Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन श्री संघ, भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२१ तर्फे २१ ते २५ एप्रिल दरम्यान सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सार्वजनिक कार्यक्रम न घेता ऑनलाइन हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. ह्या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व डॉ. अमृता मुंडे हे उपस्थित होते. अध्यक्ष दलीचंद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमर जैन, संजय रेदासनी, विशाल चोरडीया, प्रियेश छाजेड, आनंद श्रीश्रीमाल, मुकेश सुराणा, सचिन चोरडीया, नरेंद्र बंब, अनिल पगारिया, हर्षाली पारख, विपीन चोरडीया हे परिश्रम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदिरानजीक भरधाव जाणार्‍या टाटा सुमोने दुचाकीस समोरुन जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होत जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील दुसरा तरुण जखमी झाला आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील अमोल संभाजी पाटील (वय २२) व गोलू रमेश पाटील हे दोन्ही तरुण दुचाकी बजाज प्लॅटीना (एम.एच.१९-डीएम.७६३६) ने जळगावकडे येत असताना ममुराबाद जळगावदरम्यान मनुदेवी मंदिराजवळ जळगावकडून ममुराबादकडे जाणार्‍या टाटा सुमो (एम.एच.१९-एएक्स.५६५१) ने दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील अमोल संभाजी पाटील हा गंभीर जखमी झाला व जागीच गतप्राण झाला. दरम्यान, टाटा सुमोवरील चालकाने अपघाताच्या…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी यावल-बोरावल रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिसांनी पकडून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने वाळू वाहतूक दारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यावल-बोरावल-पिंपरी शेळगाव बॅरेज रस्त्यावर नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर तापी नदी असल्यामुळे तापी नदी परिसरात आणि खोर्‍यातून, नदी-नाल्यातून अवैध वाळू, माती आणि गाळ वाहतूक यावल बोरावल रस्त्याने रात्रंदिवस सुरू आहे. यावल पासून यावल-बोरावल-शेळगाव बॅरेज-असोदा, भादली मार्गे जळगाव हा फक्त २८ ते ३० किलो मिटर अंतराचा रस्ता आहे. तसेच हा रस्ता गेल्या वर्षी नऊ-नऊ मीटर रुंद अंतराचा डांबरीकरण झाल्याने या रस्त्याने इतर वाहनांची वर्दळ तापी नदीवर पूल नसले तरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा एस.टी. डेपो व्यवस्थापकांनी आपल्या कर्मचार्‍यांना लसीकरणाबाबत पत्र जारी केले होते. मात्र कर्मचारी शहरातील लसीकरण केंद्रावर गेल्यावर त्यांना तुम्हाला आम्ही लस देवू शकत नाही, असे सांगून परतविले. दरम्यान, कर्मचार्‍यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली असता याबाबत कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, एस.टी. कर्मचारी आपातकालीन परिस्थितीत आपले कर्तव्य चोख बजावत आहे. त्यामुळे शासनाने एस.टी. कर्मचार्‍यांना लसीकरणाबाबत निर्देश जारी केले आहे. यावरुन एसटी मंडळाच्या संबंधित विभागाने आपल्या वाहक व चालक कर्मचार्‍यांना लसीकरणासंबंधात अधिकृत पत्र…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी तालुक्यातील आशा वर्करांना तोंड दाबून बुक्क्याचा मार, याप्रमाणे महिलांची डिलिव्हरी झाल्यास कुठलेही दवाखान्यात दाखवा, नाहीतर तुम्हाला घरी बसावे लागेल, अशी धमकी खुलेआम अधिकार्‍यांकडून देण्यात येत असून आशा वर्करांनी काय करावे, असा प्रश्‍न आशा वर्करांमध्ये उपस्थित होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चार पीएससी असून त्यामध्ये दोनशे ते अडीचशे आशा वर्कर काम करत आहेत. त्यांना कुठल्याच प्रकारचा पगार मिळत नसून ते मानधनावर काम करत आहेत. मानधन सुद्धा नसल्यासारखे त्यांना मिळत असून ते आपले काम परिपूर्ण बजावत असून त्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून धमकावले जात आहे. मुक्ताईनगर जुने गाव ठिकाणी असलेले जुने बसस्थानकात तालुका उपकेंद्र दवाखाना असून ज्यामध्ये साधे दवाखान्यामध्ये लागणारे कुठलेही उपकरण…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे. त्यासाठी विविध उपक्रम घेऊन जनजागृती निर्माण करण्याची गरज ओळखून जेसीआय डायमंड सिटी व रोटरी स्टार्स तर्फे वाचनाची गोडी टिकवण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. झूम प्लॅटफॉर्मवर जेसीआय जळगाव डायमंड सिटी मार्फत झोन समन्वयक जिनल जैन यांच्याकडून ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये वाचन प्रेरणा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिनल जैन म्हणाले की, तरुणांमध्ये तसेच ग्रामीण भागातील काही भागांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर त्यांच्यासमोर तशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.वाचनानेच माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ, वर्तमानपत्र, थोर पुरुषांची पुस्तक, आत्मचरित्र हेच…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी कोरोना सारख्या भीषण संकटात एकमेकांना मदत करणे आपल्या सारख्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि बहुतांश नागरिक आपले कर्तव्य चोख बजावतही आहेत. अनेक समाजसेवी निरपेक्ष भावनेने आपआपल्या परिने होईल तेव्हढी मदत करत आहे. ही मदत उपकार नसून एक सामाजिक कर्तव्यच आहे. अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील उपक्रमशील शिक्षक यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात कोल्ड-हॉट वॉटर ही मशिन भेट दिली आहे. भुसावल ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर येथे कोल्ड-हॉट वाटर मशीन ची कोविड रुग्णांना गरज आहे, अशी माहिती समाजसेवी कडून श्री.र.न.मेहता हिन्दी प्राथमिक विद्यामंदिर, येथील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांना समजले असता. त्यांच्या सेवानिवृत्त शिक्षिका आई वत्सला…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शिवसेना, युवाशक्ती फाऊंडेशन व युवा विकास फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशिय विकास संस्था संचलित सरदार वल्लभभाई पटेल क्वॉरंटाईन सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन आंबेडकर मार्केटजवळ, बी.एस.एन.एल. ऑफीसमागे जळगाव येथे ना नफा ना तोटा या तत्वावर ३० बेडेड क्वॉरंटाईन सेंटर सुरु करण्यात आले. सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुलकर्णी, डॉ.ए.जी.भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा केमिस्ट अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झंवर, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.किरण पाटील, ललित चौधरी, कुंदन काळे…

Read More

जळगाव : विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध लावल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद आहे . हॉकर्स, फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते यांचेही व्यवहार बंदच आहेत. तरी सुद्धा काही लपून-छपून व्यवसाय करतात , त्यांच्यावर अतिक्रमण विभाग कारवाई करीत आहे. त्यात काहींवर कारवाई तर काहींना सूट दिली जात असल्याच्या तक्रारी असल्याचे समजते अर्थात तोंड पाहून कारवाई केली जात असल्याने हातावर पोट भरणारांनी संताप व्यक्त केला आहे . ज्यांची ‘‘टीप‘‘ मिळते त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात असतांना साने गुरुजी चौकातील फळ विक्रेत्यांचा प्रचंड पसारा चालतो कसा असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कडक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या आपत्तीत जिल्हावासियांना आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा वेळीच उपलब्ध होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी शासन व प्रशासनाने लागू केलेले निर्बंध हे जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे त्याचे सर्व जिल्हावासियांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्री ना. पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रीमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देऊन सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांसह जिल्ह्यात आवश्यक असलेल्या बाबींचा उहापोह केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास…

Read More