जळगाव : प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सूक्ष्म दृष्टीने बुद्ध स्विकारला, बुद्ध आकाराने, बाह्य सौंदर्याने सुंदर नाही तर अंतरिक सौंदर्याने सुंदर आहे. बुद्ध विचारांचे सौंदर्य आणि सुगंध अप्रतिम आहे. असे प्रतिपादन भन्ते विनय बोधीप्रिय यांनी केले. फुलेशाहू-आंबेडकर विचारमंच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अजिंठा हौसिंग सोसायटी व फुलेशाहू-आंबेडकर उत्सव समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विचार मांडतांना भन्ते विनय बोधीप्रिय बोलत होते. भन्ते विनय बोधीप्रिय म्हणाले की, भगवान तथागताने अंतरिक सौंदर्य वाढविण्यास सांगितले आपण मात्र बाह्य सौंदर्य वाढविण्यावर भर देतो. हे बाह्य सौंदर्य नष्ट होणारे असते. धम्माचे भारतातील विद्यमान अस्तित्व विशद…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी कोरानाच्या दुसर्या लाटेतील वाढता प्रकोप लक्षात घेता लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत अडीच महिन्यापूर्वी कोविड केअर सेंटर सुरू केले. यात आतापर्यंत ९२० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रूग्णांना कडुनिंबाचे रोपटे देऊन निरोप देण्यात येत आहे. कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. प्रशासनासोबतच रुग्णालये, कोविड सेंटर, सेवाभावी संस्था डॉक्टर, परिचारिका, कार्यकर्ते या सगळ्यांचे प्रयत्न व नागरिकांच्या सहकार्याला यश येत आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतील वाढता प्रकोप बघून लोकसंघर्ष मोर्चाने येथील ‘शासकीय तंत्रनिकेतन’च्या इमारतीत अडीच महिन्यांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरु केले होते. सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण…
जामनेर : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गाने आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर घाला घातला आहे. त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील संगणक शिक्षणावरही याचा परिणाम दिसून आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ५० हजार विद्यार्थी यावेळी संगणक शिक्षणाचे एमएससीआयटी चे प्रमाणपत्र परीक्षा देऊ शकले नाही व शिक्षणच बंद असल्याने शिक्षण घेऊ ही शकले नाही. हे प्रमाणपत्र सरकारी नोकरी करताना राज्य शासनाने अनिवार्य केले आहे. त्यातच ज्या सरकारी कर्मचारी अजूनही एमएस-सीआयटी उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यांचीही संधी हुकली आहे. वास्तविक फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून हे शिक्षण घेणे शक्य असतानाही वर्षभरातील शिक्षणाची मात्र हानी झाल्याने युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एमकेसीएल मार्फत एमएससीआयटीचे ज्ञान संगणक प्रशिक्षण केंद्रातून दिले…
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. या आपत्तीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाईटनिंग अरेस्टर सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या भागातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी…
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडक (Nitin Gadkari) यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त लोकसत्ता डॉटकॉम सर्वेक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेने पुढचे पंतप्रधान म्हणून नितीन गडकरींच्या बाजूने कौल दिला आहे. पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी हे सध्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) अधिक उत्तम पर्याय असतील असं मत महाराष्ट्रातील जनतेन सर्वेक्षणात नोंदवलं आहे. लोकसत्ता डॉटकॉमच्या सर्वेक्षणामध्ये साडे अकरा हजारांहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. साडे अकरा हजारांपैकी ५४ टक्क्यांहून अधिक लोकांनी गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींपेक्षा योग्य होईल, असं मत नोंदवलं आहे. भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी नुकतीच सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. नरेंद्र मोदींनी २६…
मुंबईः राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत सुधार येत असताना आता आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात तब्बल ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची लागण झाली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची दैनंदिन संख्या ५० हजारांवर पोहचली होती. त्यामुळं आरोग्य प्रशासनावर ताण आला होता. मात्र, लॉकडाऊन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळं ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. मात्र, आता आणखी एक संकटामुळं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. १ ते २६ मे यादरम्यान ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे या मुलांचे वय १० वर्षांपर्यंत…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या व आय. क्यु. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या कालावधीत ‘योग व प्राणायामाचे महत्त्व’ या विषयावर एक सप्ताह चालणारी कार्यशाळेचा समारोप उत्साहात झाली. समारोप समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर अध्यक्ष स्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश पाटील, क्रीडा संचालक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उतर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे उपस्थितीत होते. कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. सतिश चौधरी आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक सप्ताह चालणार्या या ऑनलाईन कार्यशाळेस एकुण १७९ जणांनी नोंदणी केली…
जळगाव : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र सेवा देणार्या कर्मचार्यांना वैद्यकीय व आर्थिक सहायता करणारे विविध निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी घेतले आहेत. यामध्ये कोरोनाबाधीत कर्मचार्यांना उपचाराच्या तसेच विलगीकरणाच्या कालावधीची पगारी रजा मंजूर करण्यात आली असून वेतनश्रेणी तीन व चारच्या सर्व कर्मचार्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी विशेष बाब म्हणून एकवेळ एक हजार रुपये देण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये वीजसेवा देणार्या कर्मचार्यांसाठी परिमंडल स्तरावर समन्वय कक्ष सुरु करण्यासोबतच वैद्यकीय मदतीसह आर्थिक सहायता करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.…
यावल : तालुका प्रतिनीधी ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ याची जाण ठेवत यावल येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील एलआयसी एजंट तरूणाने आपल्या आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त यावर्षी सुद्धा गोरगरीब मुला-मुलींना खाऊ वाटप करत मंदिरात रोख स्वरूपात देणगी दिली. या समाजसेवेची शहरात कौतुकास्पद चर्चा असून प्रत्येकाने आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच वाढदिवसानिमित्त आपापल्या कुवतीनुसार समाजसेवा केली तर खर्या अर्थाने प्रापंचिक परमार्थ साधला जाईल . एलआयसी एजंट मुकेश घोडके यांनी दि.२५मे मंगळवार रोजी सकाळी आपल्या आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्त यावल येथील गोळीबार टेकडी, फैजपुर रोडवरील मनुदेवी मंदिर समोर लहान मुले-मुली मोठ्या स्त्री-पुरुषांना शेवचिवड़ा, बिस्किट, पेढे, चॉकलेट आपल्या लहान मुला-मुलींच्या आणि कुटुंबियांच्या तसेच मित्र मंडळीच्या…
रावेर : प्रतिनिधी कोरोना काळात रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरणारी परंतु तुटवडा असलेल्या औषधीचा खासदार रक्षा खडसे यांनी गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून येथील ग्रामीण रुग्णलयातील कोविड रुग्णांसाठी स्वखर्चातून मोफत पुरवली आहेत. सुमारे तीन लाखाची औषधी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांच्या सुपूर्द करण्यात आली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेकांना बाधा झाल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. शासन स्तरावरून तसेच विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र रुग्णांवर औषधोपचार करताना काही औषधींचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून आले होते. तशा औषधीची यादी रुग्णालयाकडून खा. रक्षाताई खडसे यांनी मागितली होती. त्यानुसार ही औषधी मोफत देण्यात आली…