जळगाव – शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेवर पोलिसांची कारवाई केल्याची बातमीचे वृत्त हटवावे अशी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी धमकी फोनवरुन दोन जणांनी इंडिया आपतक चॅनल जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणार्या संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सर्व पत्रकारांनी सोमवार, २७ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहे. शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाणी अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅ फेत दोन युगल…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । ‘सरकार हरवले आहे’ असं प्रिंट असलेला कुर्ता घालून चाळीसगांव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज सोमवारी विधानभवनात प्रवेश केला, सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेल्या या कुर्त्यावर ‘ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना वीज, पूरग्रस्तांना मदत, mpsc नियुक्त्या, नोकर भरती भ्रष्टाचार व इतर मुद्दे प्रिंट केलेले असून या सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगत हा लक्षवेधी कुर्ता परिधान करण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट केली. मागच्या बाजूला ‘वसुली सरकार धिक्कार असो’ अश्या मोठ्या अक्षरात प्रिंट केलेल्या या कुर्त्यावर पुढच्या बाजूला “शेतकरी वीज मागतोय, MPSC उमेदवार नियुक्ती मागताहेत, बेरोजगार पारदर्शकपणे नोकरी मागताहेत, मराठा आरक्षण मागताहेत, ओबीसी हक्क मागतोय,…
मुंबई, वृत्तसंस्था । भूमि अभिलेख विभागाच्या 1967 च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करुन पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथे नो-डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड आणि एनअे नियमांचे उल्लंघन करुन दुरुस्तीच्या नावाखाली धनाढ्यांनी नवीन बांधकामे केल्याबाबतच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत केला. भूमि अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करुन 830 बंगल्याचे बोगस नकाशे तयार केले. यामधून कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या उप अधीक्षक, भूमी अभिलेख, अनधिकृत बंगल्यांना सोयीसुविधा देणारे मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी…
राळेगणसिद्धी, वृत्तसंस्था । ‘सच की नाव डुबती नही है ।’ देशातील सनदी अधिकाऱ्यांनी ठरवलं हा देश बदलायला वेळ लागणार नाही. कोणत्याही सरकारच्या अधिकारात फक्त बदली करणे आहे आणि अधिकारी बदलीला घाबरतात. अशा वातावरणात चांगले अधिकारी काम करताना दिसतात हा एक आशेचा किरण आहे. हे चित्र पाहिल्याने आपल्याला एक पाऊल पुढं टाकण्याची शक्ती मिळाली आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘जे श्रवण केलंय ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा’ अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांनी केली. राळेगणसिद्धी येथे सुरु असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हजारे पुढे…
भुसावळ प्रतिनिधी । येथील दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नी विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या व्यसनाला आहारी गेलेल्या पतीकडून सतत मारहाण व शिवीगाळ होत असल्याचा त्रासाला कंटाळून पत्नीने दारूड्या पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पत्नीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक केली आहे. गणेश प्रभाकर महाजन (वय-५०, रा. लक्ष्मी नारायण नगर, हनुमार मंदीरामागे, भुसावळ) असे मयत पतीचे नाव असून सीमा गणेश महाजन (वय-४६) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. गणेश महाजन आणि सीमा महाजन हे भुसावळातील लक्ष्मी नारायण…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील मी रूम परिसरातील महादेव मंदिर जवळ असलेल्या घोडा वाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास फोन लावून घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग विझविली. जळगावातील मेहरूण परिसरात असणार्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्नीशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरातील मेहरूण परिसरातील महादेव मंदिराच्या परिसरात असलेल्या गोडाऊनला रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. काही मिनिटांमध्येच आगीचे लोळ उठत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दलास पाचारण केले. महापालिकेच्या फायर फायटर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास प्रारंभ केला. अग्नीशामन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यास प्रारंभ…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येत सुधाकर मोहने यांच्या शेतातून ठिबक फिल्टरच्या जाळ्या, रबर, झाकन, कॉक असे जवळपास ५ ते ६ हजार रुपये किमतीच्या वस्तू दिनांक २४ शुक्रवार रोजी रात्रीला चोरी गेल्या, तसेच पिंपळगाव खुर्द येथील अनिल पाटील यांच्या शेतातून मोटार केबल चोरीला गेली, असून चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येते आहे.
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहुर येथून जवळच असलेल्या शिवचरण सावळे यांच्या शेतामध्ये गटनंबर 597 एक कोल्हा जखमी अवस्थेमध्ये आढळला असता, त्यांनी भ्रमणध्वनीवरून वनपाल प्रशांत पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून प्रशांत पाटील यांनी तातडीने वन कर्मचारी जीवन पाटील, आनंदा ठाकरे, ईश्वर पारधी, रमेश पाटील यांना तात्काळ शेतात जाण्यास सांगितले, त्यानंतर त्यांनी शेतकर्याला फोन करून शेताचे लोकेशन विचारून ते त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना कोल्हा हा जखमी अवस्थेमध्ये दिसला त्यावेळी त्यांनी त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी राठोड पहूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर प्राण्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन या असे सांगितले वनकर्मचारी जीवन पाटील यांनी काही शेतकऱ्यांच्या साह्याने कोल्ह्याला उचलण्याचा प्रयत्न…
यावल, प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आपला मनमानी कारभार करीत असून व्यापाऱ्यांनी आपले अनुज्ञा प्ती व्यापारी लायसेन्स नुतनीकरण ( रिनिव्हल ) करण्यासाठी आतापर्यन्त दोनशे रुपये फि लागत होती तिच फि कृउबा समितीने पाच हजार रुपये केल्याने ती फि व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून संताप व्यक्त करुन नाराजीचे सुर निघत आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमध्ये व्यापारींसह शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाले त्यात नुकतेच निसर्गाच्या लहरीपणा व अवकृपेने अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्याचा परिणाम उत्पादन कमी झाले आहे त्याची झळ व्यापारी वर्गाला बसली आहे…