भुसावळ प्रतिनिधी । एलटीटी-फैजाबाद (०१०६७) साकेत एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीचे चाक अचानक फुलले. गाडी भुसावळ जंक्शनवर आल्यावर रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची घटना शनिवारी दुुपारी १ वाजता समाेर अाली. यानंतर तातडीने डबा बदलून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. एलटीटीकडून फैजाबादला जाणारी साकेत एक्स्प्रेस शनिवारी दुपारी १.०२ मिनिटांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर अाली. यानंतर नेहमीप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांनी गाडीच्या डब्यांची खालील बाजूने तपासणी सुरू केली. त्यात कर्मचारी एमसीएम आशिष चाैधरी यांना इंजिनपासून ११ व्या क्रमांकाच्या एस-९ या डब्याचे एक चाक फुललेले आहे, असे लक्षात अाले. त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. यानंतर अधिकाऱ्यांनी एस-९ या डब्याच्या चाकांची पाहणी…
Author: saimat team
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । मुक्ताईनगर सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी ११ सप्टेंबरला ऋषिपंचमीचे औचित्य साधून सकाळी ६ वाजता मुक्ताईनगर विश्रामगृह ते माळेगाव परिसरातील महाकाली मंदिरापर्यंत महासायकल रॅलीचे काढण्यात आली. त्यात सोसायटीच्या सदस्यांनी आरोग्यविषयक जनजागृती केली. सिव्हील सोसायटीचे सदस्य वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर काम करतात. आता आरोग्य निरोगी, प्रदूषणमुक्तीसाठी सायकलिंग का महत्वाची आहे पटवून देण्यासाठी सदस्यांनी शनिवारी सायकल रॅली काढली. त्यात नियमित सायकलिंग केल्याने शरीराला कसा फायदा होतो? हे पटवून देत इंधन बचतीसाठी शक्य तिथे प्रवासाचे साधन म्हणून सायकलीचा वापर करावा. यामुळे प्रदूषणाची समस्या काहीशी कमी करता येईल, असे आवाहन केले. तसेच सालाबादाप्रमाणे यंदा देखील सोसायटीचे सदस्य गणपती मूर्ती व निर्माल्य संकलन करणार असल्याचे सांगण्यात…
मुंबई, वृत्तसंस्था । इंधन दरवाढीमुळे धास्तावलेले सामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कधी घट होणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, आता सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटत आला तरी इंधनाच्या दरात फारशी कपात झालेली नाही. रविवारी देशात सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. यापूर्वी 5 सप्टेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली होती. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या 12 दिवसांमध्ये इंधनाच्या दरात अवघ्या 30 पैशांची कपात झाली आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होऊन महागाई आटोक्यात येण्याच्या सामान्यांच्या आशा पार धुळीस मिळाल्या आहेत. (Petrol and Diesel rates in country Today) पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । खाद्यतेलाच्या वाढत्या भावाला लगाम घालण्यासाठी पाम तेलावरील आयात करात ५.५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेल स्वस्त होईल. खाद्य तेलावरील आयात करात मागच्या महिन्यातही सरकारने कपात केली होती. मागील वर्षभरात खाद्य तेलाच्या दरात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यावरून सरकारवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने आयात कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या पाम तेलावरील आयात कर ३०.२५ टक्के होता. तो आता २४.७ टक्के करण्यात आला आहे. नवा दर ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील. रिफाइंड पामतेलावरील आयात करही ४१.२५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के करण्यात आला आहे. रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल…
मुंबई, वृत्तसंस्था । ऐन गणेशोत्सवात राज्यावर अस्मानी संकट आले आहे. पुढील चार दिवसात मुंबई आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने कहर केला असतानाच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवामानात झालेल्या या उल्लेखनीय बदलामुळे चार ते पाच दिवसात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. मुंबईत सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, श्री गणेशाचे स्वागतदेखील वरूण राजाने मोठ्या थाटामाटात केले. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । गेल्या काही वर्षांत डिजिटल किंवा ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करण्याकडे कल वाढला आहे. कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउन किंवा कडक निर्बंधांमुळे प्रत्यक्ष व्यवहारांवर मर्यादा आल्याने बहुतांश जणांनी ऑनलाइन पेमेंट प्रणाली वापरण्यावर भर दिल्याचं दिसून येतं. खरं तर आज ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम अशी अनेक मोबाइल अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्सवरून बिलं अदा करणं, खरेदी केल्यावर पेमेंट देण्यासह अगदी म्युच्युअल फंड, पॉलिसीचा प्रीमिअम भरण्यापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात. या अॅप्समधल्या वैविध्यपूर्ण सुविधांमुळे ऑनलाइन पेमेंट करणं अगदी सोपं झालं आहे. यात `गुगल पे` (Google Pay) हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या लक्षणीय…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी कॉलनी येथील माहेर असलेली एक महिला पतीसोबत वाद झाल्याने माहेरी आली हाेती. गैरफायदा घेऊन लग्नाचे अामिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. तत्पुर्वी संबधीत महिलेकडून २ लाख २५ हजार रुपये लाटल्याचा प्रकार घडल्याने पिडीतेच्या तक्रारीवरुन शनिवारी एमआयडीसी पोलिसांत कमलेश ऊर्फ बंटी जयपाल मखिजा रा. सिंधी कॉलनी जळगाव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला. ३१ वर्षीय विवाहीतेचे दुसरे लग्न झाले असून ती, विदर्भात पती व मुलासह वास्तव्यास आहे. मे महिन्यात पतीसोबत वाद झाल्याने…
जळगाव, प्रतिनिधी । चाळीसगावसह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेक गावांतील लोकांचे संसार वाहून गेल्याने ते अक्षरशः रस्त्यावर आले. डोक्यावर छप्पर राहीले नाही. त्यामुळे अशा गरजू लोकांना जोपासण्यासाठी जळगावातील सेवा धर्म परिवारासह लायन्स क्लब, नारी शक्ती ग्रुप, कला सिद्धी फाउंडेशन, झाशीची राणी बचत गट आदी संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. चाळीसगावसह तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांमुळे उघड्यावर पडलेला संसार सावरण्यासाठी या सामाजिक संस्थांतर्फे ही मदत करण्यात आली. यात सामाजिक कार्यकर्त्या बेबी खोडपे, रमेशकुमार मुणोत, भारती रंधे, भारती कुमावत, सुमित्रा पाटील यांनी दिलेल्या मदतीच्या आधारे मोठ्या प्रमाणात कपडे, धान्य, किराणा आणि औषधांचे किट आपत्तीग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आले. मदतीच्या वस्तू असलेल्या…
अमरावती : वृत्तसंस्था मुंबईत महिलेवर बलात्कारानंतर अमानुष अत्याचार केल्यानंतर झालेल्या मृत्यूमुळे संताप व्यक्त होत असतानाच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. बलात्कारानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती राहिली होती. पीडितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. पीडितेवर गेल्या नऊ…
दोन्ही कॉंग्रेसने आपल्या वाट्याला अत्यंत महत्त्वाची खाती घेवून आपले पारंपरिक कारभार सुरू ठेवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांना थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्ता सोडून जाणार नाही, असे माझा मित्र असलेल्या कॅबिनेट मंत्र्यानेच मला सांगितले आहे, अशी माहिती भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधीनींशी चर्चा करताना त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला. पाटील म्हणाले, १२ बलुतेदार आणि नव्या १८ क्षेत्रातील असंघटित कामगारांना दरमहा पाच हजार रुपयांची मदत…