Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे ‘आशा डे’ उत्साहात साजरा
    पाचोरा

    पाचोऱ्यात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे ‘आशा डे’ उत्साहात साजरा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे ‘आशा डे’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ.भूषण अहिरे, श्रीमती डॉ. स्नेहल शेलार (प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी), मंगेश देवरे (मुख्याधिकारी न.पा.पाचोरा), श्री. कुंभार (नायब तहसीलदार), सिद्धीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. ग्रिष्मा पाटील, जीजा राठोड (प्रभारी एकात्मिक बालविकास अधिकारी), समाधान पाटील (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पाचोरा) उपस्थित होते. सुरुवातीला धन्वंतरी पूजनानंतर मंगला पाटील आणि वंदना बडगुजर यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा गौरव केला.

    प्रास्ताविकात पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी आशा स्वयंसेविका यांच्यामुळेच राज्यातील माता मृत्यू, अर्भक मृत्यूत घट झालेली आहे. त्यांनी संस्थात्मक प्रसूतीत अजून वाढ घडवून आणण्याचे आवाहन केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात मनीषा कोळी, भागीरथी पाटील, रोहिणी वाघ या आशा स्वयंसेविका आणि मीनाक्षी पाटील (गटप्रवर्तक) यांनी मनोगत व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमात शीला उबाळे, संगीता धनगर, रत्ना बोरसे, अनिता सोनवणे यांनी सहभाग नोंदविला.

    यावेळी सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून रंजना गुलाब पाटील (प्रथम क्रमांक), मनीषा गोविंदा वाणी (द्वितीय), सुरेखा नरेश चौधरी (तृतीय), कल्पना मनोज पाटील (शहरी भाग प्रथम) यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शासकीय संस्थेत सर्वात जास्त प्रसूती करणाऱ्या रंजना पाटील (प्रथम क्रमांक), शोभा पाटील (द्वितीय), शाहीन सय्यद (तृतीय) तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका रंजना पाटील आणि वंदना संत यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात मनीषा वाणी (प्रथम क्रमांक), वृषाली येवले (द्वितीय), संगीता पाटील आणि रेखा पाटील (उत्तेजनार्थ) यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी चित्रा अशोक तावडे (गट प्रवर्तक) यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका पुष्पलता मनोज कुमावत, साधना विजयसिंह पाटील, उज्ज्वला नेताजी पाटील, निर्मला प्रकाश पाटील, भिकुबाई भीमराव पाटील, रेखा गणेश पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

    यांचे लाभले सहकार्य

    यावेळी सिध्दीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.स्वप्निल पाटील यांच्यामार्फत उत्कृष्ट कामाबद्दल आशा स्वयंसेविका यांना आकर्षक बक्षीसाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी हरी शिरसाठ (तालुका समूह संघटक), जगन पाटील, प्रल्हाद दामोदरे, हर्षल पाठक, विजय सभादिंडे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026

     Pachora Veruli Budruk:वेरुळी बुद्रुकमध्ये हळहळजनक घटना

    January 6, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.