Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी येथे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्याची घटना घडली. डोक्यात कृषी अवजार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी गुरुवारी दुपारी १.३० वाजता सिंधी कॉलनीत गेले असता एका प्राैढाने त्यांना मारहाण केली. डोक्यात कृषी अवजार (टिकाव) मारण्याचा प्रयत्न झाला. संपूर्ण प्रकार पथकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. सहायक अभियंता जयेश रजनिकांत तिवारी यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्यानुसार, तिवारी हे दीक्षितवाडीतील पावर हाऊस येथे नोकरीस आहेत. गुरुवारी दुपारी ते कार्यालयीन सहायक योगेश जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे, तंत्रज्ञ मधुकर कांबळे व कंत्राटी कर्मचारी गणेश जगन्नाथ…
जामनेर, प्रतिनिधी । ब्रिटिश कालीन ऐतिहासिक पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बंद पडू देणार नाही त्यासाठी प्रसंगी व्यापक जनआंदोलन छेडले जाईल असे प्रतिपादन पी जे रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख ते पहुर येथील कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी सुरू केलेली पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बंद करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून पीजे रेल्वेचा आशा गुंडाळण्याचा विश्वास वृत्तामुळे पाचोरा व जामनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे गोर गरीबाची सर्वसामान्य प्रवाशांची जीवनदायिनी समजली जाणारी पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बंद करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासकीय स्तरावरून केल्या जात आहे डिझेल बंद करणे कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र…
यावल, प्रतिनिधी । बोलणाऱ्याचे बोंडे विकले जातात ही म्हण सर्वांना प्रचलित आहे परंतु “सत्य” हे सर्वश्रेष्ठ असल्याचा प्रत्यक्ष अनुभव यावलकरांना आला कारण यावल शहरात गेल्या चार पाच दिवसात जसे थंडीचे प्रमाण वाढले तसेच राजकीय वातावरण सुद्धा तापल्याची एक घटना यावल शहरात घडली आहे परंतु हे प्रकरण एका कर्तव्यदक्ष भुऱ्या अधिकाऱ्यापर्यंत न पोचल्याने यावल शहरात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राजकारणात समाजात किंवा इतर क्षेत्रात एखादा चांगला वक्ता आपला विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी आणि आपल्या विरोधात कोणी काही करू नये म्हणून किंवा आपण अल्पावधीत केलेली कोट्यवधीची कमाई जनतेसमोर येऊ नये म्हणून आपल्या उत्कृष्ट वकृत्व शैलीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून वस्तुस्थितीवर आणि…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,३०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,३०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
चोपडा, प्रतिनिधी । येथिल ज्येष्ठ नागरिक संघाची 31 डिसेंबर 2021शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता नारायण वाडीतील विठ्ठल मंदिर समोरील ज्येष्ठ नागरिक संघाचे नूतन सभागृह मध्ये 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे अजेंडा मधील विषय सुचितील विषया नुसार कामकाज होणार आहे. सदर बैठक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय करोडपती यांचे अध्यक्षते खाली होणार असून संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, सहसचिव , व बांधकाम समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष यांनी केलेले आहे. सदर बैठकिस महाराष्ट्र शासनाने कोरोना – 19 संदर्भात दिलेल्या सुचनांचे पालन करणेत येईल…
यावल, प्रतिनिधी । यावल महसूल व वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे कोळसा भट्ट्या बिनधास्तपणे सुरू झालेल्या आहेत याकडे यावल पूर्व-पश्चिम वनक्षेत्रपाल आणि तहसीलदार यांचे दुर्लक्ष आहे का?असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. यावल पूर्व-पश्चिम वनविभाग कार्यालय,तसेच यावल तहसील कार्यालयापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर बोरावल,टाकरखेड़ा,भालशिव पिंप्रि परिसरात तसेच हतनूर धरण पाटाच्या आजूबाजूस तसेच तापी नदीच्या किनारपट्टी भागात हजारो बाभुळ व इतर वृक्षांची अनाधिकृतपणे कत्तल करून त्या लाकडांची भट्टी लावून लाकडे जाळून हजारो टन कोळसा निर्मिती करण्याच्या भट्ट्या सुरू झालेल्या आहेत याकडे यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल तसेच यावल तहसीलदार यांनी आपले लक्ष केंद्रित करून कोळसा भट्टी माध्यमातून कोळसा विक्री व्यवसाय करणाऱ्या…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ६ जानेवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर पाचोरा महामार्गावर शहरातीलअंतरावरच नागदेवता मंदिराजवळ इंडिका कार व आयशर ट्रक ज्यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने इंडिगोकार मधील बसलेले दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी नऊ दहाच्या सुमारास घटना घडली. जामनेर पाचोरा महामार्गावर नागदेवता मंदिराजवळ भुसावल कडून येणाऱ्या इंडिगो कार व पाचोरा कडून येणाऱ्या आशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात एक महिला व एक पुरुष जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचारार्थ दाखल केले आहे आज सकाळी भुसावळ येथील रहिवाशी इंडिगो कारmh18w2412 ने लग्नकार्यासाठी…
चोपडा, प्रतिनिधी । शहरातील एका परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून २३ तरुणींची सुटका केली असून यात ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल २३ तरूणींची सुटका करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांच्या पथकाने बुधवारी…