Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले, कार्यक्रमाची सुरुवात महापौर जयश्री महाजन व उपस्थितांनी श्री गणेश उत्सवाची आरती करून केली. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते सुनिल दाभाडे यांचा महापौरांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर म्हणाल्या की, सुनिल दाभाडे हे जळगांव चे भुषण आहे. उपक्रमशील शिक्षक आहे. सरांचा आम्हाला अभिमान वाटतो. सुनिल दाभाडे यांनी GUINNESS WORLD RECORDS मध्ये नोंद झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन. त्यांनी कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. तसेच कोरोना विषयी जनजागृती केली आहे. त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, एस एस एस…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण राज्यात महिलांवर व मुलींवर अत्याचार, बलात्काराचे प्रकार समोर येत आहे. पुणे शहरातील १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत घडली. मुंबईतील साकिनाका येथेही 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगांमध्ये रॉड घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसंदिवस महिला अत्याचाराच प्रमाण वाढत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव तर्फ निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना आपले राज्यकर्ते कोणत्या धुंदीत दंग आहेत असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. महिला अत्याचारावरील खटले फास्टट्रॅक मोडमध्ये चालावेत व महिला अत्याचारा संबंधित एक…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पैसे मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस काम करतात. काही शारीरिक श्रम करतात, काही बौद्धिक श्रम करतात. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लोक मेहनत करत राहतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे पैशाची कमतरता नसावी, असं वाटतं. वास्तुशास्त्राचाही (Vastu Tips) आधार घेतला जातो. घरात वास्तुशास्त्रानुसार काही बदल केल्यानंतर तुमच्या आयुष्यात आनंदच नाही तर, व्यक्तीच्या आयुष्यातून आर्थिक त्रास आणि सर्व प्रकारचे दु: खही दूर होतात, असं म्हटलं जातं. हे करून पहा देवी लक्ष्मी संपन्नतेची देवता आहे. ती घरात राहण्यासाठी लोक सर्व उपाय करतात. परंतु, जर तुमच्या घरात शांतता नसेल, तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर, तुमच्या घरात चांदीचा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध उपनगरांतील तसेच कॉलन्यांतील अंतर्गत रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाळा असल्याने पादचार्‍यांसह नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावकर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात महापालिकेसह महापौर, उपमहापौरांकडे तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे किमान शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याला तरी प्राधान्य देऊन त्वरित नागरिकांना दिलासा द्यावा, यासंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी सतत महापालिका आयुक्तांसह अधिकार्‍यांसमवेत बैठका घेतल्या व पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील किमान मुख्य रस्त्यांवरील त्यात डांबरी व काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा विषय गंभीरतेने घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवरील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीत संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणारे डॉक्टर,नर्स, वॉर्डबाॅय,डाटाएन्ट्री ऑपरेटर,सुरक्षा रक्षक इत्यादी कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्णय कोरोना योद्धयांच्या अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना काळात आमदार, खासदार,मंत्री, लोकप्रतिनिधी जिवाच्या भीतीने घरी बसले असताना कोरोना रुग्णांच्या सेवा शुश्रुषा करणारे शासकीय रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कोरोना…

Read More

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत गेलेल्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला असून तिच्या भावाला मात्र वाचवण्यात यश आले आहे. सविस्तर असे आहे की, मनीष यादव हे झेडटीसी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवसानंतर ते आज सकाळी विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळ असणार्‍या तापी नदीच्या पात्रात आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते. यावेळी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या ही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. यातच मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । स्व. किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबिराचे उद्घाटन महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी जनमत प्रतिष्ठान हा माझाच परिवार आहे असल्याचे गौरोद्गर काढले. यावेळी सर्वांनी एक वृक्ष लावावे व आपल्या आजूबाजूच्या परिसर स्वच्छ ठेवावा अशी शपथ ग्रहण करण्यात आली. कलाशिक्षक सुनील दाभाडे यांच्या चित्राचे ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्यांचा महापौर जयश्री महाजन यांनी सत्कार करून सन्मान केला. शिबिरात नेत्ररोग तपासणी डॉ. राहुल महाजन यांनी केले. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,, अॅड. हेमंत दाभाडे, शक्ती…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दवाखान्यात जाण्याच्या कारणावरून मुलाने भरदिवसा मुख्य रस्त्यावर बापाचा खून केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या कांताई नेत्रालयजवळ भरदिवसा मुख्य रस्त्यावर दवाखान्यात जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन मुलांनी आपल्या बापाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाजवळ प्रेमसिंग राठोड हे पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज सकाळी त्यांना त्यांची…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मागील काही दिवसापासून सोन्या आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होतानाचे दिसून आलेय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली होती. परंतु दोन्ही धातूंमध्ये काही दिवस घसरण झालेचे दिसून आले. जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ४८ हजार २०० च्या घरात आहे. तर चांदी ६६ हजाराच्या घरात आहे. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर प्रतितोळा दर ४८,६४० रुपये इतका होता. तो आता आठवड्याच्या शेवटापर्यंत ४८,१४० रुपयांच्या पातळीवर आला आहे. त्यामुळे आठवडाभरात सोनं जवळपास ५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजारांपर्यंत खाली येऊ…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । महामार्गावरील बऱ्हाटे पेट्राेल पंप ते काेणार्क हाॅस्पिटल दरम्यान पुलावर लावलेले बंटी पथराेड याच्या वाढदिवसाचे पाेस्टर फाडल्याने साकेगाव येथील मयूर मदन काळे यास मारहाण करण्यात आली. प्रकरण मिटवण्यासाठी काळेकडून ५ लाखांची खंडणी मागण्यात आली. त्यातील २ लाखांची रक्कम पथराेडसह साथीदारांनी घेतली. याप्रकरणी काळे यांच्या फियादीवरून बंटी पथराेडसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पाेलिसांनी एका आरोपीला अटक केली. बंटी पथरोड याच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडल्याने पथरोड व सहकाऱ्यांनी साकेगाव येथील मयूर काळे याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पथराेड व सहकाऱ्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एमएच.१-५६७६) बऱ्हाटे पेट्राेल पंप ते काेणार्क हाॅस्पिटलपर्यंत अपहरण करून पिस्तूल, चाॅपर व शस्त्रांचा धाक…

Read More