Author: saimat team

नागपूर : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालयाने (ED) गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकून झडती सुरू केली आहे. शिवाजी नगरातील सागर भटेवरा, सदर येथील सुमित आयझॅक यांच्यासह जाफर नगरातही आणखी एका ठिकाणी इडीच्या टीमकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळत आहे. भटेवरा आणि आयझॅक हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार मानले जातात. याची कुणकूण लागल्यानंतर इडीने हा छापा टाकल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या टीम या संदर्भातील कागदपत्रे खंगाळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या विरोधात प्राथमिक तपास करून त्या आधारावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या कामकाजासंदर्भात जयवंत भोईटे हे संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराच्या कामाबाबत वैचारीक व कायदेशीर लढाई लढत आहे. या लढ्यात ते न्यायी लढाई लढत असून संस्थेतील मानद सचिव निलेश भोईटे यांच्या गैर कारभाराबाबत नियमीत आवाज उठवतात. त्यामुळे निलेश भोईटे व त्यांच्या हस्तकांकडून जयवंत भोईटे यांना वारंवार धमक्या देण्यात येत होत्या. मात्र काल रात्री या घटनेचा कडेलोट झाला व निलेश भोईटे यांनी त्यांच्या हस्तकांसह जयवंत भोईटे यांच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, याबाबत जयवंत भोईटे यांच्याकडून पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्यानंतरही दखल न घेतली गेल्याने आज हा प्रकार झाला. एखाद्याचा बळी जाण्याची पोलीस…

Read More

जामनेर : प्रतिनिधी सध्या देशासह जगात कोरोनाच्या महामारीचे संकट घोंगावत असतांना भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या महामारीत जनता भयभीत आहे. देशात सर्वच राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे आहे. अशा अवस्थेत जगणे मुश्किल झाले असतांना केंद्र सरकार मात्र जनतेला दिलासा देण्याऐवजी इधन दरवाढ करत मृत्यूच्या खाईत ढकलत असल्याची भावना जनमानसात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर इंधन दरवाढीच्या विरुध्द राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निदर्शने व आंदोलने सुरु आहे. आज सकाळी जामनेर येथे केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ धोरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी तहसिलदार अरुण शेवाळे यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीच्या संकटकाळात केंद्र सरकारने…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात जिल्ह्यात आदर्श निर्माण केलेल्या पहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन पहूरकरांचे मदतीचे हात पुढे सरसावले असून दीड लाख रुपये किमतीचे साहित्य तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहे. याप्रसंगी दात्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पहूर शहर पत्रकार संघटनेच्या पुढाकाराने पहूर ग्रामीण रुग्णालयास लोकप्रतिनिधी , व्यापारी , डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन आणि दातृत्ववान ग्रामस्थांच्या सहकार्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर , निवारा शेड , कुलर्स , पंखे , व्हीलचेयर , बेडशीट्स , बकेट्स , मेडिसिन इत्यादी आवश्यक साहित्य प्राप्त झाले. ग्रामीण…

Read More

चोपडा : प्रतिनिधी पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक असून प्रशासना सोबत सर्वच परिस्थितीत काम करत असतो.कोरोना काळात सुद्धा पत्रकार समाज जागृतीचे कार्य आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत.त्यामुळे पत्रकार बांधवांना फ्रंट लाईन्स वर्कर चा दर्जा देऊन त्यांना परिवारासह कोविड लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा आशयाचे निवेदन चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने अध्यक्ष शाम जाधव,सचिव लतीश जैन यांनी तहसीलदार अनिल गावीत यांना दिले होते. सदर निवेदनाची दखल घेत चोपडा तहसीलदार अनिल गावीत यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांना सूचना केली होती. त्याअनूशंगाने २२ रोजी चोपडा नगर परिषदेच्या रुग्णालयात दुपारी ३ वाजता पत्रकार व त्यांच्या परिवारा…

Read More

जळगाव : वृत्तसंस्था यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात रविवारी गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. पहाटे काकडा आरतीसह विविध धार्मिक विधी पार पडले. होम हवनानंतर वासुदेव बाबा भजनी मंडळाने भजने सादर केली. कोरोनाच्या संकटापासून जगाला मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली. श्री समर्थ सदगुरू सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ सदगरू वासुदेव बाबा कर्मभूमी चुंचाळे येथे, रविवारी वैशाख शुध्द बारसनिमित्त गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार येथील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. साजरा होणारा गुरु श्री समर्थ…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी महिलेची फसवणूक करून गाळे खरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आधी महिलेचे ६० लाख ७० हजार रूपये अदा करावेत, नंतरच जामीनसाठी अर्ज करावा असे निर्देश सर्वाच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पैसे भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. यावर आता अनिल चौधरी काय भूमिका घेतात यावर लक्ष लागुन आहे. याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथील सनांसे नामक महिलेकडून रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन शहरातील एका व्यापारी संकुलातील गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनिल चौधरी यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या…

Read More

मुंबई : “तोक्ते चक्रीवादळाची (Touktae Cyclone) सूचना मिळाल्यानंतरही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि दोषी असेल त्यांना शिक्षा द्या” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. “तोक्ते चक्रीवादळाच्या धोक्याबाबत सरकार व संबंधित यंत्रणांनी अलर्ट दिलेला असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष केला. ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. एक बार्ज बुडून ३७ कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही काही कामगार बेपत्ता आहेत. शेकडो कामगार मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने व तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या सर्व…

Read More

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये भारत सरकारवर कडक टीका होत असताना, राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बीबीसी’ (BBC) सारखे नवे चॅनेल सुरू करण्याची योजना आखली आहे. याच पार्श्वभूमीवर सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या अधिकाऱ्याने याबाबत इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, निविदा काढण्यात आली आहे. आणि बर्‍याच वर्षांपासून यावर विचार सुरू होता. १ मे रोजी सल्लागारांच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आली आहे. दूरदर्शनला जागतिक स्तरावर नेण्यासाठी डीडी इंटरनॅशनलची स्थापना करण्यात आली आहे. ‘प्रख्यात जागतिक सल्लागारांकडून या प्रकल्पाबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारणकर्त्यांना / मीडिया हाऊसेसना सल्ला देण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) जारी केला जात आहे.’ निविदेनुसार, जागतिक आणि देशांतर्गत महत्त्व असलेल्या समकालीन मुद्द्यांवरील…

Read More

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रत्येक राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. पश्चिम बंगालचे एकही जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच (Mamata Banerjee) हजर होत्या. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही. केंद्राकडे ना कोणते धोरण, ना कोणती उपाययोजना, असे असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले नाही. भाजपचे (BJP) काही मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी आपले मुद्दे मांडले. आम्हाला वॅक्सीन अर्थात लसीची मागणी…

Read More