जळगाव ः प्रतिनिधी रविवारी मध्यरात्रीनंतर मृत झालेल्या ११ वर्षीय मुलीचा मृतदेह आज सकाळी कबरीतून काढून शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेने पिंप्राळा परिसरात एकच खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय ठरला आहे.ही मुलगी अपशकुनी आहे या समजातून तिचा सातत्याने छळ करणार्या सुशिक्षित बापानेच तिला मारले असावे, असा संशय त्या मुलीच्या मामाने एका अर्जाद्वारे पोलिसांकडे व्यक्त केल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले असून शवविच्छेदन अहवालानंतर कारवाईबाबत पोलिस निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे. पिंप्राळातील हुडको वसाहतीत तीन महिन्यांपूर्वीच राहायला आलेल्या जावेद अख्तर शेख या केमिस्टचे काम करणार्या तरुणाची ही मुलगी आहे. तिचा एक काका डॉक्टर तर दुसरा वकील आहे. तिच्या जन्मानंतर काही दिवसांत जावेदच्या आईचे…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी अचल संपत्तीबाबत वारस नोंद करतांना पाळधी बु॥ येथील तलाठ्याने कुठलीही चौकशी न करता आलेल्या अर्जावर एकाच दिवसात पोलीस पाटलाच्या दाखल्यावरुन वारस नोंद लावत स्वत: सर्कल, तहसिलदार व न्यायाधीशाचीही भूमिका बजावत वारस नोंद लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पाळधी बु॥ तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या महाशयांना कुणाचा वरदहस्त आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान, सदर प्रकाराबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी असा सूर सुज्ञ नागरिकांमधून येत आहे. याबाबत समजलेले हकीकत अशी की, पाळधी बु॥ येथील रहिवासी राजेंद्र प्रल्हाद नन्नवरे यांचा ८ फेबु्रवारी २०२१ रोजी मुंबई येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात…
यावल ः ता.प्रतिनिधी यावल व रावेर तालुक्यात गेल्या एक ते दोन महिन्यापासून काही खाजगी फायनान्स कंपन्यांच्या एजंटांनी लोनचा ईएमआय हप्ता भरण्याचा तगादा लावल्याने ग्रामीण भागातील महिलांचे, नागरिकांचे, लहान व्ययसायिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जसे काही त्यांच्या आनंददायी जीवनावर विरजण पडले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावल व रावेर तालुक्याचे शासन प्रशासनाकडून कोरोना आटोक्यात आणणेसाठी खुप प्रयत्न सुरु आहेत मात्र लॉकडाऊन काळात अनेकांना लोनचे हप्ते भरणे मुश्किल झाले आहे.लोनचा १ ईएमआय मासिक हप्त्याचा एक दिवस चुकला तर कर्जधारकाकडून ५०० ते २००० हजार रुपयापर्यंत पेनल्टी/व्याज/ किंवा दंड वसूल करण्यात येत असल्याने खाजगी फायनान्स कंपन्यांकडून लोन घेणारे वैतागले आहेत. या अनधिकृत…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनामुळे रक्त टंचाई निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपतर्फे मंगळवारी हनुमान जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भाजप जिल्हा महानगरतर्फे सकाळी ९ ते ११ दरम्यान मंडल क्रमांक ४ व ९ येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी ९ वाजता मंडल ४ नंदनवन कॉलनी येथे सृष्टी हॉस्पिटलमध्ये आमदार राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते श्री हनुमान प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिराचे नियोजन मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, नीलेश कुलकर्णी यांनी केले. नगरसेविका दीपमाला काळे, धीरज वर्मा, ललित लोकचंदाणी यांनी रक्तदान करून सुरुवात केली.या प्रसंगी प्रदेश…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेची सर्वसाधारण ऑनलाईन सभा मंगळवारी डॉ. ए. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राचार्य डॉ.किसन पाटील व प्रा. भास्कर पाटील यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागा आणि एकूण नवीन कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. याप्रसंगी दोन्ही मान्यवर साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे क्रियाशील उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच महाराष्ट्रातील दिवंगत थोर साहित्यिक, समीक्षक, विचारवंत, कलावंत, प्राध्यापक, शिक्षकांनाही सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी परिषदेचे डॉ. किसन पाटील आणि प्रा. भास्कर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याबद्दल मार्गदर्शन केले.…
जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी धरणगाव येथील ऍड.वसंतराव भोलाणे व माजी नगरसेविका चंद्रकलाताई भोलाणे यांचे सुपुत्र डॉ.शुभम भोलाणे आज अंतिम वर्षाची एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाला.शुभम हा कॉलेजचा जनरल सेक्रेटरी तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचा कौन्सिल मेंबर, विद्यार्थी परिषदेची मेडिव्हिजन प्रदेश संयोजक असून त्याचा सेवांकुरच्या माध्यमातून घेतलेल्या अनेक आरोग्य शिबिरात (चित्रकूट, कन्याकुमारी, झारखंड) त्याचा सहभाग होता. तो सध्या प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून काम करीत आहे.अनेक सामाजिक जबाबदारी त्याने यशस्वीपणे पेलल्या आहेत.डॉ.शुभम भोलाणेे हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज,जळगावचा विद्यार्थी होता.या निमित्ताने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे डॉ. शुभम भोलाणे यांचे ‘साईमत.’चे संपादक प्रमोद बर्हाटे, व्यवस्थापक सुनिल अहिरे, भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष (शहरी)…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्ंगत जळगाव दूध संघास मिल्कोस्कॅन सयंत्र (एफटी) १०० टक्के अनुदानाने इंडीफास या कंपनीकडून उपलब्ध झाले आहे. या सयंत्राची किंमत ८५ लाख रुपये असून, या सयंत्राचे उद्घाटन काल रोजी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते व दूध संघाच्या चेअरमन सौ.मंदाकिनीताई खडसे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला संघाच्या संचालिका सौ.शामलताई झांबरे व कार्यकारी संचालक मनोज लिमिये यांचीही उपस्थिती होती. मिल्कोस्कॅन सयंत्राद्वारे दूधातील स्निग्धता, फॅट सोडून इतर घनघटक, प्रथिने, कबोर्दके, आम्लता या पोषकतत्वांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात येणार आहे. या पोषकतत्वासह दुधात होणारी भेसळदेखील पकडणे सहज शक्य होणार आहे. या अत्याधुनिक सयंत्रामुळे या…
पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांचा २८ एप्रिल रोजी येणारा वाढदिवस ते कोरोनाच्या आपत्तीमुळे साजरा करणार नसून कुणीही आपल्याला शुभेच्छा देण्याऐवजी कोरोनाग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे. याबाबत वृत्त असे की, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा पाळधी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा २८ एप्रिल रोजी वाढदिवस येत आहे. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन, फलक वा जाहिराती आदींना मज्जाव केला आहे. सध्या सुरू असणार्या आपत्तीमुळे कुणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठीसुध्दा येऊ नये असे त्यांनी सूचित केले आहे.जर कुणाला…
चाळीसगाव ः प्रतिनिधी लष्करातील जवान फौजी नेहमी सीमेवर आपले रक्षण करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, थंडी अंगावर झेलत बारा महिने सर्व ऋतू आपली सेवा अत्यंत कठोरपणे बजावत असतात. बायको, मुले, आई, वडील यांच्यापासून लांब हा सैनिक आपले कर्तव्य पार पाडतो आणि परिवाराच्या भेटीसाठी काही दिवसांच्या सुट्टीवर घराकडे येतो मात्र नितीन पाटील हे फौजी आपले कर्तव्य बजावत असताना काही दिवसांच्या सुट्टीवर घरी आले असले तरी या कोरोना महामारीतील ही भयंकर परिस्थिती पाहून रुग्णसेवेसाठी सतत काम करीत आहेत. मग ते रुग्णांच्या नातेवाइकांना धीर देण्याचे काम असो किंवा शहरातील दवाखान्यांमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटला जेवणाचा डबा पुरवण्याचे काम असो, वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवारातर्फे चाळीसगाव…
जळगाव : प्रतिनिधी येथील दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांची २०२१-२०२६ या कालवधीकरिता निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक (सांगली) एन.डी. करे यांचेकडून राबविण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज २४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता बँकेच्या सभासदांची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने व्हिडिओ कॉन्फरन्स / ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे घेण्यात आली. सदर सभेस ऑनलाईन पध्दतीने सुमारे ६०० पेक्षा जास्त सभासदांची उपस्थिती होती. सभेच्या सुरूवातीस बँकेच्या बोर्ड सेक्रेटरी श्रीमती स्वाती सारडा यांनी बँकेच्या नियमानुसार कोरम पूर्ण असल्याने सभेस सुरूवात करण्यासाठी सभेचे सूत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सुपूर्द केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभेला सुरूवात करून निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द केल्यापासून आजच्या सर्वसाधारण सभेपर्यंत झालेल्या प्रकियेच्या…