Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी माहे रमजानचे चंद्रदर्शन सोमवारी रात्री न झाल्याने रमजान पर्वला बुधवारपासून सुरुवात होईल.पहिली तरावीहची नमाज मंगळवारी रात्री होईल व रोजा (उपवास) बुधवारी होईल असे जळगाव रूहते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना उस्मान कासमी यांनी घोषित केले. सोमवारी संध्याकाळी जामा मसजीद येथे रूहते हिलाल कमिटीची सभा झाली.यावेळी शहरे काजी मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी चंद्र दर्शनाची पार्श्‍वभूमी समजावून सांगितली. या सभेत मर्यादित मशिदीचे इमाम व विश्‍वस्त यांना आमंत्रित केले होते त्यात प्रामुख्याने मौलाना जाकिर देशमुख, हाफिज रेहान बागवान , हाफिज वसीम पटेल ,मौलाना जुबेर , यासह सय्यद चॉंद, इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख ,मुकीम शेख ,अश्फाक बागवान, अनिस शाह, ऍड.सलीम शेख,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हास्तरीय समितीमार्फत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून कमाल १०० पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड केली जाते. पात्र कलावंतांना दरमहा श्रेणी निहाय मानधन दिले जाते. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या जोडीदाराला ते देण्यात येते. ज्या कलावंतांनी कलेच्या क्षेत्रात किमान १५ वर्ष सेवा करणार्‍या व वय ५० वर्षे पूर्ण आहे, ज्यांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, असे साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी ही योजना असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून ५० वर्षावरील कलावंतांना मासिक मानधन सुवर्णसंधी अशी बातमी प्रसारित होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना मासिक मानधन देण्याची…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. खासगी रुग्णालयदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. महापालिकेने कोविड केअर सेंटरमध्ये किमान ५० ऑक्सिजन बेडची सुविधा करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक महेश चौधरींनी आयुक्तांकडे केली. होम क्वारंटाइनसाठी रुग्णांचे हाल होत असल्याने पूर्वीप्रमाणे त्या-त्या भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांना अधिकार प्रदान करण्याची विनंती केली आहे. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने कोविड सेंटर व रुग्णालयांत गर्दी झाली आहे.खासगी रूग्णालये फुल झाल्याने ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांची फरपट होत आहे. अशा अवस्थेत मनपा कोविड केअर सेंटरमध्ये ५०…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी मिळालेले ५ कोटी रुपये ३१ मार्चपूर्वी खर्च न केल्यामुळे हा निधी शासनाला परत गेला आहे. या निधीतून ७ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम करण्यात येणार होते. दरम्यान, प्रशासनाने टेंडर प्रक्रिया आणि तांत्रिक कामे वेळेत न केल्याने ही अडचण निर्माण झाल्याचा आरोप करीत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या वेळी उपाध्यक्ष लालचंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, सर्व विषय समित्यांचे सभापती, सदस्य नानाभाऊ महाजन, शशिकांत साळुंखे, रावसाहेब पाटील, मधुकर काटे, अमित देशमुख, पवन सोनवणे…

Read More

महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र ज्या राज्यांत निवडणुका आहेत अशा राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना कसे दिसत नाहीत, अशी शंका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केली आहे. मुंबई: राज्यात करोनाच उद्रेक झाला असून दिवसेंदिवस नव्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशातील राज्यांच्या विचार केल्यास सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना ज्या राज्यात निवडणुका आहेत अशा राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना कसे दिसत नाहीत, अशी शंका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केली आहे. केवळ महाराष्ट्रातच करोनाचे रुग्ण का वाढत आहेत आणि जेथे निवडणूक आहे अशा राज्यांमध्ये रुग्ण का वाढत नाहीत, याचा अभ्यास…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत चर्चा केली जात आहे. मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची टास्क फोर्सची बैठक (task force meeting) सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत विचारविनिमय केला जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित…

Read More

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घराजवळ स्फोटके लावणे आणि मनसुख हिरेनच्या  हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करताना मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अडचणी येत आहेत. या प्रकरणात सचिन वाझे  न्यायालयीन कोठडीत आहे, तर त्याचा साथीदार रियाज काझी यालाही १६ एप्रिलपर्यंत NIA कोठडी देण्यात आली आहे. स्फोटकेप्रकरण आणि हत्या यात अडचणी वाढू लागताच संबंधित पोलिसांचे वरिष्ठांकडून निलंबन होणे आणि काही दिवसांनंतर त्यांना अटक होणे, असे चक्र सुरू आहे. आधी API पदावरुन सचिन वाझे निलंबन झाले. नंतर त्याला एनआयएने १३ मार्च रोजी अटक केली. अटक केल्यापासून पाच वेळा एनआयएने वाझेची कोठडी वाढवून घेतली. अखेर २७ दिवसांच्या एनआयए कोठडीनंतर सचिन वाझे याची १४…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज त्याला ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहराला लागून असलेल्या वाघनगर आणि परिसरातील जनतेसाठी वाघूर धरणावरून पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्ण झाली आहे. शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. योजना कार्यान्वित झाल्याने परिसरातील ३० हजार नागरिकांची भटकंती थांबणार आहे. वाघनगरसह परिसरातील कॉलन्या या महापालिका हद्दीत असल्या तरी त्यांचा समावेश जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होतो. सावखेडा ग्रामपंचायतीच्या या भागासाठी वाघूर धरणावरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या या योजनेची दोन दिवसांपूर्वी चाचणी यशस्वी झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ही योजना कार्यन्वित करण्यात आली. गेल्या निवडणुकीत ही योजना पूर्ण करण्याचे आश्‍वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. वाघूर धरणातल्या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरीकांची अडवणूक होवू नये,याकरीता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त येणार्‍या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निश्चित केला आहे. मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे. टाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये…

Read More