जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील विराज अशोक कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही निवड जाहीर केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आजवर केलेल्या वाटचालीचे हे फळ आहे. पक्षश्रेष्ठींनी युवासेनेच्या विस्तारासाठी दिलेली ही संधी आव्हानातमक आणि मोठी आहे. शिवसेना, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी तसेच शिवसैनिकांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास विराज कावडीया यांनी व्यक्त केला आहे. विराज कावडीया हे वयाच्या १६ व्या…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारून काम बंद आंदोलन सुरू केले आहे, यात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कडून होत असलेली जनतेची लुबाडणूक थांबवा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक योगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे काही संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून यात काम बंद आंदोलन जवळपास आठ ते दहा दिवसापासून सुरू होते व आजपासून तर सर्व संघटनेचे काम यामध्ये सहभागी झाल्यामुळे आता एकंदरीत संपूर्ण भारतातील तसेच या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या सणाला संप पुकारल्यामुळे बाहेरगावी गेल्यावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप…
जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वसंबंधीत विमा कंपन्याचे प्रतिनिधी व यंत्रणांना दिलेत. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, विविध विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, 15 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन ऑनलाइन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 22 नोव्हेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगररातील भक्तवत्सल श्रीराम मंदिर येथील मंदिराचा आज वर्धापन दिन असल्याने श्रीराम भक्तांनी व परिसरातील नागरिकांनी श्रीरामांच्या प्रतिकृतीत 1 हजार 100 दिवे लावून भक्तीमय वातावरणात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. यावेळी 6 हजार फुटाची श्रीरामांची प्रतिमा साकारून 1 हजार 100 शेणमातीचे दिवे, 17 किलो तेल व 21 जणांनी या प्रतिमा साकारण्यासाठी परिश्रम घेतले. ही प्रतिमा सकारण्यासाठी तब्बल 5 तास लागले. या टीमचे नेतृत्व सचिन कुलकर्णी केले तर या प्रतिमा आशिष सोनवणे व हिमांशू सोनवणे यांनी साकारली. शहरातील नागरिकांनी या दोन दिवसीय कार्यक्रम व दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कुंदन सुर्यवंशी यांनी…
जळगाव, प्रतिनिधी । शिवशंभु संघटनेचे अमळनेर तालुका सरचिटणीसपदी विशाल कदम यांची व शिवशंभू संगटना जळगाव तालुका संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, शिवशंभु संघटना उपाध्यक्ष जळगाव जिल्हा सोपान मानकर, शिवशंभु संघटना अध्यक्ष नितीन पाटील, शिवशंभु संघटनेचा संघटकपदी आनंद आनंद घुगे व जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अध्यक्ष किरण ताडे यांनी नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एकच निर्धार अन्याय विरुद्ध येल्गार या ब्रीदवाक्य प्रमाणे संघटनेचे कार्य व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच गाव तिथे शाखा आणि घर तिथे मावळा हे अभियान राबवून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार असल्याचे यांनी निवडी प्रसंगी सांगितले.
यावल, प्रतिनिधी । जळगाव येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात रगेंल लीला आणि मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार ? झाल्याची घटना चर्चिली जात असल्याने या घटनेची चौकशी करून जो कोणी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जनसामान्यांची मागणी असल्याचे निवेदन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षा सौ वंदना अशोक चौधरी यांनी जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जळगाव शहरात पुन्हा 1994 मधील वासना कांदाच्या घटनेला उजाळा मिळत आहे का यासंदर्भात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील राजकारणात समाजात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिलेल्या निवेदनात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे . आता या पक्षाचे सर्व २४ उमेदवार माघार घेतली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आताच या बहिष्काराची घोषणा केली आहे यावेळी खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार , भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते . महाविकास आघाडीचे घटकपक्ष राज्यात सत्ताधारी आहेत . या आधी जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते . आताच्या निवडणुकीसाठीती अशाच प्रयत्नांमध्ये आम्ही म्हणजे भाजप सर्व पक्षांसोबत सुरुवातीपासून होतो . जागावाटपापर्यंत…
पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील तारखेडा येथीलसुखदेव हिलाल पाटील (वय ४८) या शेतकऱ्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुखदेव पाटील हे सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. दुपारी ते पाणी घ्यायला जवळच्या शेतातील विहिर असलेल्या ठिकाणी गेले. मात्र विहीरीतून पाणी काढत असतांना त्यांचा तोल जावुन ते विहीरीत पडले. त्यातच पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान ते पाणी घेऊन परतले नसल्याने घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेत असतांनाच धना अहिरे यांच्या शेतातील विहीरी जवळ सुखदेव पाटील यांचे बुट दिसून आले.…