Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»लोण पिराचे येथे ताजिया मिरवणुक मोठया उस्तवात साजरी (व्हिडिओ)
    भडगाव

    लोण पिराचे येथे ताजिया मिरवणुक मोठया उस्तवात साजरी (व्हिडिओ)

    SaimatBy SaimatAugust 9, 2022Updated:August 9, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी 

    येथुन जवळच असलेल्या लोण पिराचे येथे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर मोहरम च्या दिवशी दि.९ रोजी ताजिया मिरवणुक मोठया उस्तवात संपन्न करण्यात आली ताजिया मिरवणुक व विसर्जन मध्ये लोणसह परीसरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते हिंदु
    मुस्लीम बांधवांनी दर्शना साठी गर्दी केल्याने सर्वधर्म समभाग चा प्रत्यय येथे येत होता.

    हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणुन लोण पिराचे येथील दर्गा प्रसिध्द आहे हिंदु मुस्लीम एकत्र येत येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करतात मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे सारे धार्मिक कार्यक्रम बंद होती दोन वर्षांच्या ब्रेक नंतर मोहरम च्या दिवशी दि.९ रोजी ताजिया मिरवणुक काढण्यात आली यात लोण पिराचे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
    ताजिया या कार्यक्रमासाठी कजगाव, बोदर्डे,कनाशी, बोरनार, घुसर्डी व लोण पिराचे या सर्व गावात हिंदु व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पुर्ण गावात फिरून (खिचडा)अन्न धान्य व रोख स्वरूपात आलेल्या वर्गणीतून (खिचडा मधुन) दर्गाच्या प्रांगणात भाजी भाकर बनवत महाप्रसादाचे आयोजन येथे करण्यात येते प्रसंगी लोण पिराचे पंचक्रोशीतील नागरिक सह गावातील नागरिक जे बाहेर गावी उद्योग व्यवसाय नोकरी निम्मित स्थायिक झाले आहेत ते देखील या महाप्रसाद व ताजिया मिरवणुकीत सहभागी होतात दोन वर्षांच्या ब्रेक नंतर संपन्न झालेल्या ताजिया मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

    ताजिया ची गावातून मिरवणुक काढण्यात आली प्रसंगी मिरवणुकी नंतर दर्ग्यावर चादर चढविण्यात आली तेथुन ताजिया घुसर्डी येथे नेण्यात आले तेथील मिरवणुकी नंतर गिरणा नदीत ताजिया चे विसर्जन करण्यात आले प्रसंगी भाविकांनी मोठी गर्दि केली होती लोण पिराचे येथील ताजिया मिरवणुकी नंतर लोण पिराचे येथील रहिवाशी फिरोज पिंजारी यांचे तर्फे नागरिकांना शरबत वाटप करण्यात आले तर कजगाव येथील डॉ.सुधीर देसले मुळचे लोण पिराचे येथील रहिवासी यांनी भाविक भक्तांना महाप्रसाद म्हणुन गोड भात चे आयोजन केले होते.

    लोण पिराचे येथे चारशे वर्षा पूर्वीचा दर्गा आहे या गावात केवळ पिंजारी समाजाचे एक घर आहे या दर्ग्याची पुजा देखभाल हे सारे पिढ्यानपिढ्या पासुन पाटील परिवार पहात आहे आजहि पाटील परीवार हे दर्ग्याची पुजा अर्चा सह देखभाल करत आहे गावात मुस्लीम समाज नाहि समाज बांधवा सह अठरा पगड जातीच्या ग्रामस्था कडुन ताजिया मिरवणुक व यात्रोत्सव साजरा करण्यात येतो त्यातुन सर्वधर्म समभावाचे दर्शन घडवले जाते गावातील ग्रामस्थांनी मुस्लीम धर्माचा केलेला आदर उल्लेखनीय आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025

    Bhadgaon : अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.