जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज 2 ऑक्टोबर, 2021 रोजी सायंकाळी 7.30 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून मुलाखत प्रसारीत होणार आहे. ‘हर घर जल’ अर्थात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे नियोजन याविषयावर पालकमंत्री श्री. पाटील हे सविस्तर माहिती देणार आहेत. नागरिकांनी ही मुलाखत जरुर ऐकावी. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सतीश पप्पू यांनी ही मुलाखत घेतली आहे.
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । शहरात नारीशक्ती जळगाव ग्रुपतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मांगीलालजी बाफना नेत्रपेढी यांच्यावतीने नेत्र तपासणी व चष्मे – स्वेटर महापौर जयश्री महाजन, उपायुक्त शाम गोसावी यांच्या वाटप करण्यात आले आहे. आदित्य ढवळे पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था बेघर निवारा केंद्र येथील एकूण 32 जणांची नेत्रतपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान व आरसी बाफना फाऊंडेशन संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय या ठिकाणी डॉ.नयना पाटील, एम. एस.ऑप्थो. यांनी केली व नेत्र तपासणीतून चष्मे महापौर जयश्री महाजन, उपायुक्त शाम गोसावी व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. बऱ्याचदा आपण बघतो की वाढदिवस हे पुष्पगुच्छ देऊन केक कापून अथवा अन्नदान करून साजरे केले जातात. पण नारीशक्ती…
जळगाव, प्रतिनिधी । मौजे वाकडी, ता. चाळीसगाव, नांद्रा, ता. पाचोरा, पिंपरखेड, वरखेड, पिर्चेडे, ता. भडगाव याठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease ) या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यातील या चार संसर्गकेंद्रापासून (Epicentre) 10 कि.मी बाधित क्षेत्र (Infected zone ) म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे. लम्पी स्किन डिसीज संसर्गाच्या अनुषंगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जतुकीकरण करुन 10 कि.मी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा प्रदर्शन…
भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील भरधाव लक्झरी व मालवाहू छोटा हत्ती वाहनांची समोरा – समोर धडक झाल्याने चालक जागीच ठार झाला आहे व दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बाजार पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भरधाव लक्झरी व मालवाहु छोटा हत्ती पिकअप वाहनात समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात पिकअप वाहनातील धुळ्याच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन सह प्रवासी जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. सुदैवाने लक्झरी उलटली नाही अन्यथा मोठी जीवीत हानी होण्याची भीती होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ येथून महेंद्र ट्रॅव्हल्सची लक्झरी (जी.जे.19 एक्स.9596)…
जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथे आज सकाळी ४.१५ मुसळधार पाऊस झाल्यामुळे जळगाव ते मनमाड महामार्ग वावडदाजवळील गलाठी नाल्याच्या पुलाहुन पाणी वाहत असल्यामुळे ह्या मार्गावरील वाहतुक सकाळी ५ ते १२.३० पर्यंत बंद होता हा नाला वरी पुलाचे काम गेल्या वर्षापासून चालु आहे. तरी समंधीत ठेकेदार याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. सदर ह्या हप्तात दोन वेळा ही वाहतुक ठप्प झाली होती, सदर ह्या पुलाचे काम ८० टक्के पुर्ण झाले आहे संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्व. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्व. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, भुसंपादन अधिकारी किरण सावंत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ हे घर अशी ओळख . सातत्याने गावठी पिस्तूल आढळून येणे , वर्षभरात खुना सारख्या गंभीर अपराधांचा वाढता आलेख , सिनेस्टाइल हत्त्या व अपराध . यामुळे शहरात भीतीचे वातावरण. पण उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी येथील गुन्हेगारीचा अभ्यास करून त्यावर अंकुश लावण्याचा उपाय सुरु केला आहे. शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. भुसावळकरावर गुन्हेगारांची दहशत बसत होती. शिस्तप्रिय डीवायएसपी वाघचौरे साहेबानी अपराध्यांच्या कुंडलीच बनविल्या . उपद्रवी लोकांना हद्दपार करण्यासाठीचा बंदोबस्त केला. नामांकित लोक हद्दपार व्हायला सुरुवात झाली आणि शहरात शांतता नांदायला प्रारंभ झाला. अपराध्यावर कायद्याची जरब बसायला सुरुवात झाली. वाघचौरे यांच्या अगोदरही कर्तव्यदक्ष अनेक…
जळगाव, प्रतिनिधी । जनावरांमध्ये अचानक ताप व त्वचेवर गाठी येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुधनापासून इतर जनावरांना संसर्ग होऊ नये. यासाठी तातडीने गावपातळीवर लसीकरण मोहीम राबवावी धास्तावलेले पशुपालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की सद्यस्थितीत जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार आहे. यात संकरीत जनावरांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज येणे, साधारणतः एक आठवडाभर भरपूर ताप येणे,…
सातारा, वृत्तसंस्था । करोना काळानंतर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांचा दरवाजा सोमवारी (दि. ४) उघडला जाणार आहे. परिणामी २२८0 शाळांची घंटा वाजणार असून यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि गावपातळीवर कार्यरत ग्रामशिक्षण समितींनी आवश्यक ती तयारी सुरु केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या २ हजार ८८ तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या १९२ शाळा असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली. जिल्ह्यात फेब्रुवारी २0२0 पासून शाळा, कॉलेज बंद आहेत. शाळांचे निकाल जुन्या निकालांच्या आधारे लावण्यात आले. दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल नववी आणि अकरावीच्या गुणांवर आधारित देण्यात आले. दरम्यान, २०२१ मध्ये काही प्रमाणात…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । महात्मा गांधी यांची आज 152वी जयंती, पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपित्याला अभिवादन. राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 152 वी जयंती आहे. यावेळी देशभरात अनेक कार्यक्रम होतात. महात्मा गांधींच्या कार्याचा गौरव केला जातो. 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी असते, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचं योगदान फार मोठं आहे, त्यांच्या अहिंसेच्या मार्गाने सगळ्या जगाला प्रभावित केलं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. भारतात महात्मा गांधींची जयंती हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो,मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरही महात्मा गांधींच्या जयंतीला फार महत्त्व आहे. जगभरात 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.