जळगाव, प्रतिनिधी । भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स अडकविण्यात आल्याची चर्चा आहे. आता खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू मांडली आहे. तसेच, मी काय गायब नव्हतं, दोन दिवस फर्दापूरच्या रेस्ट हाऊसवर होतो, असे स्पष्टीकरणही खडसेंनी दिलं. एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही खडसेंनी म्हटलं. ज्या नाथाभाऊंनी भाजपमध्ये कष्ट केली,…
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचविणाऱ्यांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. यासंदर्भात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र लिहिले आहे. यात, ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल, असे म्हणण्यात आले आहे. मंत्रालयाने सोमवारी, प्रामाणिकपणे मदत करणाऱ्यांना बक्षीस देण्याच्या या योजनेसंदर्भात नियमावलीही जारी केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील अपघात ग्रस्तांना मदद…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास डाऊन झालेल्या या सोशल मीडियातील सेवा तब्बल ६ तास बंद राहिल्या आहेत. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. आता, पुन्हा या सेवा सुरू झाल्या आहेत. याबाबत स्वत: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने माहिती दिली. तसेच, आपल्या युजर्संची माफीही मागितली आहे. मात्र, या 6 तांसाच्या बंदमुळे फेसबुकचं मोठं नुकसान झालं आहे. फेसबुक काही तासांसाठी गंडल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे, आर्थिक…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पेट्रोलनंतर आता डिझेलच्या किमती (Diesel Prices 4 October 2021) नेही अनेक शहरांमध्ये शतक ठोकलेय. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (RPDA) च्या मते, जयपूरमध्ये डिझेलची किंमत आज 100 रुपये प्रति लीटर पार केली. डिझेलच्या किमती वाढल्यानंतर जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत 109.40 रुपये आणि डिझेलची किंमत 100.10 रुपये प्रति लीटरवर पोहोचली. आरपीडीएच्या मते, राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये किमती जयपूरपेक्षा जास्त आहेत. असोसिएशनने म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे केवळ ग्राहकच नव्हे तर डीलर्सही अस्वस्थ होत आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. 4 दिवसांनंतर वाढत्या किमतींनंतर ग्राहकांना दिलासा मिळाला. सरकारी…
मुंबई, वृत्तसंस्था । नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडनेही पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रतिएकक व प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि प्रमुख शहरांमध्ये घरगुती वापरासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचाच भाग म्हणून…
जळगाव, प्रतिनिधी । येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी होणारी राज्यस्तरीय कापूस परिषद काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. मागील काही दिवसात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांचेशी संपर्क करुन जिल्ह्यातील आपत्ती व नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली तसेच कृषि विभाग, महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे व प्राथमिक अहवाल करण्यात व्यस्त असल्याचे कृषि मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार पालकमंत्री यांचेशी झालेल्या चर्चेअंती व परिस्थितीचे गांर्भीर्य लक्षात घेवून जळगाव येथे…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जुंतुकीकरण करणे या नियमांचे व सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर गुरुवार, 7 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव श्री. अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय :- 65 वर्षे वयावरील नागरिक, को-मार्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षे वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे, धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती/संस्था/संघटना यांनी याठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणारे कामगार यांनी कोविड-19 ची लागण होऊ…
जळगाव, प्रतिनिधी । शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या लागल्या व लागत आहेत. याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्या प्रशासनाला उठविण्यासाठी आज सकाळी मनपा इमारतीत ‘झोपा काढू’ आंदोलन मनसे जिल्हा सचिव ॲड.जमिल देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आपणांकडून आम्हांस सांगण्यात येते की, सद्यस्थितीत म.न.पा.जवळ पैसा नसल्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण…
मुंबई, प्रतिनिधी । महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या सुधारणा अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केली असून सदर अध्यादेश ३० सप्टेंबर रोजी प्रख्यापित झाला आहे. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका या तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे पार पडणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाने सदर अध्यादेश २८ सप्टेंबर रोजी राज्यपाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यामध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेची सुधारणा आहे. काँग्रेसने एक सदस्यीय प्रभाग असावा, अशी मागणी केली होती. २०१९ च्या सुधारणा अधिनियमांव्दारे महापालिकांत एक सदस्यीय प्रभाग रचना होती. सध्या महापालिका प्रशासन एक सदस्य प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करत आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये पालिका कामाला लागल्या आहेत. आता सुधारणा अधिनियम प्रख्यापित झाल्याने…
जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथील जवळच असलेल्या जवखेडा येथील पुञ संभाजी शिवाजी गोपाळ हे आर्मीमध्ये आपल्या देशाची १७ वर्ष झाल्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्त सोहळा जळगाव येथे मोठ्या उस्हात साजरा करण्यात आला. या सेवानिवृत्त कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी जळगाव जिल्हा चे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील. जिल्हा परिषद सदस्य पवणभाऊ सोनवणे. यांनी सत्कार केला या वेळी जवखेडा येथील सरपंच रमेश पाटील. उपसरपंच धैरसिंग पाटील. ग्रा.पं.सदस्य आनंदसिग पाटील.सोनाबाई गोपाळ. आनंद गोपाळ. उपस्थित होते