Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»Appointment Of 40 Candidates : नाशिक जि.प.मध्ये अनुकंपा तत्त्वावर ४० उमेदवारांची नियुक्ती
    नाशिक

    Appointment Of 40 Candidates : नाशिक जि.प.मध्ये अनुकंपा तत्त्वावर ४० उमेदवारांची नियुक्ती

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 22, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जि.प.च्या सभागृहात पार पडली समुपदेशन प्रक्रिया

    साईमत/नाशिक/प्रतिनिधी :

    जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीत प्रतिक्षेत असलेल्या ३४ उमेदवारांना गट ‘ड’ संवर्गात तर सध्या अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील पात्र ६ कर्मचाऱ्यांना गट ‘क’ मधील पदावर अशा ४० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. अनुकंपा तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.

    राज्य शासनाच्या धोरणानुसार, जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असताना मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली जाते. मृत्यू पश्चात १ वर्षाच्या आत संबधित कार्यालयामार्फत प्रस्ताव सादर करून वारसाचा समावेश ज्येष्ठता यादीत केला जातो. उपलब्ध रिक्त पदांपैकी १० टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरली जातात. शैक्षणिक पात्रतेनुसार गट ‘क’ मधील पद रिक्त नसेल तर संबंधित उमेदवाराला गट ‘ड’ मधील पदावर नियुक्ती दिली जाते. त्यानंतर पद उपलब्ध झाल्यास गट ‘क’ पदावर पदोन्नतीही केली जाते.

    पात्र ३४ उमेदवारांची समुपदेशन पद्धतीने नियुक्ती

    नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘ड’ संवर्गातील ४८ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. त्यातील पात्र ३४ उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्यात आली. उर्वरित उमेदवारांना पुढील रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार संधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गट ‘ड’ मधील पात्र ६ कर्मचाऱ्यांना गट ‘क’ मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. ४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक (लेखा), एका कर्मचाऱ्यास वरिष्ठ सहायक (लेखा) तर एका कर्मचाऱ्यास पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यशस्वीतेसाठी सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र येवला, वरिष्ठ सहाय्यक शितल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Jalgaon : मालेगावजवळ माजी महापौर जयश्री महाजन यांच्या कारचा भीषण अपघात

    January 22, 2026

    SaiBaba Mandir donations : “फक्त ९ दिवसांत साईबाबा संस्थानला २३ कोटींच्या देणगीचा नवा विक्रम!”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.