Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । भडगाव शहरातील अज्ञात व्यक्तींनी एकाला मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव शहरातील युवकाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. सद्दाम अली फतरू अली (वय-२४ , रा. यशवंत नगर, वरची बर्डी भडगाव ) असे मयत युवकाचे नाव असून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सद्दाम अली हे पत्नी यास्मीन व तीन मुलांसह राहत होते. बांधकामावरील सेटींगचे काम करून उदरनिर्वाह करत होते . शनिवारी रात्री सद्दाम अली नवीन पारोळा रोडवर ताडीच्या दुकानावर…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील एका बंद घरातील चोरट्याने सोने चांदींसह रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घरातील लाकडी कपाटातून सोने चांदी व रोकड असे ३ लाख ६४ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शहरातील छायादीग्राम भागात उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील छायादीग्राम भागात राहणारे अविनाश फकिरराव चव्हाण (वय-४०) हे दिवाळी निमित्ताने शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह नातेवाईकांकडे गेले. मात्र रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता ते आपल्या घरी परतल्यावर स्वयंपाक गृहाच्या…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील बहाळ गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील भऊर येथील मामा-भाच्याचा मृत्यू झाला असून तिसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील भऊर येथील आकाश भिवसन मोरे (वय १८), अनिल संजय गायकवाड (वय १९) व विनोद विक्रम मोरे (वय १९) हे तिघेही तरुण दुचाकी (एमएच- १९, डिएच- ०१३५)ने रविवारी दुपारी चाळीसगाव येथे गेले होते. यानंतर ते तिघेही रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भऊर गावाकडे निघाले. दरम्यान बहाळ गावापासून जवळच असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात आकाश मोरे व अनिल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनोद मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल तहसील व यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या शेती माल उत्पादनालायक असलेल्या काळ्याभोर शेतजमिनी खरेदी करणेबाबतच्या रजिस्टर सौदे पावत्या व करारनामे करून शेतकऱ्यांच्या नावानेच शेत जमिनी बिनशेती करून प्लॉट विक्री करण्याचा अवैध अनधिकृत गोरख धंदा शेतकर्‍यांच्याच माध्यमातून अनेक शेतकरी, बिल्डर,व्यापारी,शिक्षक करीत असून या प्रकरणात अंदाजे 20 ते 25 कोटीचा महसूल बुडवून बेकायदा प्लॉटची विक्री सुरू केली असल्याबाबत यावल तालुका शिवसेना संस्थापक बाळासाहेब कोलते यांनी तक्रार केली आहे. परंतु या तक्रारीची दखल यावल तहसीलदार यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी न घेता,ठोस कार्यवाही न केल्याने या प्रकरणाकडे तसेच यावल तहसीलदार,व यावल नगरपरिषद…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत शिवीगाळ करत असतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा याबाबतचे निवेदन जळगाव जिल्हा शिवसेनेने पोलीस स्थानकात दिले आहे. राणे बंधूवर गुन्हा दाखल करा अशी मागणी जळगाव जिल्हा शिवसेना व जळगाव महानगर शिवसेनेतर्फे शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बळीराम हिरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भाजपामधील पदाधिकारी निलेश राणे व नितेश राणे हे नेहमीच आमचे येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत अर्वाच्य व शिवीगाळ भाषेचा वापर करत असतात. त्यामुळे त्याच्यावर सायबर क्राईम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर, व्हाट्सअप माध्यमे बंद करण्यात…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली आहे. दिवाळी सणा सोबत येणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण होय प्रेमाचे नाते जपणारा हा सण असून सर्वदूर तो साजरा केला जातो पण अशावेळी समाजासाठी नेहमीच काम करणाऱ्या नारीशक्ती ग्रुप जळगाव ने भाऊबीज हा सण दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सण साजरा केला. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना करदोळा व श्रीफळ, टॉवेल देऊन तसेच ओवाळून खरी भाऊबीज साजरी केली. याप्रसंगी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, महापौर माननीय जयश्रीताई महाजन नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष मनिषा पाटील,सुमित्रा पाटील, नूतन तासखेडकर , भारती…

Read More

फैजपूर, प्रतिनिधी । येथील वीटभट्टी व्यावसायिकाला संशयित आरोपीने हल्ला व रॉड ने मारहाण प्रकरणी चार जणांना फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एक जण फरार झाला आहे. येथील वीटभट्टी व्यावसायिकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींना अटक केली आहे. तर एक अद्याप फरार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, फैजपूर पोलिसात वीट भट्टी व्यावसायिक तरुण आकाश संतोष कापडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणी पोलिसांनी लखन एकनाथ मंडवाले फैजपूर, गोपाळ मधुकर सुरळकर रा. जळगाव खुर्द राकेश प्रकाश मोरे, आकाश रमेश मस्के रा. कंडारी भुसावळ यांना ताब्यात घेत अटक केली अशी माहिती सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली. हे दि.१७ ऑक्टोबर…

Read More

धुळे, प्रतिनिधी । जिल्ह्यातील नगाव गावात, तरुणानी दिवाळीसंदर्भात एक नवीन उपक्रम राबवला, कारण या देशांमध्ये महापुरुषांनी एवढा मोठ स्वराज्य निर्माण करून ठेवले आहे अशा महापुरुषांना दिवाळीचा दिवशी पहिला दिवा लावला. त्यानंतर महाराजांच्या चरणी दिवा लावून अगरबत्ती पेटवून पूजन केलं त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी दुसरा दिवा एक एक दिवा आपल्या दारासमोर लावा असा हा उपक्रम गावातील काही तरुणांनी राबवीण्याचे ठरवले. नंतर प्रत्येकाने आपापल्या दारासमोर दिवा लावला. पुर्ण गाव रात्रीच्या काळोख्या अंधारात लखलखीत प्रकाश तेजमय चमकत होते व गावातील शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी जाऊन महाराजांच्या पुतळ्याचे स्वच्छ पाण्याने स्नान करून पुतळा स्वच्छ करून शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून गावातील कार्यकर्ते इतर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील आज एका भागात राहणाऱ्या कामगाराची ९० हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका कामगाराची ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना तब्बल एका महिन्यानंतर उघड झाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने अनिल कुमार इंद्रदत्त त्रिपाठी( वय ५२ रा. एमआयडीसी, जळगाव) या प्रौढाची ९० हजार ७८० रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. त्रिपाठी यांनी ३ नोव्हेंबर रोजी बँकेत जावून व्यवहार तपासले असता, त्यांना त्यांच्या खात्यातून ९० हजार ७८० रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्रिपाठी हे…

Read More

जळग‍ाव, प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगर भागात शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या घरात शुक्रवारी दुपारी दोन ते तीन दिवसांचे नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळले आले. रामानंदनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला . शहरातील खंडेराव नगरात भाडेकरारावरील एका घरात शेख इरफान शेख पिंजारी हे राहतात. या घराचे पक्के बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना कामगारांनी पत्र लावण्याचे काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो नि विजय शिंदे, पो…

Read More