बोदवड, प्रतिनिधी । आज नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले 17पैकी 9जागा मिळवत एका भाजजपाची जागा सोबत असुन शिवसेनेकडे असुन आज नगरअध्यक्ष पदासाठी एकमेव आनंदा पाटील याचा उमेदवारी अर्ज दाखल झाला तर राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा पार सुध्दा करता आला नसून अवघ्या सात जागा राखता आल्या आहे तरी जफर शेख व योगिता खेवलकर यादोघाचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल करण्यात आली आहे. माघारी साठी दि. 17 रोजी 5 वाजेपर्यंत वेळ असुन राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून ही दि 18 रोजी 12 वाजता पीठासीन अधिकारी रामसिंग सुलाने व सहाय्यक मुख्य अधिकारी आकाश डोईफोडे याच्या समक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडणार त्याच दिवशी उपनगराध्यक्ष याचा…
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,३००रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,५१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२५०…
मुंबई, वृत्तसंस्था । ईडीने आज मुंबईमधील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात आल्यात. हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे. १९८० च्या दशकामध्ये भारतसोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या महिन्याच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी अबू बकारला अटक…
चाळीसगाव, प्रतिनिधी । दैनिक साईमत सण २०२२ चे कॅलेंडरचे प्रकाशन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या हस्ते दिनांक १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी समाजसेवक वर्धमान धाडीवाल, गणेश आप्पा गवळी दैनिक साईमतचे उपसंपादक मुराद पटेल दैनिक साईमतचे प्रतिनिधी विजय गायकवाड उपस्थित होते
जामनेर, प्रतिनिधी । वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक म्हणून नुकतीच प्रा. ईश्वर चोरडिया यांची तर शेंदुर्णी शहर समन्वयक म्हणून सोनू नेरपागरे यांची नियुक्ती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य मंगेश चिवटे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. जळगाव येथील सारा हॉस्पिटल येथे झालेल्या कार्यक्रमात जळगाव महापौर जयश्री महाजन, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक इबा पटेल, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील,वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ मोईज देशपांडे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रा. ईश्वर चोरडिया व सोनू नेरपागारे यांच्या नियुक्तीचे…
यावल, प्रतिनिधी । आज दि.१४रोजी यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे डॉ.कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपेरेशन साठी जळगांव स्थित कांताई नेत्रालय येथे रवाना केले गेले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले गेले. डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १६५ नेत्र रुग्णांची तपासणी व १६ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे…
यावल, प्रतिनिधी । राळेगणसिद्धी परिवाराने ४५ वर्षापूर्वी गावातील दारुभट्ट्या बंद केल्या.तसेच संपूर्ण गाव दारुमुक्त करून व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती सुरू केली होती.त्यानंतर १९९५ पासून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा दारू आणि व्यसनाधीनतेला नेहमीच कडाडून विरोध राहिलेला आहे. या विषयावर अनेक आंदोलनेही झालेली आहेत.त्या आंदोलनातून महिलांच्या ग्रामसभेद्वारे दारुबंदीचा कायदा, ग्रामरक्षक दलाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे. नुकताच २७ जानेवारी २०२२ रोजी राज्य मंत्रीमंडळाने वाईन विक्रीसंबंधी एक निर्णय घेतला. त्यानुसार सुपरमार्केटआणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचे धोरण असल्याचे वृत्त समजले.हा निर्णय समाज,तरुण वर्ग आणि संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने घातक असल्याने ३१ जानेवारी रोजी पत्रकार परिषद व प्रेसनोटद्वारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध…
जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. प्राध्यापक-पालक सहविचार सभेचे आयोजन करीत असताना विद्यार्थी हित आणि महाविद्यालयाची वाटचाल याचा विचार करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांची उपस्थिती होती. डॉ. प्रिती अग्रवाल पुढे म्हणाले कि, कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रात असंख्य अडचणी निर्माण झाल्या विद्यार्थी महाविद्यालयापासून आणि शिक्षणापासून दुरावत चालला असताना…
जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव तसेच सेवासंवर्धन संस्था, जळगाव ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) व पदवी (डिग्री) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यासाठी मेगा परिसर मुलाखती (कॅम्पस प्लेसमेंटचे) आयोजन करण्यात आले होते. सदर नोकर भरती करिता औरंगाबाद येथील धूत ट्रान्स्मिशन ह्या बहुराष्ट्रीय कंपनीला आमंत्रण देण्यात आले होते. धूत ट्रान्स्मिशन ही कंपनी टू व्हीलर, थ्री व्हीलर व फोर व्हीलर च्या वायर हार्नेसिंगचे उत्पादन बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेण्याकरिता कंपनीतील मानव संसाधन विभागातील व्यवस्थापक शुभम पाटी, वृषभ आवळे महाविद्यालयास भेट दिली. त्यांनी कंपनीचे उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, मशीन्स व कामे करण्याच्या पद्धतीबद्दल विद्यार्थ्यांना…
कजगाव, ता भडगाव, प्रतिनिधी । येथे आज श्री विश्वरचिता भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी श्री विठ्ठल मंदिर ते सावता महाराज मंगल कार्यालय पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली , व प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले , यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते , यसस्वीतेसाठी श्री विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष विनोद हिरे , शामकांत हिरे , कमलाकर हिरे, उत्तम मिस्तरी, वाल्मिकी हिरे , सुनील मोरे , ईश्वर हिरे ,धर्मराज हिरे , भिकन हिरे ,राकेश हिरे ,राजाराम मोरे, बापू मोरे ,ज्ञानेश्वर हिरे ,दादू मोरे, भारत मोरे, राहुल मोरे ,मयुर अहिरे ,विजय मोरे, किरण हिरे, सचिन मोरे ,भैया मोरे…