जळगाव प्रतिनिधी । दुचाकीवर मागे बसलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगलपोत धूमस्टाईलने लंपास केल्याची घटना २ रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील जामनेर येथून नातेवाईकाचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची चैन चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना जळगाव औरंगाबाद रोडवर बाफना गो शाळेजवळ समोर घडली. जळगाव शहरातील रिंगरोड परिरातील रहिवासी सरोज प्रफुल्लकुमार चोपडा वय ५६ ह्या मंगळवारी सकाळी त्यांच्या काकसासर्यांच्या बाराव्याच्या कार्यक्रमासाठी जामनेर येथे गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून मंगळवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ पतीसह दुचाकी क्रमांक (एम.एच.१९ ए.आर.४१९६) ने जळगावकडे परतत होत्या. जळगाव-औरंगाबाद रोडवर बाफना गोशाळेसमोर चोपडा…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,८५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,७४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,८५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०९०…
जळगाव प्रतिनिधी । गोलाणी मार्केटमधील दुचाकी चोरीस गेलेल्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. व त्याच्याकडून १० दुचाकी हस्तगत केलेल्या आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरीच्या घटना समोर येत होत्या. याबाबत शहर पोलिस स्थानकात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याबाबत बाबत विशेष सूचना दिल्या होत्या. याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी डी.बी. पथक तयार करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार शहर पोलीस…
जळगाव, प्रतिनिधी । कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील, गिरणा मोठा प्रकल्प, पांझण डावा कालवा, जामदा डावा आणि उजवा कालवा, निम्म गिरणा कालवा, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व वळण बंधाऱ्यावरील अधिसुचित नदी, नाले तसेच गिरणा नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर, 2021 पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे. सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर, 2021 पर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार…
यावल, प्रतिनिधी । यावल शहरातील वार्ड क्रमांक चार मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी पिल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वार्डातील नागरिकांसह शिवसेना शहर प्रमुख,उपप्रमुख यांनी यावल नगरपरिषद अध्यक्ष सौ.नोंशाद तडवी यांना लेखी निवेदन दिले. सोमवार दि.1नोव्हेंबर 2021रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल शहरात वार्ड क्र.4 मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,त्यामुळे वार्ड क्र.4मधील पाईप लाईन बदलवून शुद्ध पाणीपुरवठा करणेबाबत कार्यवाही करावी कारण दूषित पाणी सेवन केल्याने कोणतेही दुष्परिणाम तसेच साथीचे रोग उद्भवल्यास त्याला नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी जबाबदार…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर शहरातील विश्रामगृहात भारतीय भटके-विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगाव कर यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर तालुका बैठक संपन्न झाली. या बैठकीत जामनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्षपदी तुकाराम काळे तर उपाध्यक्षपदी उस्मान भाई गॅरेज वाले सांडू तडवी सरचिटणीस पदी पत्रकार गणेश पांढरे सचिव सुरेश काळे सहसचिव गोविंदा रूम कोषाध्यक्ष कडोबा नवघरे जामनेर शहर अध्यक्षपदी अमोल लोहार तर उपाध्यक्षपदी न्यानेश्वर ताठे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली या बैठकीसाठी संदीप काळे गणेश काळे अमोल लोहार उस्मान शेख तुकाराम काळे संदीप काळे ईश्वर काळे अतुल महाजन गोविंदा लोहार सांडू तडवी गणेश पांढरे यांच्यासह पदाधिकारी…
मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता हजर करण्यात येणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.
मुंबई, वृत्तसंस्था । दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही. दिल्लीत १४.२ किलोच्या…
जळगाव, प्रतिनिधी । WIFA अर्थात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजेच महाराष्ट्र फूटबॉल बॉडी ची ७२ वी सर्व साधारण सभा पुणे येथील भारती विद्यापीठात शनिवार ३० ऑक्टोबर रोजी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात एकूण 36 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, दुसरे उपाध्यक्ष व राज्य मंत्री डॉ विश्वजित कदम , तिसरे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजी राजे छत्रपती सह सचिव सॉर्टर वाझ,खजिनदार प्यारेलाल चौधरी उपस्थित होते. एकूण ७ ठराव सर्व संमतीने पारित झाले. आयत्या विषयावर जिल्ह्यातील अडचणी मांडतांना जळगांव जिल्ह्याचे सचिव फारूक शेख यांनी राष्ट्रीय व खास करून संतोष ट्रॉफी साठी मुंबई,पुणे,…
जळगाव, प्रतिनिधी । दि. 30 ऑक्टोबर रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, डॉ. नितीन पाटील डॉक्टर कराळे, तुषार वाघुळदे, चेन्नईहून डॉक्टर बॅग उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोना काळात रुग्णांची सेवा व पूर्ण जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुमैय्या शेख यांना खान्देश गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.