Author: saimat team

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील ३० तलाठी सजांच्या कार्यालयासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आज तलाठी संघटनेतर्फे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार केला. मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल हा महसूल प्रशासनाचा ग्रामीण भागातील कणा आहे मात्र त्यांनाच काम करण्यासाठी हक्काचे कार्यालय नसल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेसाठीच्या सेवेवर होत असतो. नाईलाजाने तलाठी-मंडळाधिकारी यांना भाडेतत्त्वावर खोलीत अथवा ग्रामपंचायत च्या एखाद्या जुन्या इमारतीत कार्यालय चालवावे लागत आहे पण आता आम्हाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे सुसज्ज तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय मिळत असल्याने तलाठी संघटना चाळीसगाव यांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नुकतेच काही दिवसापूर्वी कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. मराठा सेवा संघ जळगांव जिल्हा व महानगर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच जगातील व भारतातील सर्व शिवप्रेमींच्या मागे मराठा सेवा संघ ठामपणे उभा आहे, असं महानगर अध्यक्ष हिरामणराव चव्हाण यांनी म्हटले आहे. या घटनेतील समाजकंटक व नराधमांना तात्काळ अटक करुन कठोर शासन करावे व अशी निंदनिय घटना भारतात कुठेही पुन्हा घडणार नाही याची खबरदारी प्रत्येक राज्यशासनासह केंद्र सरकारनेही घ्यावी अशी मागणी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । खानदेश सा.प. ला ११ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने काव्य स्पर्धेत कवी गोविंद पाटील यांच्या नशीब या कवितेला रोख पारितोषिक व सन्मान पत्र जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा चाळीसगाव शाखेने आयोजित केली होती. गोविंद पाटील यांना निसर्ग काव्याने जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ जीवनावरील पुस्तक बक्षिस मिळाले आहे. ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात नियंत्रण कवी म्हणून काव्य सादरीकरण केले आहे. आर. डी. कोळी, ज्योती देसाई पुणे शिक्षकांकडून व पाथरी गावातील ग्रामस्थ कौतुकाचा वर्षाव करत केला.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे “झंझावात” हे राज्यव्यापी अधिवेशन ८ आणि ९ जानेवारी २०२२ रोजी नाशिकला होत आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्याला विशेष महत्त्व असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी एकप्रकारे ही पर्वणीच ठरणार आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम कन्व्हेन्शन सेंटर, नानाच्या मळ्याजवळ, पपय्या नर्सरी (सातपूर) येथे होणाऱ्या या मेळाव्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवासेनेचे २००० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या तयारीबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नाशिकला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिरावर मोठी जबाबदारी येणार असून ती पार पाडण्यासाठी ही…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. या निर्बंधांचा उपाहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे. नवे निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. निर्बंधांची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत केली. गेल्या दोन महिन्यांनंतर प्रथमच गेल्या काही दिवसांपासून दररोज…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । श्री माहेश्वरी युवा संघठन, जळगाव शहरतर्फे आयोजित चार दिवसीय स्वर्गीय क्रीडामहर्षी अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक (नाईट क्रिकेट टुर्नामेंट) २०२१-२२ (१७ वे वर्ष) या क्रिकेट स्पर्धेला गुरुवार, दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील शिवतीर्थ तथा जी.एस.ग्राऊंडवर उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. दरम्यान, माजी महापौर व नगरसेवक नितीन लढ्ढा, रोहन बाहेती, अ‍ॅड. नारायण लाठी, योगेश कलंत्री व शाम कोगटा यांच्या हस्ते टुर्नामेंटचे उद्घाटन झाले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या टूर्नामेंटमध्ये २० संघ, २४० खेडाळूंनी भाग घेतला असून एकूण ४० साखळी सामने होणार आहे. ही स्पर्धा रविवार, दि. २६ डिसेंबर २०२१ पर्यंत खेळली जाणार आहे.…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी ” राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई. भंगाळे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. एस. नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ .व्ही .एन महिरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ममताबेन पाटील आणि प्रा. भूपेंद्र बानाईत उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एस.नाडेकर यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन आणि ग्राहक सरंक्षण कायद्याचे महत्व सांगितले. सन १९८६ साली २४…

Read More

यावल, प्रतिनिधी । भालोद सांगवी रस्त्यावर भालोद कडून यावल येथे येणाऱ्या यावल येथील एका व्यापाऱ्याला रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास रस्त्यात अडवून त्याला मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम हिसकावून अज्ञात लुटारू फरार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नेहमीप्रमाणे यावल येथील व्यापारी भालोद येथून आपल्या दुकानातून रोख रक्कम पंधरा ते वीस हजार रुपये यावल येथे घेऊन येत असताना अज्ञात लुटारूंनी भालोद सांगवी रस्त्यावर व्यापाऱ्याची मोटरसायकल अडवून मोटार सायकलची चावी काढून घेऊन चाबी अंधारात फेकून,मोबाईल सुद्धा अंधारात फेकुन दिला व व्यापाऱ्या जवळील रोख रक्कम वीस हजार रुपये घेऊन अज्ञात लुटारूंनी पळ काढला या घटनेमुळे परिसरात मोठी…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । नवीन वर्षाच्या स्वागत साठी मुंबईतील चौपाट्यांवर लोकांची गर्दी होते. तर अनेक सार्वजनिक ठिकाणी आतिषबाजी केली जाते. मात्र ओमायक्रॉनमुळे आता यावर बंदी लावण्यात आली आहे . मुंबईत कोरोनाची होणारी रुग्ण वाढ पाहता राज्य सरकारने ही निर्बंध लावली आहेत . मुंबईत रात्री च्या वेळी 144 लागू करण्यात आला असून मागील दोन वर्षा नंतर या वर्षी जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागत करण्याचा विचार करणाऱ्याच्या स्वप्नांनवर यामुळे पाणी फिरणार आहे

Read More