चाळीसगाव ः प्रतिनिधी नुकतीच दोन दिवसांपूर्वी राज्य शासन व पणन महामंडळाच्या वतीने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यात मुख्य प्रशासक म्हणून दिनेश पाटील यांच्यासह १७ जणांची नियुक्ती करण्यात आली. कोविड संसर्गामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून व्यापार्यांसह शेतकर्यांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे ही बाब लक्षात घेता आज पहाटे ६ वाजता नूतन प्रशासकांनी भेट देत सर्वांना अचंबित केले.यावेळी ईश्वरसिंग ठाकरे, संजय चव्हाण, भीमराव खलाणे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कोतकर आदी उपस्थित होते मास्क लावा, काळजी घ्या अशा प्रकारच्या सुचना देत विक्रीसाठी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकर्यांशी हितगूज केले. योग्य भाव मिळतो का?काही अडचणी आहेत का?असा संवाद साधत…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी खेळाडूंनी कोणताही खेळ चिकाटी व सातत्य ठेवून खेळले व बुद्धिबळसारखा खेळ खेळल्यास खेळाडू हा आपले चांगले करिअर घडवु शकतो त्यामुळे चांगले खेळ खेळा व त्याला आपल्या जीवनात आत्मसात करा असे भावनिक आवाहन जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकसंघर्ष मोर्चा आयोजित शिवजयंतीनिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे,सचिन धांडे, डॉ.ए.जी. भंगाळे, डॉ.विकास बोरोले ,साजिद शेख ,अॅड. विजय पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख,अंकुश रक्ताळे, अनिस शाह,मुकुंद सपकाळे, विष्णू भंगाळे, अयाजअली, मुकेश टेकवानी, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, स्मिता वेद,प्रवीण ठाकरे यांची उपस्थिती होती. समारोपीय प्रस्तावना लोक संघर्षाच्या प्रतिभा शिंदे यांनी सादर…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका शहरात कोणतेच नवीन विकास कामे करीत नाही,पण महापालिकेत जे राबतात त्या कर्मचार्यांचे वेतन तरी वेळेवर मिळायला हवे.आता ते सुद्धा मिळण्याची व्यवस्था नाही .जानेवारी महिन्याचा पगार आज पावेतो कर्मचार्यांना मिळालेला नाही आणि सुट्या आल्यामुळे जानेवारीचे वेतन मिळायचे असेल तर २२ फेब्रुवारी नंतरच मिळेल अशी शक्यता कर्मचार्यांनी सांगितली आहे.त्यामुळे सार्याच अडचणी असल्याचे सांगतानाच याकामी महानगरपालिका आस्थापना विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. जळगाव महापालिका कर्मचार्यांचा वेतनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असा म्हटला जात होता. काही वर्षांपूर्वी तर तीन -चार महिने कर्मचार्यांना वेतन मिळत नव्हते.त्यांना कधी कोणत्या महिन्याचे वेतन मिळाले हे तपासावे लागत होते म्हणजे जानेवारीचे वेतन एप्रिलमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानकात बस रिव्हर्स घेत असतांना अचानक मागच्या चाकात आल्याने कानळदा येथील (अंदाजे वय ६०) वृध्द महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मनमाडहून भुसावळकडे जाणारी बस (क्र.एम.एच.१४-बीटी.०५६४) वरील चालक बसला फलाट क्र.१६च्या समोर रिव्हर्स घेवून लावत असतांना बसचा धक्का लागून देवकाबाई नारायण सपकाळे या पडल्या व बसच्या मागील चाकात आल्या. या अपघातात देवकाबाई यांच्या डोक्यावरुन मागचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला व त्या जागीच गतप्राण झाल्या. या घटनेने काही वेळ बसस्थानकात प्रचंड तणाव निर्माण झाला…
जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने रात्री ११ वाजेच्या सुमारास भव्य मशाल रॅली काढत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजीनगरपासून शिवतिर्थ मैदानापर्यंत मिरवणूक काढत रात्री १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल रात्री अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने रात्रीच शिवजयंती महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मशाल रॅलीमध्ये शेकडो तरुणांसह कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. मशाल रॅली ढोल ताशाच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवाजीनगरमधून मार्गस्थ झाली. रॅलीची सरुवात शिवाजीनगरमधील छत्रपती…
यावल ः प्रतिनिधी यावल नगरपालिका कार्यालयात आज दि.१९ शुक्रवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याहस्ते तसेच यावल नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावल नगरपालिका कार्यालयात ‘राजा रयतेचा’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी बबन तडवी कार्यालयीन अधिक्षक बडे, स्थापत्य अभियंता योगेश मदने, स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे, सहाय्यक कर निरीक्षक निकेतन बयाणी, यावल नगरपालिका वरिष्ठ लिपीक राजेंद्र गायकवाड, वसुली लिपीक अनिल चौधरी, रवींद्र बारी, मधुकर गजरे, श्री.काटकर, संतोष नन्नवरे, असदउल्लाखान अब्दुल्लाखान, रफीक अहमद…
अमळनेर ः प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रमुख व जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांची बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वानमुते बिनविरोध निवड झाल्याबद्दल ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमळनेर बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासनमध्ये मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या ६० वर्षात प्रथम एका महिलेला सभापतिपदाचा कारभार पाहता येणार आहे. अमळनेर येथील बाजार समितीच्या तालुक्यातील नऊ जणांची प्रशासकीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात राज्य शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग मंडळाने मंजुरी दिली असून त्यांच्या निवडीचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले आहेत.…
जळगाव : प्रतिनिधी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे संलग्नित १५०० चे वर बचत गट आहेत. बचतगटाच्या माध्यमातून बँकेशी १५,००० चे वर महिला संलग्नीत झालेल्या आहेत. या माध्यमातून बँक फायनान्शियल इन्क्लुजनचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. बचत गट हे फायनान्शइल इन्क्लुजन साठी महत्वाचे माध्यम आहे. बहुतेक बचत गट हे उद्यमशिल असून बचत गटातील अनेक महिला उद्योजिका आहेत. परंतु त्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होत नसते. त्यातही कोरोनाच्या काळात महिलांना रोजगार मिळणे कठीण झाले होते, तेव्हाही बँकेने विविध प्रकारे रोजगार मिळवून देण्यास मदतीचा हात पुढे केला. महिला स्वावलंबनाचे तसेच सक्षमीकरणाचे कार्यक्रम बँक विविध माध्यमातून राबवत असते. जेणेकरुन त्यातील महिलांना रोजगारसंधी उपलब्ध होईल…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाच्या आदेशानुसार अशासकीय प्रशासक म्हणून एकूण १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.या सदस्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवड २०१५ ते २०२० या कालावधीपर्यंत घेण्यात आली होती. यात सोसायटी हमाल मापाडी, व्यापारी, तज्ञ यासह अन्य अशा १८ सदस्यांची निवड करण्यात आली होती.त्यानुसार १९ सप्टेंबर २०२० रोजी या संचालक मंडळाचा कालावधी संपला होता. त्यानुसार २१ सप्टेंबर २०२० पासून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीची नेमणूक करण्यात आली होती. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटानंतर नुकतेच महाविद्यालय सुरु झाले आहेत. येथील नॉलेज सिटीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु असतांनाच एका माजी नगरसेवकासह चौघांनी कॉलेजच्या आवारातच हैदोस माजवत प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना बेदम मारहाण करत दहशत पसविण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली. या घटनेने जिल्ह्यातील शैक्षणिक जगत हादरले असून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग दहशतीखाली असल्याचे चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, या गुंड प्रवृत्तीविरुध्द शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांची भेट घेत निवेदन दिले आहे. धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी या महाविद्यालयात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक…