पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या गोद्री येथील एका ३४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना आज सकाळी७वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रेशमाबाई वजीर तडवी(वय६५)रा.गोद्री. ता.जामनेर यांनी पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, माझा मोठा मुलगा युनुस वजीर तडवी(वय३४)याचा मृतदेह आज सकाळी ७वाजेच्या सुमारास घरासमोरील ओट्यावर आढळून आला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्याची पत्नी हाजराबाई हीने सांगितले. हाजराबाई ही बाहेरख्याली वृत्ती ची असून तीचे गोद्री येथील नाना पुनमचंद नाईक(वय४०) याच्याशी अनैतिक संबंध आहे.या संबधाला कंटाळून मुलगा युनूस याने आत्महत्या केली. याप्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात पत्नी हाजराबाई तडवी व प्रियकर नाना नाईक यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22, 22-23,23-24 या तीन वर्षाकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी आंबिया बहाराकरीता केळी, मोसंबी, पपई, आंबा व डाळिंब या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन अधिसुचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. जळगाव जिल्ह्यात या योजनेव्दारे आंबिया बहार फळ पीकनिहाय केळी या पिकासाठी कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, मोसंबी या फळपिकासाठी अवेळी…
जळगाव प्रतिनिधी । २३ वर्षीय तरूणीने राहत्या घरात रात्री ९ वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद नशिराबाद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. कल्याणी लक्ष्मण मिश्राम (वय-२३) रा. वर्धा ही तरूणी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण पुर्ण करून जळगाव शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग संदर्भात प्रशिक्षण सुरू होते. घरी मुक्तेश्वर नगरातील गणेश वाणी यांच्या घरात भाड्याने राहत होती. कल्याणीने रविवारी १७ ऑक्टोबर रोजी रूमवर एकटी असतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी तिने बेड सुसाईड नोट लिहून ठेवली होती. हा प्रकार रात्री ९ वाजेच्या सुमारास घरमालक वाणी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नशिराबाद…
पाचोरा, प्रतिनिधी । ५० वर्षीय इसमाचा तोल गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवून डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच ठार झाल्याची घटना घडली. मयत इसम आपल्या कुटुंबासोबत मध्यप्रदेशात ऊस तोडणीसाठी जात असतांना लोहारी बु” गावाजवळ दि. १७ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे मयताचा मोठा मुलगाच ट्रॅक्टर चालवित होता. पहुर येथुन त्या़ंना अजुन काही मजुर सोबत घेऊन जायचे होते. नेरी ता. पाचोरा येथील लुकमान उस्मान पठाण (वय ५०) हे आपल्या कुटुंबासोबत गेल्या ५ वर्षांपासून मध्यप्रदेशात ऊसतोडीसाठी जात असतात. त्यांचेकडे साखर कारखान्याचे दोन ट्रॅक्टर असुन ते रविवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान नेरी येथुन पहुर मार्गे मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. त्यांचा मोठा मुलगा…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमचाच डंका वाजणार असा दावा काही मिनिटांपूर्वी आ.मंगेश चव्हाण यांनी केला होता. मात्र, महाआघाडीतील दोन पक्षांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. जिल्हा बँक आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल…
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) शक्यतो घरात राहूनच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, की ‘कोविड-19’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद- ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. हा सण शक्यतोवर घरी राहूनच साजरा करावा. मात्र, मिरवणूक काढावयाची झाल्यास पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी. एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एक ट्रकवर…
यावल, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात एस.टी. महामंडळ अंतर्गत यावल आगारातील एक चालक आणि नेहमी जळगाव-विदगाव- किनगाव-यावल बसवरच चालक म्हणून कार्यरत असलेला एक चालक एस.टी.महामंडळाचे सर्व नियम खड्ड्यात घालून सोयीनुसार ड्युटी आणि मनमानी करीत असल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवार दि.15ऑक्टोंबर2021रोजी एस.टी.महामंडळाचे जळगाव विभाग प्रमुख यांचे जळगाव डेपोतून दुपारी3वाजेच्या सुमारास जळगाव विदगाव किनगाव मार्गे यावल येणाऱ्या एस.टी.बस क्र 2646 वरील चालकाने जळगाव येथून दैनिक साईमत चे पार्सल पास बघून घेतले परंतु यावल येथे ते पार्सल देण्यासाठी पार्सल घेणाऱ्या मुलाला एस.टी. महामंडळाच्या नियमांचा धाक दाखवून पार्सल दिले नाही पार्सल यावल डेपो जमा केले आहे किंवा नाही हे यावल…
सूरत, वृत्तसंस्था । गुजरातच्या सुरतजवळील कडोदरामध्ये गुजरात औद्योगिक विकास महामंडळात(GIDC) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विवा पॅकेजिंग मिलमध्ये लागल्यानंतर जीव वाचण्यासाठी काही मजुरांनी पाच मजल्यावरून उड्या मारल्या. तर, काही कारागीरांना हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने वाचवण्यात आलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झालाय तर काहीजण जखमी आहेत. दरम्यान, 125 मजुरांना वाचवण्यात आलं आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळथाच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, घटनास्थळी उच्च अधिकारीदेखील पोहोचले आहेत. अग्निशमन दलाने सांगितल्यानुसार, अग्निशमन दल बचाव कार्यासाठी येण्यापूर्वी काही कामगारांनी इमारतीवरुन खाली उड्या…
जळगाव, प्रतिनिधी । ‘आपली आमदारकीची सहावी टर्म असून, आता यापुढे जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर मला एखाद्या चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्या’, अशी मागणी भाजपा नेते आमदार गिरीष महाजन यांनी एका चित्रपट निर्मांत्याकडे केली आहे. जळगाव जिह्यातील जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘हलगट’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी महाजन यांनी केलेल्या विधानाने सगळेच चकीत झाले. या विधानावर बरीच चर्चाही रंगली आहे. गिरीष महाजन म्हणाले की, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीची सहावी टर्म आहे. सलग तीस वर्षे आमदारकी भूषवल्याने पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार त्यामुळे यापुढे जर…
जळगाव, प्रतिनिधी । खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन, खान्देश जनसेवा फाऊंडेशन, नारीशक्ती गृप जळगाव, खान्देश न्युज नेटवर्क आणि इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय नारीदिप सन्मान-२०२१ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या ब्रिजलालभाऊ पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्रीताई महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे जळगाव , आमदार मंगेशदादा चव्हाण चाळीसगाव, धुळे येथील माजी महापौर जयश्री अहिरराव,युवती सहसंयोजिका अमृता पाटील धुळे ग.स.सोसायटी माजी अध्यक्ष विलास नेरकर, रावेर संगायो समीती अध्यक्ष तुकाराम बोरोले, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, नारीशक्ती गृप जळगाव…