Author: saimat team

कासोदा ता, एरंडोल, प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार तथा डॉ,एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांनी पत्रकारितेत व समाज कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जळगाव येथील मन्यार बिरादरी तर्फे सन्मानित करण्यात आले जळगाव महापौर जयश्री महाजन मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मलिक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर रफिक मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख उपाध्यक्ष हकीम चौधरी या मान्यवरांचे सह जिल्ह्यातील उर्दू साहित्यिक, उर्दू शायर ,पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ, पाकीजा पटेल एनुद्दीन सर ,पठाण मंजूर , उस्मान पटेल, अडावद बस स्थानक चे वाहतूक नियंत्रक सरताज खान…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,९१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,१६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More

पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । पहुर पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवाल्यामार्फत म्हशीची गाडी सोडण्यासाठी त्याच्या अकाऊंट वर आलेले २ लाख रुपये तसेच सबंधित पोलिस अधिकारी यांच्या शी झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे जिल्हा पोलिस दलात तसेच इतरत्रही एकच खळबळ उडाली. या दोन लाखाच्या स्विकारलेल्या लाचेमुळे पहुर पोलिस चांगलेच अडचणीत आले. या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश डीवायएसपी कैलास गावडे यांना दिले. आज दि.१५रोजी दुपारी चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी कैलास गावडे हे त्यांच्या पथकासह पहुर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी चहावाला गोपाल आस्कर ,पो.काँ.अमोल कुमावत, शेख अमिन,शेख अझरुद्दीन,आत्माराम तेले(धनगर)यांची चौकशी…

Read More

यावल, प्रतिनिधी । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शहा तसेच यावल तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दि. 15 डिसेंबर रोजी यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वर्ष २००६ मध्ये केरळ येथे स्थापन झालेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेचे जाळे आता देशभरात पसरले आहे.ही संघटना अत्यंत जहाल असून अनेक देशविघातक आणि समाजविघातक कार्यात गुंतलेली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.ही संघटना देशातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.या दृष्टीने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संदर्भात अत्यंत गंभीर अशी सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. त्यांच्याकडे जशी खिलाडूवृत्ती आहे तशी प्रत्येकाकडे असायला हवी. जय पराजयाची ते चिंता करीत नाहीत. लढणे हा त्यांचा स्थायीभाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळात केले. भुसावळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी चषक जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा (पुरुष गट) आयोजित केलेल्या आहेत. जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात उद्घाटन सत्रात माजी महसूलमंत्री खडसे हे बोलत होते. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ध्वजारोहण तर उद्योजक राजेश राका यांनी क्रीडांगण पुजन केले.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दुर्दैवी आहे मात्र ओबीसी अरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये अशी आमची भूमिका आहे यासाठी राज्य सरकार निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. मा. सर्वोच न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील मोठा फटका बसला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की आम्ही वारंवार केंद्राकडे ओबीसी आरक्षण टिकावे यासाठी लागणार डाटा मागत होतो. सुप्रीम कोर्टात देखील आम्ही हीच मागणी केली होती. मात्र भारत सरकारने…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज सकाळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके (धुळे) यावेळी उपस्थित होते. महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शासन आणि माध्यमांमधील संवाद वृद्धिंगत होईल. जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माध्यमांमधील नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाची माहिती करून घेत शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहण्याची सूचना केली. जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत आणि श्री.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, “छात्र नेता” संमेलन कार्यक्रमात कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. परिसराची कार्यकारणी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप महारष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे उपस्थित होते. कार्यकारणीची निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप जळगाव महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील यांनी काम पाहिले. यावेळी मंचावर महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील, महानगर मंत्री रितेश महाजन, कवयित्री बहिणाबाई नगर नगर मंत्री आकाश पाटील उपस्थित होते. अभाविप प्रदेश सहमंत्री यांनी अभाविप मांडणी करत. अभाविपच्या व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा ज्वलंत इतिहास कार्यकर्त्यांसमोर मांडला. अभाविपच्या कामात सामूहिक तिचे महत्त्व पटवून दिले.तसेच परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे. तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला होता. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बधुवारी त्यांचं निधन झालं. तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या…

Read More