संकेत आहे. विशेषतः विदर्भातील भाविक जास्त प्रमाणात वारीत सहभागी होतात व तिकडे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारिरीक आंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर प्रभावीपणे करत रहाणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि अमळनेर आदि तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल…

Read More

जळगाव ः परेश बर्‍हाटे पोलीस गाड्यांचा सायरन तसेच रुग्णवाहिकांचे सायरन म्हणजे आपत्कालीन बिगुल (घंटा) समजली जात असतांना त्यांचा म्हणजे सायरन चा उठसुठ वापर एक गम्मत म्हटली जात आहे वास्तवात जेव्हा पोलीस गाडीत वरिष्ठ अधिकारी असतात व त्यांना वाहनाद्वारे महत्वाच्या ठिकाणी जायचे असेल त्यावेळी तसेच रुग्णवाहिकेत गंभीर अवस्थेतील रुग्ण आहे व त्यासउपचारार्थ तातडीने उपचारार्थ रुग्णालयात नेणे अनिवार्य असते तेव्हा रस्ते मोकळे करणे व वाहतूक सुरळीत करण्याकरिता सायरन महत्वाचा ठरतो. जळगाव शहरात मात्र पोलीस वाहनात कोणतेच वरिष्ठ अधिकारी नसतांना ,ठाणे निरीक्षक नसतांना आणि त्याचप्रमाणे बर्‍याच रुग्णवाहिकेत कोणतेच रुग्ण नसतांना अर्थात फक्त चालक असतांना सायरनवाजविले जात असल्याचे दिसून येते.लोक किंवा वाहनधारक त्या सायरनचा…

Read More

पहूर, ता.जामनेर : वार्ताहर जामनेर तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्यैा पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचेच वर्चस्व सिध्द झाले असून ग्रामपंचायत सरपंचपदी आशाबाई शंकर जाधव यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदासाठी राजू रामदास जाधव (राजू भैय्या) यांची वर्णी लागली आहे. काल रोजी दुपारी १२ वाजेपासून ग्रामपंचायत सभागृहात सरपंच उपसरपंच निवडीची कार्यक्रम घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी काम पाहिले. माजी पंचायत समिती सभापती बाबुरावआण्णा घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये सत्ता असून या पंचवार्षिक निवडणुकीतही त्यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. यावेळी सुध्दा ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचे १७ पैकी ९ उमेदवार विजयी झाले होते. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक ७ मार्च रोजी लेडीज इक्वलिटी रनचे आयोजन केले आहे. ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी सुरु असून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . महिलांना धावणे व आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या रनचा उद्देश आहे . त्यानिमित्ताने अकोला येथील सुप्रसिद्ध महिला धावपटू डॉ. अपर्णा पाटील या लेडीज रनसाठी सदिच्छादूत असतील. त्या अकोला येथील प्रसिद्ध श्रीरोगतज्ञ डॉक्टर आहेत . शिवाय नामांकित अशा अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्टस अँन्ड मेडिसीन या संस्थेतून प्रमाणित मॅराथॉन ट्रेनर म्हणून त्यांना मान्यता आहे .त्यांचे वैद्यकीय शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज पुणे व पदव्युत्तर शिक्षण जे जे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील बळीराम पेठेतील लाकडी गणपती मंदिरात गणेश जयंती निमित्त काल श्री गणेश यज्ञाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी व गणेश भक्तांनी यज्ञाचा लाभ घेतला. या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा, उपमहापौर सुनीलभाऊ खडके, स्वीकृत नगरसेवक राजु मराठे, होलसेल भाजीपाला विक्री संघटनेचे अध्यक्ष आत्माराम माळी , दिपक पाटील, प्रशांत माळी, राजू सोनवणे, विजय भाटिया, मिनेश दलाल, प्रीती कोठारी मॅडम, जमनदास भाटिया, अशोकआप्पा भाटिया, अविनाश नेवे, धमेंद्र डाकलिया, दिपक भाटिया इत्यादी मान्यवरांनी लाभ घेतला. तसेच या प्रसंगी गणेश यज्ञ व महापूजेचा मान दिपक भाटिया…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील मुक्ताईनगर ते बर्‍हाणपुर रस्त्यावरील कर्की फाट्यावर मध्यप्रदेशातून साडेचार लाख रुपयांचा गुटखा अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आला. दरम्यान गुटख्यासह ओमनी गाडी अशाप्रकारे एकूण साडेपाच लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सदर कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेत तर्फे करण्यात आली. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक फुलचंद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ठाणे गुन्हे शाखेचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मुक्ताईनगर तालुक्यात मध्यप्रदेशातून अवैधरीत्या गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावरून किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूर रस्त्यावरील कर्की…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच गव्हर्नमेंट सर्व्हन्ट सोसायटी अर्थात ग.स सोसायटीत सध्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ता संघर्ष सुरू झाला आहे.संचालकांनी अध्यक्षांवर आरोप करून राजीनामे देण्याची घटना ताजी असतांनाच दुसर्‍या गटाने अध्यक्ष मनोज पाटलांना तीन अपत्य असल्याची तक्रार केली.त्यात सहकार उपनिबंधकांनी अल्प मतात आल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमले.नंतर दुखावलेल्या पदच्युत अध्यक्षाने दुसर्‍या माजी अध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.या गटातून त्या गटात,विश्वासघात आणि दगाबाजी असा सातत्याने घटनाक्रम चालणार्‍या या संस्थेत असहकार फोफावला आहे.येथे राजकारण स्वार्थी अन् मतलबी झाले असून पोरखेळ चालल्याचे चित्र आहे. सभासदांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार काय असतो ते ग.स.सोसायटीत सध्या चाललेल्या घटनाक्रमावरून लक्षात…

Read More