मुंबई : राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या भेटी – गाठींचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे . काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे. नेमकी ही भेट का झाली याचं कारण अस्पष्ट असले तरी सुप्रिया सुळे यांनी चर्चेसाठी भेट घेतल्याचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी भेट घेतली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भेट घेतली होती. त्यामुळे…
Author: saimat team
मुक्ताईनगर : प्रतिनिधी हरिभाऊ जावळे कमिटीच्या निकषाप्रमाणे शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी केली आहे. ते जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सुनपूर्व वादळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी ते उचंदा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान त्यांनी खा. रक्षाताई खडसे यांची कोथळी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व तालुक्यातील पीक नुकसानीबाबत चर्चा करीत माहिती घेतली. ना.फडणविस म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळी बागा पूर्णपणे भूईसपाट झाल्या असून शेतकर्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी शासनाने सर्वोतोपरी मदत करणे गरजेचे आहे. ज्या शेतकर्यांनी पीक विमा भरला नसेल त्यांनाही सरकारने मदत करायला हवी, असे म्हणत…
जळगाव ः प्रतिनिधी केशकर्तनालय (सलून्स),स्पा सेंटर्स आणि जिम वगळता सर्व व्यापारी व्यवहार शहरासह जिल्ह्यात आजपासून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुले करण्यात आल्यामुळे व्यापारी,व्यावसायिक व नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. शहरातील व्यापारी संकुलांनाही परवानगी मिळाल्याने मुख्य बाजारपेठेतील फुले मार्केट,सेंट्रल फुले मार्केट व गोलाणी संकुलासह अन्य संकुलातील दुकाने सुरु करण्याची लगबग दिसून आली. त्यामुळे व्यापारी व व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसून आला. ब्रेक द चेन अंतर्गंत गेल्या ५६ दिवसापासून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती.त्यामुळे व्यावसायिकांची आर्थिंक कोंडी होत होती.आजपासून काही सवलती मिळाल्यामुळे त्यांना काहिसा दिलासा मिळणार आहे. अत्यावश्यक सेवासंबंधित दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील…
यावल ः तालुका प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल येथील मंडळ अधिकारी आणि अंजाळे येथील तलाठी यांनी पकडले,ट्रॅक्टर पकडल्यानंतर तिसर्या दिवशी सर्कल याने यावल पो.स्टे.ला हे ट्रॅक्टर वाळूसह जमा केले त्यानंतर अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टर मालक चालकाकडून यावल तहसीलदाराने सव्वा लाख रुपये दंड आकारणी न करता वाळू तस्करी प्रकरण रफादफा करून लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडविला.हे प्रकरण आणि एका शासकीय अधिकार्याचा मनमानीयुक्त बेकायदा अधिकार माहिती अधिकारामुळे प्रथमदर्शनी उघडकीस आला असून जिल्हाधिकारी जळगाव,प्रांताधिकारी फैजपूर या प्रकरणाची चौकशी करणार आहे किंवा नाही,असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…
जळगाव : प्रतिनिधी महानगरपा लिकेच्या माध्यमातून जळगाव शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडूू देणार नाही. लवकरच जळगावला भेट देणार असल्याचे सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित कामांची यादी घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा मुंबईला बोलावले असल्याची माहिती महापालिकेच्या पदाधिकार्यांनी दिली. जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काल मुंबईला जाऊन प्रथमच नगरविकास व सार्वजनिक बांंधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी नगरविकास मंंत्री शिंदे यांनी त्यांना जळगावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. तसेच आपण जळगावच्या विकासासंदर्भातील सर्व प्रलंबित विषयांची यादी घेऊन पुढील आठवड्यात पुन्हा या. सविस्तर चर्चा करून शासनस्तरावर भरीव मदत करू असे आश्वासन दिले.…
जळगाव : प्रतिनिधी ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.तंंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांंना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणार्या जीवघेण्या परिणामांची माहिती देत बुधगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखेंने जनजागृती केली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: ३६ टक्के पुरुष…
जळगाव ः प्रतिनिधी भाजपात राहिलात तर तुमच्या प्रभागात कामे होणार नाहीत, अशी धमकी नगरसेवकांना दिली जाते आहे. सत्तेच्या बळावर पैशांचेही आमिष दाखवले जाते आहे. मात्र, कोणतेही सत्ताधारी निधी खर्चाच्या बाबतीत अशा पक्षीय दुजाभाव करू शकत नाहीत, असा दावा भाजपचे नगरसेवक आणि माजी महापौर भारती सोनवणे यांचे पती कैलासअप्पा सोनवणे यांनी केला आहे. भाजपचे तीन नगरसेवक शनिवारी शिवसेनेला जाऊन मिळाले. आणखी काही नगरसेवक भाजप सोडून जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात कैलास सोनवणे यांच्या नावाचाही उल्लेख काही जणांकडून केला जातो आहे. त्या अनुशंगाने त्यांना विचारले तेव्हा त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. गेल्या दोन महिन्यात पालकमंत्र्यांशी आपली भेटही झालेली नाही आणि फोनवरही…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय पातळीवर सध्या गाजत असलेला ‘द ग्रेट इंंडियन किचन’ हा सिनेमा कथानक, दिग्दर्शकीय कौशल्य व भारतीय स्त्रियांच्या जगण्याची होणारी कोंडी दाखणारा आहे. हिंसा ही दृश्य स्वरूपात अनेकदा ठळकपणे दिसते पण या चित्रपटात घरातील न दिसणारी हिंसा दिग्दर्शकाने प्रभावीपणे दाखवली आहे. घरातली छुपी हिंसा रसिकाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही, असे मत ज्येष्ठ सिनेअभिनेत्री वीणा जामकर यांनी परिवर्तन फिल्म क्लब आयोजित ‘चर्चा तर होणारच’ या चर्चेप्रसंगी मनोगतातून सांगितले. घराघरातील वास्तव मांडले टिपिकल पद्धतीने न मांडता दिग्दर्शकाने प्रत्येक फ्रेममध्ये गांभीर्याने घरात नातेसंबंधातील कळत नकळत होणारी हिंसा हा सवयीचा कसा भाग बनते, स्त्रीला स्वतःची आवडनिवड असते हे पुरुषप्रधान संस्कृतीत का स्वीकारले…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्य महामारीच्या संकटामुळे हैराण आहे. त्याचा परिणाम उद्योग, व्यवसाय, रोजगार यावर मोठ्या प्रमाणावर झाल्याने सर्वच स्तरातील जनतेचे दैनंदिन जीवनमान मुश्कीलीचे होवून बसले आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अधीक अवलंबून आहे. शेतकरी देशाचा कणा आहे, असे आपण म्हणतो. आज हाच कणा मोडून पडला आहे. शेतकरी , मजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असताना शेतीची मशागत, बी बियाणे, खते घेण्यासाठी जवळ एक दमडी देखील नाही. सध्याच्या परिस्थितीत कुणी सावकार उभा करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्या पुढं एकच पर्याय असतो तो म्हणजे मोठ्या हौशेन पत्नी, सून…
जामनेर : पंढरीनाथ पाटील एरव्ही इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर होऊन त्यानंतर अनुक्रमे अकरावी आणि बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियांची सुरुवात होते.विशेषत: बारावीच्या निकालानंतर अभियांत्रिकी,वैद्यकीय,वैद्यकशास्त्र,एल .एल.बी व आर्किटेक्चर सारख्या अभ्यासक्रमांची सीईटी होते. जेईई व नीट या सारख्या केंद्रीय पातळीवरील परीक्षा होतात.मात्र यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्याने तर बारावीच्या परीक्षा ही पुढे ढकलण्यात येणार असल्याने पुढील वर्षातील शैक्षणिक कॅलेंडर कोलमडून पडण्याची भीती विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात निर्माण होत आहे. यंदा मार्च महिन्यापर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासावर होण्याची भीती पालकांना…