Author: saimat team

चोपडा, प्रतिनिधी । येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्नाटकातील बंगळूर येथे घडलेल्या विकृत घटनेचा अ.भा.मराठा महासंघ चोपडा तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याबद्दल सविस्तर वृत्त असे की,कर्नाटकातील बंगळूर येथे काही समाजकंटकांनी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर शाई फेक करुन जाणिव पूर्वक विटंबना केली.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत अशा महापुरुषांचा अपमान त्या ठिकाणी केला गेला.त्यामुळे बंगळूर येथील घटनेमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या.या विकृत घटनेच्या निषेधार्थ चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या स्मारकावर दुग्धाभिषेक करुन माल्यार्पण करण्यात आले.तसेच कन्नड समितीच्या जाहिर निषेधार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला.त्यानंतर चोपडा तहसील व शहर पोलिस…

Read More

जळगाव :- प्रतिनिधी   बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खडसे यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनीही निवडणुकीसाठी युद्धपातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बोदवड येथे झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. कोण कुठे होते माझ्यापुढे शेपटी हलवणारे मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं? टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं, पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता, असे म्हणत खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना खडेबोल सुनावले…

Read More

मुंबई : देशातील महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’चे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. राफेलमधील दलाली, नोटबंदीमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात कोणत्या पक्षाच्या लोकांनी करोडो रुपयांची दलाली खाल्ली हे देशाच्या जनतेला माहित आहे, असे खरमरीत उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे. अमित शहा आणि भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले, ‘डीबीटी’ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना १ जानेवारी २०१३ रोजी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने सुरु केली त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला…

Read More

रावेर ः तालुका प्रतिनिधी मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात टॅक्सीने आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव पोलिसांनी रावेर येथे ताब्यात घेऊन तिच्याकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने केली मात्र रावेर पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्याचा भस्मासुर बोकाळला असून अवैध धंद्यावाल्यांनी चहा व पानटपरी सारखी आपली दुकाने थाटली आहेत. रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे कायदेप्रिय आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गुड बुक मधील ते अधिकारी असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे मात्र अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालून अवैध धंद्यांना चालना देण्याचे कामही त्यांच्या मार्फत होत असल्याने त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा योजनेंतर्गत रु. 64.76 कोटीच्या जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभाचे उद्घाटनआज 11 वाजता उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे होते. याप्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,डॉ.सतिष पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांचा सहभाग होता.   यावेळी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप पाटील, , माजी आमदार कैलास पाटील, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, माजी शिक्षक आमदार…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. संबंधीत प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळूंदे हे वास्तव्यास नाशिकला असतात, त्याचा गैरफायदा घेत स्थानिक उपविभागीय अभियंता हे त्यांचा मनमानी कारभार चालवित असल्याच्या तक्रारी जोर धरीत आहेत. याबाबत काही ठेकेदार अधिक्षक अभियंता व मुख्यअभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जळगाव येथील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयातील अजब गजब किस्से यापूर्वीही सायंदैनिक साईमतने सडेतोड प्रकाशित केले आहेत. यात नव्याने भर पाडीत स्थानिक उपविभागीय अभियंते यांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदार त्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक…

Read More

जळगाव- शासकीय क्रीडा सप्ताहअंतर्गत बहिणाबाई माध्यमिक विद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाच्या विविध पुस्तकांच्या वाचनातून व साहित्यांच्या आधारे रुची वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात आले गिर्यारोहण अथवा ट्रेकिंग विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वामधील सुप्तगुणांना वाव देते आणि भविष्यात एक जबाबदार नागरिक बनवून नेतृत्वगुण सोबत त्यागाची भावना, धाडसीपणा ,  काटक ता ,स्वावलंबन असे गुण विकसित   होतात असे डॉ. विलास नारखेडे यांनी  क्रीडा सप्ताहप्रसंगी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक  टी एस चौधरी यांनी प्रेरक वाचनामुळे   धाडसी कृत्ते  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपणास मार्गदर्शक ठरतात असे मत व्यक्त केले. याप्रसंगी गिर्यारोहणासाठी आवश्यक कपडे व उपकरणे नकाशा वाचन हार्नेस ,रोप, बुट, अशाप्रकारे ट्रेकिंगची  माहिती व उपयोग डॉ. विलास…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ‘कोविड- 19’ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात मोठी घट झाली असूनही नागरिकांच्या आरोग्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निगडित असलेल्या योजनांना राज्यातील महाविकास आघाडी शासन प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. चोपडा, जि. जळगाव नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा (अंदाजपत्रकीय रक्कम 64.76 कोटी रुपये) योजनेंतर्गत जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचा उद्घाटन सोहळा गृहमंत्री श्री. वळसे- पाटील यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती…

Read More

यावल, प्रतिनिधी । गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून यावल तालुक्यात रेशन सार्वजनिक वितरण प्रणालीत मोठा घोळ सुरू आहे.दक्षता समितीचे कामकाज सुद्धा फक्त कागदोपत्री असल्याने अनेक रेशन कार्ड धारकांच्या समस्यांकडे, आणि तक्रारीकडे जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा,जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव,फैजपूर भाग प्रांताधिकारी,तहसीलदार यावल कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.यात सर्वात प्रथम जबाबदार ज्या त्या गावातील दक्षता समिती अध्यक्ष आणि सचिव सदस्य यांचे हित संबंधामुळे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता काही रेशन कार्ड धारक दक्षता समितीचे सचिव तथा संबंधित तलाठी यांच्या विरोधात लवकरच रीतसर लेखी तक्रारी करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तसेच विशेष करून यावल रावेर तालुक्यात रेशन सार्वजनिक वितरण व्यवस्थेत…

Read More