जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका मेडिकल व्यावसायिकाची दीड लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडली याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रिंगरोडवरील राहणाऱ्या मेडीकल व्यवसायीकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्न नरेंद्र जैन (वय-३५) रा. चंद्रप्रभा कॉलनी रिंगरोड हे मेडीकल साहित्य खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. ९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी फार्मासीटीकल इण्डी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्याला सिरीन अर्थात…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । देशामध्ये डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया प्रकरण घडलं , सार्वजनिक ठिकाणी अत्यंत क्रुर आणि हिंसात्मक घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून १६ डिसेंबर पासून राज्यभरात “आदिशक्ती अभियान” उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वतीने देण्यात आली. या अभियानाची सुरुवात रंगशारदा सभागृह , बांद्रा वेस्ट , मुंबई येथे संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे. स्त्री शिकून कितीही स्वावलंबी झाली, प्रगतीची असंख्य शिखरं तिने पार करुन वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला तरी ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली किंवा निर्भय झाली असं आजही म्हणता येणार नाही.…
मुंबई, वृत्तसंस्था । जगात आधीच कोरोना विषाणूने थैमान घातले असताना राज्यावर कोरोनाचे नवे संकट ओमायक्रॉनचे संकट वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र जनतेला नेहमी वेठीस धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र विसर पडल्याचे वारंवार दिसून येत आहे. राज्यातील अनेक नेते बैठका आणि सभेच्या ठिकाणी विनामास्क फिरताना दिसून येतात. याचदरम्यान, मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क भिरणाऱ्या भाजपच्या आमदारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंत्रालयाच्या आवारात विनामास्क फिरणाऱ्या भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आ. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. मंगेश चव्हाण यांनीही…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एम जे महाविद्यालय परिसरातील चाय सुट्टा बार या हॉटेलात दारू पिऊन धुमाकूळ घालणाऱ्या तिघे संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये दारू पिऊन धुमाकूळ घालणार्या तसेच पिस्तुलाची धमकी दाखवणाऱ्या तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. यातील एक स्वयंंघोषीत डॉन असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. संदीप उर्फ डॉन मधुकर निकम व अंकुश मधुकर सुरवाडे (दोघे रा. गेंदालाल मिल) व एक अल्पवयीन मुलगा या तिघांनी मू. जे. महाविद्यालय परिसरातील चाय सुट्टा बार या हॉटेलात धुमाकूळ घातला. दुपारी ते तिघे…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,१६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७८० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
जळगाव, प्रतिनिधी । ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती राहिले’ असं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय भवरलाल जैन. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन ज्यांनी विकासाचा ध्यास घेतला होता अशा व्यक्तिमत्वाला मनापासून भावांजली वाहतो असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ‘भाऊंना भावांजली’ या कार्यक्रमात काढले. बहिणाबाईंच्या कवितेने व गीतांनी परिवर्तनच्या “अरे संसार संसार” कार्यक्रमाने भावांजली महोत्सवाला सुरवात झाली. संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनतर्फे पद्मश्री भवरलाल जैन यांना आदरांजली देणारा आठ दिवसीय ‘भावांजली महोत्सवा’चे उद्घाटन भाऊंच्या उद्यानातील ऍम्फि थिएटरमध्ये करण्यात आले. याप्रसंगी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन,…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या डॅशिंग, फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil)यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्या लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) घड्याळ हाती बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी पार पडेल . गेल्या काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. पक्षातील काही रिकामटेकडे लोक आपल्याविषयी नको ती चर्चा करतात अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली होती. हे पाहता रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा पाठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण…
नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सचा एक लोडर मुंबई-अबू धाबी फ्लाईटच्या कार्गो डब्यात झोपला होता, परंतु यूएईच्या राजधानीत पोहोचल्यावर सुरक्षित आढळून आला, असे विमान वाहतूक नियामकच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले. त्यांनी सांगितले की, रविवारच्या फ्लाईटमध्ये, विमान लोड केल्यानंतर खाजगी वाहकांचा एक लोडर मालवाहू डब्यात सामानाच्या मागे झोपला होता. अधिका-यांनी सांगितले की, कार्गोचा दरवाजा लॉक होता आणि विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण करताच लोडरला जाग आली. ते म्हणाले की, विमान संयुक्त अरब अमिरातमधील राजधानी अबुधाबी येथे विमानाने लँडिंग केल्यानंतर अबू धाबीच्या अधिकाऱ्यांनी लोडरची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याची शारीरिक स्थिती स्थिर आणि सामान्य असल्याचे सांगितले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी सांगितले की, अबू-धाबीच्या अधिकाऱ्यांकडून…
जळगाव, प्रतिनिधी । माणसांची संगत खूप महत्त्वाची आहे. चांगली संगत तुम्हाला नैतिक जीवन जगण्यास प्रेरित करीत असते. वाईट संगत तुमच्या अधोगतीकडे तुम्हाला नेत असते. व्यक्तीने आयुष्यामध्ये भगवंताची साधना केली तर नक्कीच आयुष्यात प्रगती होते, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांनी केले. नेहरू नगरातील शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित श्रीमद् भागवत संगीतमय भागवत कथा आणि अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कथेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी अनुक्रमे बीड येथील हभप सोनालीताई करपे महाराज आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांचे कीर्तन झाले. कीर्तनामध्ये त्यांनी विविध संतांच्या अभंगांचे…
जळगाव, प्रतिनिधी । नशिराबाद येथील मन्यारखेडा परिसरातील फातेमा नगरात घरफोडीतील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मन्यारखेडा येथील फातेमा नगरातील घरातून रोकडसह दोन मोबाईल लांबविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. इम्रान शरीफ खान (वय-३६) रा. फातेमा नगर मन्यारखेडा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ३१ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून रोकड आणि दोन मोबाईल असा एकुण २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून…