Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी चोपडा, जामनेर, एरंडोल येथील शासकीय कोवीड सेंटर मध्ये रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने के. परवीन मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअरच्या माध्यमाने या रुग्णांना दिलासा देऊन फक्त ७४९ रुपयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले त्यावेळी रुग्णांच्या प्रतिक्रिया अत्यंत वेदनादायी अशा होत्या. कोविड महामारी प्रसंगी इंजेक्शनचा तुटवडा, तसेच इंजेक्शनसाठी सुरू असलेला काळाबाजार बघितला असता बिरादरीने सदर प्रकरणी जळगाव व मुंबईच्या आपल्या मित्रपरिवाराशी संपर्क साधून रेमडेसिव्हर उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांना दिलासा मिळालेला आहे. जिल्हा बाहेरील रुग्णांची मागणी जळगाव जिल्हा मध्ये जसा तुटवडा आहे तसाच जिल्हा बाहेरील नाशिक, बुलढाणा, नंदुरबार ,शहादा येथे तुटवडा झाल्याने जळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांना…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील दादावाडी परिसरात पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेले खड्डे तब्बल दोन महिन्यांपासून तसेच सोडून देण्यात आले आहेत. या खड्ड्यात दररोज अवजड वाहने फसतात, रात्रीच्या वेळी दुचाकीधारक, पायी जाणार्‍यांचे अपघात होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. याबाबत अनोखे आंदोलन करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ठिकाणी आमदार आणि खासदारांच्या नावे सेल्फी पॉइंट सुरू केला आहे. दादावाडी परिसरात महामार्गाला लागून असलेल्या मंदिराजवळील रहिवासी परिसरात गेल्या २ महिन्यांपासून फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही हा खड्डा बुजवण्यात आला नाही.आतापर्यंत १५ ते २० मोठी अवजड वाहने या खड्ड्य्ात फसली आहेत. रात्रीच्या वेळी अनेक नागरिकांचा या खड्ड्यांमध्ये अपघात झाला आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वरणगाव येथील तीर्थक्षेत्र नागेश्‍वर महादेव मंदिराला जिल्ह्यातील सर्वाधिक सुंदर तीर्थक्षेत्र बनवू असे संस्थानचे अध्यक्ष चंदक्रांत बढे यांनी सांगितले. या कामांसाठी तत्कालीन मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून २ कोटी ७४ लाख रुपये निधी मंजूर करून दिला होता. त्यातून शुक्रवारी नियोजित कामांचा नारळ वाढवताना बढे बोलत होते. तत्कालिन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी नागेश्‍वर महादेव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ७४ लाख रुपये मंजूर केले होते. या निधीतून सभामंडप, पेव्हर ब्लॉक, उद्यान, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय आदी सुविधांसह तीर्थक्षेत्र नागेश्‍वर मंदिर ते वरणगाव येथील रेस्टहाऊस पर्यंत रस्ता रुंदीकरण, दुभाजक, पथदिवे या कामांचा समावेश आहे. या कामांना सुरुवात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेतील सत्तांतरानंतर प्रथमच महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून पालकमंत्री कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात होते. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. शहराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी केली. या वेळी महापौर आणि उपमहापौर यांनी शहराच्या विकासाबाबत विविध मुद्यांवर मंत्र्यांसोबत चर्चा केली. जळगाव शहर मनपात बहुमत नसतानाही शिवसेनेने आपला भगवा फडकवला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने शिवसेनेच्या जयश्रीताई महाजन महापौर झाल्या. महापौरांनी पदभार स्वीकारला तेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात परतले आहेत. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर…

Read More

यावल ः प्रतिनिधी येथील नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भागासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या वैशिष्ट्यपूर्ण व १४ वा वित्त आयोग योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या जलकुंभ, रायझिंग (मेन जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन) व वितरण व्यवस्थेसाठी जलवाहिनी टाकण्याची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आता पुर्णत्वास आली आहे. याबाबत यावल नगरपालिका माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, यावल नगरपरिषदेची हद्दवाढ सन २०१० मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील काही वसाहती वगळता इतर भागांमध्ये खाजगी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात होता. या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा बाबतच्या अडचणी लक्षात घेता विस्तारीत भागातील सर्व वसाहतींना नगरपरिषदद्वारा शुद्ध व नियमित पाणीपुरवठा…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. यामुळे टंचाई निर्माण होऊन उपचारात बाधा येवू शकते. असा बाका प्रसंग टाळण्यासाठी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी लोकसहभागातून ‘ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर’ची खरेदी होणार आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हाकेस प्रतिसाद देत व्यापारी, मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय आघाडीसह इतर दात्यांनी दोन दिवसांत १८ लाखांचा निधी उभा केला.या रकमेतून आधी दोन ड्युरा सिलिंडर (एक ड्युरा सिलिंडरमध्ये १५ किलो क्षमतेचे ३० सिलिंडर बसतात) खरेदी केले जातील. यामुळे ६५ रुग्णांना सलग ७ तास ऑक्सिजन पुरवठा शक्य होईल. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग ठरेल. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सुविधेच्या ४५ खाटा आहेत. तेथील रुग्णांवर उपचारासाठी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी लेवा सखी घे भरारी जळगाव ग्रुपतर्फे मंगळवारी ‘कळी उमलताना’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र झाले. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली बेंडाळे यांनी किशोरवयीन मुलींना वाढत्या वयातील बदल, समस्या आदींवर मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. मुलींनी लाजेस्तव कोणालाही विचारू शकत नाहीत, अशा प्रकारचे प्रश्‍न आयोजकांकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ते प्रश्‍न कार्यक्रमाचे दरम्यान डॉक्टरांना विचारले. स्त्रीसुलभ समस्यांवर योग्य उपाय, नकळत झालेल्या चुकांचे आरोग्य, मानसिकता,आयुष्यावर होणारे दूरगामी परिणाम, अजाण वयात कोणावर विश्‍वास ठेवावा. शारीरिक बदलाला कसे सामोरे जावे, अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले.यशस्वीतेसाठी डॉ.भारती वसंत ढाके, डॉ. नीलम विनोद किनगे, सविता अनिल भोळे, डॉ. स्मिता पाटील यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयातर्फे येथील नेहा महेश मोता याविद्यार्थीनीला ‘मेरीट-कम-मिन्स’ (एमसीएम) अंतर्गत २०२०-२१ या वर्षाची १० लाख ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. श्री कच्छी दशाविशा ओसवाल जैन समाजाचे सदस्य महेश कांतीलाल मोता यांची नेहा ही कन्या आहे. जिल्ह्यातून तसेच जैन समाजातून केंद्र शासनाची मोठी शिष्यवृत्ती मिळवणारी नेहा ही एकमेव विद्यार्थीनी असल्याची शक्यता आहे. नेहा आयआयएम बंगळुरू मध्ये एमबीएच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. तसेच पुण्याच्या गव्हर्मेन्ट इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) ची पदवी तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. नेहाने शालेय जीवनापासून विविध शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. यात इयत्ता सातवीतील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती (२००८),एनसीइआरटी,…

Read More

जळगाव : जिल्हा प्रतिनिधी धरणगाव शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. यासर्व परिस्थितीवर कालच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील आणि रविंद्र कंखरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली होती.रात्री जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी अचानक धरणगाव ग्रामिण रुग्णालयाला भेट देवून पहाणी केली. याप्रसंगी रविंद्र कंखरे यांच्यासह पालिकेतील सेनेचे गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, राहुल रोकडे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल रात्री अचानक येथील ग्रामिण रुग्णालयाला भेट देवून पहाणी केली. येथील औषधी साठा व कर्मचार्‍यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकार्‍यांच्या या भेटीला पालकमंत्र्यांचे समर्थक रविंद्र…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी २९ चारचाकी आणि ७० दुचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्तेही वाहने पोलिस दलाला सुपूर्द करण्यात येणार आहेत. जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पोलिस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीने २४ जानेवारी २०२१ रोजी २९ महेंद्रा बोलेरो (बीएस-४)…

Read More