Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । सोलापूर येथे नुकतेच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नेतृत्व केले. स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमतर्फे कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, धावणे, आर्चरी, स्विमिंग, बॅडमिंटन,चेस व गोळा फेक या स्पर्धेत जिल्हाभरातून 98 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात व्हॉलीबॉल टीम (चोपडा) ला सिल्व्हर मेडल, स्विमींग मध्ये ऋषिकेश पाटील (चोपडा) गोल्ड मेडल, चेस स्पर्धेत मध्ये राहुल लोहार यांना गोल्ड मेडल (चोपडा), तुषार पाटील यांना सिल्व्हर मेडल (धरणगाव),…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । एज्युकेशन वर्ल्ड मानवी विकास मासिक यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतातील साडेतीन हजार शाळांपैकी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने १५५० पैकी १०६५ गुण प्राप्त करून भारतातील सर्वोत्तम डे कम बोर्डिंगचा पुरस्कार प्राप्त केला आहे. भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात जास्त वाचले जाणारे प्रचलित मासिक एज्युकेशन वर्ल्ड व संशोधन केंद्र यांनी केलेल्या शाळा रँकिंग सर्वेक्षणामध्ये सदर शाळेची निवड झाली. ही निवड करण्यासाठी विविध मापदंडाचा विचार केला गेला. जसे की सह अभ्यासक्रम क्रियाकलाप, विद्यार्थ्यांची वैयक्तिक उपस्थिती, शैक्षणिक प्रतिष्ठा, अध्यापन शास्त्र व क्षमता विकास, शिक्षण परिणामकारकता , नेतृत्व गुणवत्ता, पालकांचा सहभाग, पायाभूत सुविधांची तरतुद, पैशाचे मूल्य, मानसिक व भावनिक आरोग्य सेवा, समुदाय सेवा इ.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या दिनांक २२ डिसेंबर पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत असून आज अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांचा उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा.श्री. नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आढावा घेतला. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी मा.सभापती यांनी दिल्या. सोमवार, दिनांक २० डिसेंबर रोजी एकूण २६७८ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे. लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत श्री सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना श्री. सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकलुती येथील सुभाष मधुकर महाजन प्रगतशील शेतकरी यांनी आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या राजगड निवासस्थानी सुभाष महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा सत्कार डॉक्टर मनोज पाटील यांनी केला. याप्रसंगी शिवसेना प्रसिद्ध प्रमुख गणेश पांढरे अभिषेक पाटील वसंत न्हावीआदी मान्यवर उपस्थित होते जामनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत प्रवेश करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जामनेर तालुका शिवसेनेचा भगवा झंझावात दिसून येत आहे

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन काँसनट्रेटर, मॅमोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झाला नसल्याची माहिती पत्रपरिषदेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. दोन महिन्यांपासून घोटाळ्याबाबत होत असलेल्या चर्चांना त्यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला. जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयविषयी विविध खोटे आरोप करून जनमानसात जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सोमवार दि. २० डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची सत्यता मांडली. व्हेंटिलेटर खरेदी घोटाळा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस, मॅमोग्राफी मशीन धूळखात अशा प्रमुख मुद्द्यांवर आरोप माहिती अधिकार…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव-लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त समिधा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दिव्या यशवंत भोसले यांनी ऑनलाईन पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. दि १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१ ला संपन्न झालेल्या व्याख्यानमालेचे उदघाटन सकाळ समूहाचे मुख्य संपादक संदीप काळे यांच्या हस्ते करण्यात आले, तर गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. जिजाऊ, सावित्री ते आजची स्त्री : प्रगती ते अधोगती या विषयावर बोलतांना स्त्रीला अजूनही स्वतःच्या हक्क मागणीसाठी झगडावं लागत हे दुःख असल्याचे सांगत. स्वराज्यात शिक्यावर स्त्री ला मान होता. आज स्त्रीला आर्थिक सक्षमता हवी आहे, आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे, समाजात घरात…

Read More

यावल, प्रतिनिधी । राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013अंतर्गत रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने विविध अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत परंतु यावल रावेर तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात आणि जिल्ह्यात रेशन कार्ड धारकाचे हक्क आणि अधिकार कोणी आणि कशासाठी कोणत्या हेतूने खड्ड्यात टाकले याकडे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रेशनकार्डधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे रेशन कार्डधारकांना मध्ये पुरवठा विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रेशन धान्य दुकान धान्य वाटप/वितरण करण्यासाठी सकाळी चार तास आणि दुपारी चार तास धान्य दुकान सुरू पाहिजे आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते. प्रत्येक रेशन दुकानांमध्ये दर्शनी भागात रेशन कार्ड धारक यांना…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आनंद, समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते, यातूनच वैचारिक समृद्धी घडते. ‘भाऊंना भावांजली’ परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी चित्रप्रदर्शनातील ‘कला आणि माणूस’ या संदर्भात चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी देशदूतचे संपादक हेमंत अलोने, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, हरुन पटेल, ज्ञानेश्वर शेंडे, कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सहभाग घेतला. कला आणि संस्कृती यांची माणसाच्या जडणघडणीत असलेले महत्त्व याविषयी चर्चा करताना हरुन पटेल यांनी जगण्याचे सौंदर्य निर्माण करते ती कला असे स्पष्ट केले. कलावंत हा नेहमी नवे भावविश्व निर्माण करीत असतो, यातूनही बौद्धिक समृद्धी घडते. माणसाच्या इतिहासाचा आढावा घेतला असता तर मूळ…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । येथील लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून येणाऱ्या रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले असून यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या पॅजो रिक्षाला समोरून धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी हा अपघात घडला. लाकडाने भरलेला ट्रक जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा येत होती. गारखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन जण…

Read More