जळगाव, प्रतिनिधी । येथील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी यश संपादन केल्यानंतर आता बँकेच्या अध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला लागली आहे. सर्वाधीक जागा मिळाल्याने अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्यामुळे आता या पदावर कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून भुसावळच्या जागेचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच्या सर्व म्हणजे 20 जागा महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने जिंकल्याची बाब राज्य स्तरावर कुतुहलाचा विषय ठरली आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलचे शिल्पकार हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील होत यात कुणाचे दुमत असू शकत नाही. तर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा नाथाभाऊंनीच केल्याचे आजच्या निकालातून दिसून आले आहे. अगदी अशक्य वाटणाऱ्या जागादेखील…
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,२०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,२८० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…
जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हा व महानगर जिल्ह्याच बैठक भाजपाचे नेते व मा.मंत्री आ.गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या अध्यक्षतेखाली जी.एम.फाउंडेशन येथे संपन्न झाली. सदर बैठकीत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या अभिनंदनाचा ठराव जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी मांडला. यावेळी ठराव मांडतांना खा.उन्मेषदादांनी सांगितले की, आज भारत देश हा महासत्तेकडे जाताना दिसत असून मोदींचे नेतृत्व हे जगमान्य झाले. त्याच प्रमाणे चाळीसगाव चे आमदार मंगेश दादा पाटील यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण याविषयी ठराव मांडला. यावेळी त्यांनी सांगितले की, आज पोलिसलाच सरकारच्या मंत्रीचा शोध घेण्याचे काम करावे लागत असल्यामुळे राजकारणाचे…
जळगाव प्रतिनिधी । मुस्लिम आरक्षण संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. 5 जुलै 2019 रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५ टक्के मुस्लिम शिक्षणिक आरक्षणाचे तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर बिल पास करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या मागणीनुसार न्यायालयाने मान्यता दिलेले ५ टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण लागू करावे, धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या वतीने मिळकतीचे वाटप करून खुद्दार हजरत यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे, वारकरी मंडळी येतील कीर्तनकार यांना…
चाळीसगाव, प्रतिनिधी | २२ वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील सणुजा निरजराव फराटे (वय-२२) ह.मु. पाटणा ता. चाळीसगाव या विवाहित तरूणीचा शिवारातील एका विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सणुजा निरजराव फराटे हि विवाहित तरूणी आहे. तिचे सासर हे पुणे जिल्ह्यातील मांडवगण येथील आहे. तत्पूर्वी ती आपल्या आईवडिलांकडे आलेली असताना हि थरारक घटना घडली. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस…
जळगाव प्रतिनिधी | जिल्हा बँकेच्या आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी १५ केंद्रांवर मतदान घेण्यात आले, यात २ हजार ८५३ मतदारांपैकी २ हजार ६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकुण ९४.०८ टक्के मतदान शांततेत पार पडले. यात सर्वाधिक मतदान मुक्ताईनगर केंद्रावर १०० टक्के झाले. तर त्या खालोखाल भडगाव केंद्रावर ९९.२२ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान यावल केंद्रावर ८८.५९ टक्के झाले आहे. मतदान केंद्र निहाय मतदान आकडेवारी पुढील प्रमाणे : जळगाव ४०० पैकी ३६६ (९१.५०) टक्के, भुसावळ १३९ पैकी १३४ (९६.४० ) टक्के, यावल ३३३ पैकी…
जळगाव प्रतिनिधी | अमरावती येथील दंगलीच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत कलम-१४४ (१)(२)(३) अंतर्गत धरणे, मोर्चे आणि आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सकाळी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात एक दिवसासासाठी जमावबंदीचे निर्देश जारी केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, जळगांव यांनी दिनांक २१/११/२०२१ रोजीचे पत्रान्वये, विविध राजकीय पक्ष/संघटना यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक २२/११/२०२१ रोजी अमरावती येथे दिनांक १२/११/२०२१ रोजी झालेल्या दंगलीची चौकशी तसेच रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी व इतर मागण्याकरीता धरणे…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली. ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात राहणाऱ्या सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मालावली. जिल्हा रुग्णालयात शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे…
राष्ट्रपतीकडून तडवी यांना पुरस्कार, स्वच्छ भारत अभियानात चमकली यावल नगरपालिका यावल, प्रतिनिधी । स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहर (जीएफसी)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये यावल नगरपरिषदेने संपूर्ण भारत देशात चौथा क्रमांक पटकाविला.दिनांक 20 शनिवार रोजी दिल्लीत एका शासकीय समारंभात यावलच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते सन्मानित करून गौरव करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान 2021अंतर्गत कचरा मुक्त शहर (G.F.C)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशपातळीवर चौथा (4) गुणाक्रम प्राप्त करत नगरपरिषद यावलचा दि.20नोव्हेंबर2021रोजी महामहिम राष्ट्रपती मा.रामनाथ जी कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय सचिव…
यावल तालुक्यात कायद्याचा धाक संपला यावल, प्रतिनिधी । बारा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका तरुणाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना यावल तालुक्यात शिरसाड या गावी घडल्याने एकास अटक करण्यात आली.छेडखानी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक राहिला नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. शिरसाड येथील पीडित एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरागड येथे हात मजुरी करून उदरनिर्वाह चालवतात शनिवार दि.20रोजी दुपारी फिर्यादीची12 वर्षाची लहान बहीण गावालगत कपाशीच्या शेतात सरपण जमा करण्यासाठी गेली असता यावेळी शिरसाड येथे राहणारा सखाराम उर्फ अक्रम मानसिंग बिलाला वय25ह.मु.वराडसिम तालुका भुसावल.हा तिथे आला त्यांनी या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला यावेळी मुलीचा आवाज ऐकून काही ग्रामस्थ व फिर्यादी तेथे…