Author: saimat team

यावल, प्रतिनिधी । यावल शहरात व तालुक्यात अवैध गौण खनिज चोरट्या वाहतूकीकडे जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा गौण खनिज प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावल तालुक्यातील अवैध गौण खनिज अनेक प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावल तालुक्यातून करण्यात आली आहे. यावल तालुक्यात संपूर्ण मंडळांमध्ये अवैध गौण खनिज वाहतूक सर्रासपणे खुलेआम सुरू आहे.अवैध गौण खनिज वाहतुकीत महसूल विभागातील एक जबाबदार अधिकारी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा वैयक्तिक स्वार्थापोटी सोयीनुसार वापर करून लाखो रुपयाची कमाई करून घेत आहे. अवैध गौण खनिज चोरटी वाहतूक करणारे राजकीय आणि सामाजिक प्रभावामुळे रोज नवीन नवीन शक्कल लढवून अवैध वाळू वाहतूक करीत आहेत अवैध गौण खनिज वाहतूक करणारी डंपर, ट्रॅक्टर वाहने…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । खजूर सुकामेवा म्हणून वापरतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढतेच पण अनेक आजार कमी होण्यास मदत होते. आपण दररोज दुधासह खजूर देखील घेऊ शकता. जाणून घेऊया त्याचे फायदे. हाडे मजबूत करते खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. हे हाडांसाठी फायदेशीर आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच हाडांशी संबंधित समस्या टाळते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते खजूरमध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्वे असतात. यामुळे शरीरात ऊर्जा येते. खजूरांमध्ये असलेले प्रथिन स्नायूंना बळकट करते. याचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते खजूरमध्ये फायबर असते. हे बद्धकोष्ठतेची समस्या…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर(Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. काल पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली होती. या महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 2.80 रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत 3.30 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलची किंमत >>मुंबई पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर >>दिल्ली पेट्रोल 104.44…

Read More

श्रीनगर, वृत्तसंस्था । जम्मू-कश्मीरच्या शोपिया परिसरात तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. श्रीनगर जम्मू-कश्मीरच्या शोपिया परिसरात तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. शोपियाच्या तुलरान परिसरात सोमवारी या चकमकीला सुरुवात झाली होती. चकमकीत मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयब्बाचे LeT (TRF) असल्याचे सांगण्यात येते आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून, तो मुख्तार शाह असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी या मुख्तारने श्रीनगरमध्ये बिहारहून आलेल्या वीरेंद्र पासवान याची हत्या केली होती. त्यानंतर मुख्तार…

Read More

कॅलिफोर्निया, वृत्तसंस्था । अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोमवारी एक मोठा विमान अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक विमान कॅलिफोर्नियातील घरांवर कोसळलं आहे. या अपघातात एका शाळेच्या इमारतीलाही नुकसान झालं आहे. कॅलिफोर्निया राज्यात एक जुनं विमान रहिवासी भागात कोसळलं. हे विमान कोसळताच घराला आग लागली. हा अपघात लॉस एंजेलिसच्या सँटी शेजारील सँटाना हायस्कूलजवळ झाला. या अपघातात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच अग्निशामक दल आग विझवण्यासाठी पोहोचले. रिपोर्ट्सनुसार, दोन इंजिनचे सेस्ना 340 विमानाने अॅरिझोना येथून उड्डाण घेतली होती. उड्डाण घेतल्यानंतर हे विमान लॉस एंजेलिस भागातील रहिवासी भागात कोसळलं. घरावर कोसळण्यासोबतच विमानाने एका…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेने मूल्यांकनमध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यात प्रमुख मागणी शहरातील रस्त्याची अक्षरश चाळणी झाली असून दैनंदिन स्वच्छता चांगल्या शाळा मिळाव्या गटारी साफ कराव्या, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आज पक्ष्याचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, सचिन अडकमोल, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, जेष्ठ नेते यशवंत घोडेस्वार, बबलू शिंदे, नरेंद्र मोरे, भिमराव सोनवणे, अनिल लोंढे, संदीप तायडे, अक्षय मेघे, हरीश शिंदे, शांताराम अहिरे, मनोहर इंगळे, चंद्रकांत खरोटे, जुलाल बाविस्कर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होता. यावेळी घोषणाने परिसर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या अविर्भवत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा) यांनी आज ११ ऑक्टोबर रोजी प्रसिध्दी पत्राद्वारे केले असुन प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला. वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर अशा संकटात महाराष्ट्रातील शेतकरी व जनता त्रस्त…

Read More

मुंबई, | भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले. आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला. सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला आहे. उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. यावेळी हुतात्मा चौकात शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ…

Read More

जम्मू, वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (११ ऑक्टोबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिलीय. भारतीय सैन्याने गुप्त माहितीच्या आधारे पुंछ भागातील जंगलात ३ ते ४ दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर ही चकमक उडाली. सध्या सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केलीय. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोटे भागात डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू आहे. A junior commissioned officer (JCO) & four soldiers killed in action during a counter-terrorist operation in the Rajouri sector in the Pir Panjal ranges: Sources —…

Read More