जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा जळगाव दौरा राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय मिळाले किंवा मिळणार हे अद्याप सांगता येणार नाही. तरी पक्षीय पातळीवर आणि राजकीयदृष्ट्या हा दौरा यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. वास्तविक, जळगाव जिल्ह्यातील २००९ च्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात पाच आमदारांसह राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आले आहेत. जिल्ह्यात भाजपा सध्या बॅकफूटवर आहे. भाजपाला मागे ठेवण्यात खडसेंचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनाही सहकार क्षेत्रात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । रावेर येथील कारवाईत एक कोटी रुपयांची ब्राऊन शुगर महिलेला अटक करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व महसूल प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली आहे. एका महिलेस तब्बल एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगर व हेरॉईनसह अटक करण्यात आली असून एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिस व महसूल प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केली. अलीकडच्या काळातील अंमली पदार्थ मिळण्याची ही सर्वात मोठी घटना असून याचे धागेदोरे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जुडले असल्याची शक्यता देखील असल्यामुळे ही कारवाई अतिशय महत्वाची मानली जात आहे. पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना रावेर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ चौकात एक…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किमत असलेले ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या राज्यातून दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली आहे. संशयीताकडे प्रतिबंधीत ड्रग्ज ब्राऊन शुगर असल्याची दाट शक्यता आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीने रावेर तालुक्यात मोठी कारवाई करून अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. एलसीबीच्या पथकाला रावेर तालुक्यात अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या संदर्भात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आले असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईला एलसीबीच्या सूत्रांनी दुजोरा दिला असला तरी या संदर्भात सायंकाळी पत्रकार…
भडगाव, प्रतिनिधी । शहरातील एका भागात चोरी झालेल्या घटनेतील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी या तिघांविरुद्ध भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील यशवंतनगर भागात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. भडगावातील यशवंतनगर भागात अर्जून भिल्ल यांचे घर फोडून चोरांनी ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. या गुन्यातील तीन संशयित सुनील परशुराम पवार (वय २२), अनिल विरभान सूर्यवंशी (वय २७), विजय प्रकाश घोडेस्वार (वय १९) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ मोबाइल आणि चार हजार रुपये रोख हस्तगत…
भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नीती आणि सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी गोस्वामी होते. यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख डॉ .के .के . अहिरे, प्रा एस. के . राठोड , माजी विद्यार्थी अदनान अहमद उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ . ए .डी गोस्वामी म्हणाले- भारत हा विविधतेने नटलेला देश आहे .भारतामध्ये वेगवेगळे प्रांतात भाषा ,जात, धर्म ,आहेत. संविधानाने अल्पसंख्यांकाचा दर्जाचा प्राप्त झाला असून सर्वांना समान न्याय दिलेला आहे असे मत त्यांनी मांडले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानस नीती व सामाजिक…
जळगाव, प्रतिनिधी । एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय मुलगी आपल्या आई- वडिलांसह राहते. शुक्रवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अल्पवयीन मुलगी आजीच्या घरी गेली होती. त्यावेळी तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
जळगाव, प्रतिनिधी । जोशी पेठ येथील राहणाऱ्या २० वर्षे विवाहितेचा राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील जोशीपेठ परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविले. तुम्पा वासुदेव घोराई (२०, मुळ रा.कोलकाता) असे विवाहितेचे नाव असून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री जोशी पेठेत घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोलकाता येथील वासुदेव सनद घोराई यांनी तुम्पा यांच्याशी यापूर्वी नोंदणी पध्दतीने विवाह केला होता. आई-वडील चार ते पाच वर्षापासून जळगावात वास्तव्यास असल्यामुळे दोन महिन्यापूर्वी ते येथे आले होते.…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यात कापसाने भरलेला ट्रकसह संशयित आरोपी याला ताब्यात घेतले आहे. व त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शेरी येथील चार शेतकरी धर्मराज शांताराम पाटील, संजय चिंधु पाटील, ज्ञानेश्वर हरी पाटील, विनोद कडू काकडे यांनी अँग्रो फायबर प्राँडक्ट धंधुका जिल्हा अहमदाबाद(गुजरात)या जिनिंग मालकाशी प्रतिक्विंटल ८२५० रुपये भाव ठरवून दि.१२/११/२१रोजी सांयकाळी ५ वाजता चालक राजु केडिया यांच्या जीजे०५झेड२९१४या ट्रक मध्ये१५०क्विंटल कापूस पाठवला होता.दि.१४/११/२१रोजी ट्रक चालकराजु केडिया याला मोबाईल लावला असता त्याचा मोबाईल नंबर बंद आल्याने संशय आल्याने पहुर पोलिसात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पहुर पोलिस व एलसीबी…
मुंबई, वृत्तसंस्था । पाईपद्वारे घरोघरी पोहोचणाऱ्या एलपीजी आणि वाहन इंधन सीएनजीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमध्ये कराचा समावेश आहे. हे नवे दर शनिवारी सकाळपासून म्हणजेच १८ डिसेंबर पासून लागू झाले आहेत. सीएनजी व्यतिरिक्त एलपीजी पीएनजीच्या दरातही प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईत नवीन दर ६३.५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याच वेळी, मुंबईतील पाइप नॅचरल गॅसची सुधारित किंमत ३८ रुपये प्रति युनिटवर गेली आहे., मुंबई महानगर प्रदेशात गेल्या ११ महिन्यांत सीएनजीच्या किमतीत १६ रुपये प्रति किलोने वाढ…