Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । मेडिकल दुकानदाराला मोबाईलवर केवायसी करून घेण्याच्या नावाखाली 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राधाकिसन वाडी येथील मेडीकल दुकानदाराला बीएसएनएल मोबाईल नंबरचे केवायसी करून घेण्याच्या नावाखाली सुमारे ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर वामन कोल्हे (वय ६७, रा. हिरापन्ना आपारमेंट, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, जळगाव) हे मेडिकल स्टोअर करून आपला उदरनिर्वाह करतात. प्रभाकर कोल्हे सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मेडिकल दुकानावर असताना त्यांना एका अनोळखी नंबर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शुल्लक कारणावरून एका 42 वर्षीय युवकाला चार जणांनी लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जुनी जोशी कॉलनी परिसरात राहणाऱ्या गिरीष दिलीप जोशी हे पत्नी मिनाक्षी यांच्यासह राहायला आहे. एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गिरीष जोशी यांच्या घराचे सांडपाणी हे शेजारी राहणारे उमेश हरी लागवे यांच्या अंगणात आले होते. याचा राग उमेश लागवे याला आल्याने त्याने लोखंडी रॉड घेवून गिरीष जोशी यांच्या डोक्यात हाणला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले तर तुषार हरी लागवे, मिनाबाई…

Read More

मलकापूर, प्रतिनिधी । दि. १३ रोजी येथे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे असे प्रतिपादन माजी सैनिक संघटना अध्यक्ष मुरलीधर झनके यांनी श्रद्धांजलीपर व्यक्त केले. मलकापूर येथील शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकाजवळ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रल्हाद काटकर पोलीस निरीक्षक मलकापूर यांनी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.तर ज्या भारत पाकिस्तान युद्धाची सुवर्णजयंती आपण साजरे करत असतानाच अचानक सीडीएस रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात होऊन जनरल रावत समवेत त्यांची पत्नी व 12 सैन्य अधिकारी व जवान यांचा मृत्यू होणे ही अत्यंत घटना दायकबाब आहे. तर शहीदों की चिताओं पर लगेंगे मेले…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । जगणं अधिक सुंदर करण्यासाठी दुसऱ्याचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांचे हात खेचा म्हणजे जगणं आपोआप सुंदर होईल .जशी आपली देवावर श्रद्धा असते, देवाच्या दर्शनासाठी आपण अनेक पायऱ्या चढून दर्शन घेतो तसे आपण आपल्यापेक्षा खालच्या व्यक्तीला हात देत वर नेणं यात खरा आनंद असतो. पूर्वीच्या काळी टिव्ही चॅनेलवर फक्त दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होते तरीही आपण टिव्ही चॅनेलचा निखळ आनंद घेतला आणि आज हजारो चॅनल्स असून सुध्दा आनंद हरवला आहे. जुन्या मालिकांना उजाळा देत नव्या मालिकाचा परिचय करुन दिला.माणसे पैशाने , शिक्षणाने मोठी झालीत पण मनाने मात्र बारीक, छोटी झालीत त्यामूळे जगण्याची सुंदरता हरवत चालली आहे तेव्हा जगण्याची सुंदरता पुन्हा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मानियार बिरादरी ने पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कांताई सभागृहात जळगाव जिल्ह्यातील उर्दू साहित्यिकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता त्या समारंभात जिल्ह्यातील क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्र शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान साजिद खान हिने कॅरम या खेळात अत्यंत उच्च पदी जाऊन जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलं व भारताला सुवर्ण व कांस्य पदक मिळवून दिले तसेच आठ वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले व सुमारे ३२ वेळेला महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करून पदक मिळवले व आता नुकत्याच झालेल्या १ ते ५ डिसेंबर च्या राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात यंदा समाधान कारक पर्जन्यमान झालेले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व बियाणे लागवड उप अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम या दोन योजनेंतर्गत हरभरा, ज्वारी, मका, गहू बियाणे अनुदान तत्वावर वाटप होणार आहे. रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-202 व बीडीएनजीके-798 या वाणांचे एकूण 6291 प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । “खाजगी ऍप्समध्ये चांगलं प्रेझेंटेशन असू शकतं, पण आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे असलेलं ज्ञान बाहेर क्वचित असेल, ते ज्ञान व्ही – स्कूल ने एका ठिकाणी आणलं आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्हाभरातील शिक्षक एकमेकांकडून शिकत आहेत, पिअर लर्निंगच्या माध्यमातून जिल्हाभरातील शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतील. यातून तयार होणारे धडे हे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करतीलच, पण या प्रक्रियेत आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांचे जे प्रशिक्षण झाले आहे, त्याचा फायदा दूरगामी असेल.,”असे उद्गार जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा परिषद व वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमातून जिल्हा परिषदेच्या नियोजन समिती हॉलमध्ये व्ही – स्कूल ऍप प्रकल्पात…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विविध ठिकाणी मोबाईल हिसकविणारे दोघे चोरट्यांनी आज जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि 21 रोजी वेळ सायंकाळच्या सुमारास फिर्यादी हितेश प्रशांत बऱ्हाटे रा. मुक्ताईनगर जळगाव हे त्याच्या आईचे मोबाईलला टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलनी येथे जात असतांना दोन अज्ञात चोरट्यांनी ओप्पो कंपनीचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून मोटर सायकलवर पळून गेल्याची घटना घडली. त्यानंतर त्यांनीच गायत्री अमरलाल अडवाणी रा. सिंधी कॉलनी यांचा सिंधी कॉलनी येथून मोबाइल हिसकावून पळून गेले होते, तसेच अनुप पवार रा. गणेश कॉलनी यांचा रिंगरोड जळगाव येथून दोघांनी त्यांचा मोबाइल हिसकावून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या सहकार पॅनेलने बहुमताने दणदणीत विजय मिळवला . त्यामुळेच भाजपचे गिरीष महाजन यांची राज्यभरात नाचक्की झाल्याने महानगरपालिका सत्तांतर प्रकरणानंतर उरली सुरली अब्रूही गेल्याने नाथाभाऊंना डीवचण्याचा प्रयत्न करून स्वतःलाच खाजवून खरूज करून घेतांना दिसत आहे . जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपतर्फे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, माजी पालकमंत्री, विविध प्रदेश व जिल्हा पदाधिकारी असे सक्षम उमेदवार देण्यात आले होते . सदर निवडणूक बिनविरोध होऊन पराभवाची नाचक्की टाळता यावी याकरिताच गिरीष महाजन व भाजपचे ईच्छूक उमेदवार नाथाभाऊंच्या मागे तिन तिन वेळा फिरत होते . पण निवडणुकीत गिरीष महाजन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । संस्थापक अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या जळगांव जिल्हा संघटनेची पुर्नरबांधणी करून जिल्हा,तालुका व शहर कार्यकारणीची नविन बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करून मान्यतेसाठी केंद्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. तरी जळगाव जिल्ह्य़ातील कार्यकत्याची (आदरणीय अण्णा हजारे समर्थक आणि सदस्य) तसेच आंदोलनात, समाजसेवेसाठी नव्याने सहभागी होवू इच्छिणाऱ्या कार्यकत्याची सभा आयोजित केली आहे. अशोक सब्बन निरीक्षक तथा सरचिटणीस भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शुक्रवार,दि.26 नोव्हेंबर 2021रोजी दुपारी ठीक 1 वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रामाणिक, चारित्रसंपन्न,त्यागी, निस्पॄह,सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या व समाज कार्यासाठी वेळ देवू…

Read More