Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । इस्लाम धर्म व त्यावर अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांनी प्रत्यक्षात आचरण करून दाखवलेले चरित्र यांचा ताळमेळ म्हणजेच इस्लाम धर्म होय. इस्लाम धर्मात आतंकवाद, धर्मपरिवर्तन व लव जिहादला थारा नसल्याचे मत इस्लाम धर्माचे मराठीचे गाढे अभ्यासक डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर व डॉक्टर इक्राम काटे वाला यांनी मांडले. तर इस्लाम धर्माच्या शिकवणी नुसार आपले जीवन व्यतीत करून दाखविले त्या बाबत डॉ इक्राम खान हे बोलत होते. ईद-ए-मिलादुन्नबी अर्थातच हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी आयोजित व्याख्यानमालेत जळगाव जिल्हा पत्रकार संघात हे वक्ते बोलत होते. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थानी जळगाव शहर काजी व मस्जिद उमर चे इमाम मुफ्ती अतिकुर…

Read More

जळगाव प्रतिनिधी | सामाजिक कार्यकर्ते जमील देशपांडे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे जमील देशपांडे हे मनसेत पहिल्यापासून सक्रीय आहेत. त्यांनी आधी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी देखील समर्थपणे पार पाडलेली आहे. तर जळगाव शहरासह जिल्ह्यात मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाची एक अतिशय परिणामकारक चळवळ सुरू केलेली आहे. दरम्यान, आज जमील देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी ठाकरे यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या अनुषंगाने आता देशपांडे यांच्यावर जळगाव शहर, जामनेर, मुक्ताईनगर आणि भुसावळ या मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । २० वर्षीय विवाहितेचा दोन लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सुप्रीम कॉलनी येथील शमिना आसिफ खान (वय-२०) ह.मु. सबजेल पाठीमागे याचा विवाह शहरातील आसिफ खान रेहेमतुल्ला खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. पती आशिफ खान व त्यांच्या कुटुंबियांनी सुरूवातीला विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान आई – वडीलांची परिस्थीत गरीबीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करून शकत नसल्याचे विवाहितेने सांगितले. याचा राग येवून पती आशिफ खान याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे घरातील सासरे, जेठाणी, दिर यांनी देखील शारिरीक…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारीला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते. २००७ मध्ये सुरेश पुजारीनं भारताबाहेर पलायन केलं होतं. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. आता फिलिपिन्समधून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरेश पुजारी मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या देखील रडारवर होता. एफबीआयनंच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे जन नायक फौंडेशन यांच्या वतीने आज सकाळी पहूर कसबे ग्रामपंचायत हॉलमध्ये सामाजिक ऐक्य सद्भावना चे प्रतीक ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एडवोकेट संजय पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पवार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे माजी कृषी सभापती प्रदीप लोंढा शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे उपसरपंच श्याम सावळे युवासेना उपतालुका प्रमुख अमीन शेख ग्रामपंचायत सदस्य ईका पैलवान शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव सरपंच शंकर जाधव ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात योगेश भडांगे अल्पसंख्या तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी…

Read More

यावल, प्रतिनिधी । सकाळच्या सुमारास शेतातील एका झुडपात एक नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात कामाला जात असतांना वाटेत असलेले हरी बोरोले यांच्या शेताजवळ काटेरी झुडपात एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी मजूरांनी पाहणी केली असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. अटक होणार? भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, 12 ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा मिळाला…

Read More

यावल, प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील प्रत्येक समाज आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे . त्या तुलनेत एस.बी.सी.समाज बांधवांनी मात्र आंदोलनाचा आक्रमक असा वेगळाच फंडा राबवला आहे . गटतट हेवेदावे हटवा-आरक्षण वाचवा हे ब्रीद वाक्य घेऊन आरक्षण चळवळ सप्ताह आयोजित केला आहे. या आक्रमक चळवळीत गावागावातील एस.बी.सी . समाज बांधवांनी सहभागी व्हावे आणि सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडण्यासाठी लढा भक्कम करावा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष शशिकांतराव आमने यांनी केले आहे . अधिक माहिती की . राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,मंत्री यांना आरक्षण मिळालेले असताना सुद्धा ते आणखी आरक्षण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.त्या तुलनेत राज्यातील एस.बी.सी अंतर्गत पोट…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद हद्दीतील यावल फैजपूर रोडवरील गट क्र. 46 माधवनगर मधील मुख्यरस्ता संबंधित लेआउट धारकाने बंद केल्याने तसेच गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे त्यामुळे लेआउट धारकावर गुन्हा दाखल करून रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी लेखी तक्रार तथा मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि गटनेते अतुल पाटील यांनी यावल नगरपालिका मुख्याधिकाऱ्याकडे केली तसेच 8 दिवसात कार्यवाही न केल्यास रहिवाशांसह यावल नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अतुल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गट क्रमांक 46 मधील माधवनगर मधील मुख्य रस्ता गेल्या 35 वर्षापासून सार्वजनिक रित्या वापरला जात होता.विरारनगर,गणेशनगर, एकरानगर,रजानगर भागातील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नवीन कानळदा रोडवर रात्री राधाकृष्ण नगरात वडाचे झाड तोडण्यात आले आहे, परंतु त्याचे खोड व मूळे येथेच असल्यामुळे रात्री 11 वाजेच्या सुमारास चारचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. वाहन चालक अतुल शिरसाळे हे आपले काम आटोपून घरी जात असताना रात्री अंधारात त्या वडाच्या खोडावर गाडी चालविली गेली याने मात्र गाडीचे भरपूर नुकसान झाले सुदयवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. यावेळी येथील नागरिक ही मोठ्या प्रमाणात एकत्र झाले होते , या वडाच्या झाडाचे खोड भरपूर दिवसापासून रस्त्यावर बाहेर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे, या वडाच्या झाडाजवळ नगरसेवक दिलीप पोकळे यांचे कार्यलय आहे ,…

Read More