पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा, वरसाडे तांडा येथील विद्यालयातील कलाशिक्षक परशुराम पवार यांनी श्री चित्रगणेशाची स्थापना केली आहे. तसेच, ग्राम विकास मंडळाचे संचालक मिलिंद देव व क्षमा देव यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली आहे. यावेळी दोन्ही विभागातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थितीत होते. पर्यावरण रक्षणासाठी, प्रदूषण रोखण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिक, थर्माकोलपासून होणारे प्रदूषण टाळले पाहिजे. त्याच बरोबर सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात आलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळेही प्रदूषणात दरवर्षी वाढ होत असते. कापडावर किंवा फळ्यावर चित्र साकारल्या मुळे कोणतेही नुकसान होत नाही. शंभर टक्के प्रदूषणमुक्त गणरायाची निर्मिती करून…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरातून २ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासाने दिलेल्या अहवालात आज जळगाव शहरातून दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७२६ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १२६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसचे २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या जिल्ह्यात २५ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे अशी…
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला जोरदार झटका बसलाय. निवडणुकांच्या तारखांत बदल करण्याचा, निवडणुका पुढे ढकलण्याचा किंवा निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलंय. त्यामुळे ठाकरे सरकारसमोरचा पेच वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. यावेळी ठाकरे सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत झालेला निर्णय न्यायालयापुढे मांडला. यावर आक्षेप घेत राज्य सरकार निवडणूक आयोगाच्या अधिकारांत हस्तक्षेप करत…
पाचोरा, प्रतिनिधी । दिल्ली येथील साबिया सैफीची क्रूर हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई अशी मागणी मुस्लिम समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे पोलिस प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, साबिया शमीम सैफी रा.संगम विहार, दिल्ली ही मुलगी दिल्ली सिव्हील डिफेन्स विभागातील डी. एम. दिल्ली (दक्षिण) कार्यालय येथे नोकरीस होती. अतिशय विभत्स अवस्थेत क्रुरपणे हत्या केलेला तिचा मृतदेह सुरजकुंड, दिल्ली येथे आढळून आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. परंतू सोशल मिडीयावर व न्युजमध्ये प्रसारण झालेल्या माहितीवरुन या क्रुर हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचे दिसुन येते. मयत मुलगी ही फक्त २१ वर्षांची होती व ती नुकतेच चार महिन्यांपुर्वी…
अमळनेर – प्रतिनिधी । आज ऋषीपंचमी निमित्ताने जिल्हाभरातील महिलांनी तालुक्यातील तापी पांझरा आणि गुप्त गंगा या त्रिवेणी संगमावर असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील तापी पांझरा तसेच गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे संपूर्ण खान्देशात भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी या तिर्थस्थळावर असंख्य भाविकांची मांदियाळी असते. दरम्यान,तालुक्यातील तापी पांझरा तसेच गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात आज ऋषीपंचमी निमित्ताने जिल्हाभरातून महिला भाविकांनी याठिकाणी त्रिवेणी संगम असल्याने पवित्र स्नान करून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर गाभाऱ्यात असलेल्या स्वयंभू…
जळगाव प्रतिनिधी । पर्यावरणातील बदल आणि ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिल्यात. मंत्री श्री. भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतक-र्यांशी संवाद साधला. जामनेर तालुक्यातील काही गावात चार दिवसापूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ओझर येथे घरावरील पत्रा उडून बैलावर पडल्याने बैल गंभीर जखमी झाला होता. मंत्री श्री. भुसे व आमदार किशोर पाटील यांनी आज बैल मालक श्री. रमेश माळी…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकवीरा येथून एकाची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज सतीश पाटील (वय 23) रा. अहुजा नगर हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. 7 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची (एमएच 19 डीई 2359) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी राज पाटील यांच्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल…
मुंबई प्रतिनिधी | येथील साकीनाका भागात अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले असतांना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टात चालवून दोषीला कठोर दंड देण्याची मागणी केली आहे. साकीनाका येथे अत्याचार झालेल्या महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरले आहे. बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे…
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत आज करोना (coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या बरोबरच आज झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत घट झाली आहे. तर, कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याने राज्याला आज दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ०५६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १५४ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ५२४ इतकी होती. तर, आज ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल…
मुंबई: प्रतिनिधी साकीनाका बलात्कार घटनेचा निषेध करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतानाच महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. साकीनाक्याची घटना दु्र्दैवी असून विरोधकांनी याचे राजकारण करणे थांबवले पाहिजे असे सांगतानाच या घटनेवर राजकारण करणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे,असा टोला राऊत यांनी लगावला आहे. (shiv sena mp sanjay raut criticizes opposition over reactions on sakinaka rape case) साकीनाक्यातील ही घटना अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक अशी घटना आहे. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम…