मुंबई : सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे कला क्षेत्रात मोठे संकट उभे ठाकले आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार…
Author: saimat team
देशातील सर्वात लोकप्रिय ऑटोमोबाइल कंपनी पैकी एक असलेल्या रॉयल एनफिल्डने आपल्या काही मॉडेल्सला परत मागवले आहे. काही बाइक्समध्ये वापरलेल्या पार्ट्सपैकी एकात त्रुटी आढळली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, बाइकच्या इग्निशन कॉइलमधून मिसफायरिंग होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बाइकच्या परफॉर्मेंसवर परिणाम होईल. तसेच, काहींमध्ये या त्रुटीमुळे शॉर्ट सर्किट होण्याची देखील शक्यता आहे. या त्रुटीमुळे रॉयल एनफिल्डने Bullet ३५०, Classic ३५० आणि काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Meteor ३५० बाइकच्या २,३६,९६६ यूनिट्सला परत मागवले आहे. कंपनीने स्वतःहून या गाड्या परत मागवल्या आहेत. यात डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये निर्मिती झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. कंपनीने डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ मध्ये तयार झालेल्या Meteor ३५० ला परत…
नवी मुंबई : प्रतिनिधी राज्यात सरकारने कडक लॉकडाऊन (Lockdown) घोषित केले आहे. तसेच कठोर निर्बंधही लादले आहेत. या निर्बंधामुळे वॉकिंगला (Morning walk) बंदी असतानाही सिडकोच्या एका अभियंतांनी (CIDCO engineer) नियमाचे उल्लंघन केले. या अभियंतावर तीन वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वॉकिंग करणे थांबवणार नाही म्हणत त्यांनी आगाऊ पाच हजार रुपयांचा दंड पालिकेला भरला आहे. या घटनेवरून शासकीय अधिकारीच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट दिसून येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहे. या काळात सरकारने मॉर्निंग वॉक करण्यावरदेखील बंदी घातली आहे. यामुळे सर्व वॉकच्या ठिकाणांवर पालिकेमार्फत नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. चार महिन्यांत १ हजाराहून अधिक व्यक्तींवर दंडात्मक…
मुंबई : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील कोकण दौरा करणार आहेत. येत्या शुक्रवारपासून उद्धव ठाकरे हे कोकणात असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून गावकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. यानंतर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेत मदत देण्यावर चर्चा केली जाईल अशी माहिती आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा आर्थिक तडाखा दिला…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना सारख्या आजाराला धीराने तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत, या आजारात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध न होणे, जीवरक्षक औषधी व इंजेक्शन चा तुटवडा यामुळे अनेक कुटुंबाने जिवाभावाची माणसं गमावली आहेत, तर अजूनही असंख्य लोकांची विविध प्रकारच्या उपचारासाठी धावपळ सूरु आहे, आज गृह विलगीकरणात असलेल्या बर्याच रुग्णांना ऑक्सिजन कंसेंटेटर ची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करता यावी यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि., मुंबई च्या वतिने २५ ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध करून देण्यात…
चाळीसगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने खतांच्या किमतीत केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील व पदाधिकार्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. खतांची दरवाढ मागे न घेतल्यास पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, देण्यात भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार…
जळगाव : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना अत्यावश्यक कामासाठी पीपीई किट घालून प्रवेश दिला जात आहे. ज्या नातेवाइकांची हलाखीची परिस्थिती आहे अशांना ६० जणांना भरारी फाउंडेशन व के. के. कॅन्सतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइक महिला व पुरुषांची राहण्याची व्यवस्था पद्मावती मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मुक्कामी असलेल्या रुग्णांच्या ६० नातेवाइकांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, उद्योजक रजनीकांत कोठारी, उद्योजक अमित भाटिया यांच्या हस्ते पीपीई…
चोपडा : तालुका प्रतिनिधी देशासह जगभरात कोरोना या आजाराच्या संसर्गजन्य आपत्कालीन परिस्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्र प्रशासन कार्यतत्परतेने प्रयत्न करीत आहे. त्यातच लॉकडाऊन च्या काळात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असतांना अवैध धंदे मात्र जोरात सुरू आहेत. अवैध पध्दतीने जमाव करून सुरू असलेले जुगार, झन्ना- मन्ना, देशी – विदेशी दारू विक्री, कत्तलीच्या उद्देशाने गौ तस्करी सारखे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंद्याचा जोर चांगलाच वाढलेला दिसतोय शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत आणि त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत.राजकीय वरद हस्ताने सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद…
भुसावळ : प्रतिनिधी प्रसुती वेदना वाढल्याच्या बिकट स्थितीत कोरोना पॉझिटिव्ह २१ वर्षीय गरोदर महिला डॉ. वीरेंद्र व प्रणीता झांबरे यांच्या प्रतिभा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. या महिलेवर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर कोणताही धोका नको म्हणून नवजात बाळाला १० दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. आईला कोरोना असला तरी बाळ मात्र सुरक्षित राहिले. दरम्यान, दहा दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती ठणठणीत झालेल्या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा शब्दही कानावर पडता की भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यातच गरोदर महिला कोरेाना पॉझिटिव्ह आढळल्यास अनेकवेळा डॉक्टरही उपचारासाठी नकार देतात. असाच एक प्रसंग न्हावी (ता.यावल) येथील सुचिता राहूल चौधरी (वय २१) यांच्यासोबत घडला. सुचिता यांचा…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील भराडी येथे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भराडी येथे नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेऊन,व वाढदिवसावर वायफळ खर्च न करता गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या युवकांसाठी सुसज्ज असे वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयासाठी भाजपा कार्यकर्ते आनंदा जंजाळ यांनी पुस्तक उपलब्ध करून दिली. तसेच गावात विविध समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्यात आली.यात लॉक डाऊन काळात निराधार ,विधवा, दिव्यांग नागरिकांना अन्न धान्य किट वितरण करण्यात आले. व गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध व्हावी या दृष्टीने वाचनालय सुरू करण्यात आल्याचे आनंदा जंजाळ यांनी सांगितले. वाचनालयाचे भाजपा पाळधी गट प्रमुख नाना पाटील यांच्या हातून उद्घाटन करण्यात…