पाचोरा महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

0
35

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच उत्साहात पार पडले. उद्घाटक म्हणून योगेश गणगे होते. अध्यक्षस्थानी प्रा.सुभाष पोतला (चेअरमन, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती, पाचोरा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संचालक खलील देशमुख, संचालक दुष्यंत रावल उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. त्यात गीत गायन स्पर्धा, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, नाटीका, मिमिक्री, फॅन्सी ड्रेस यासारखे कलाप्रकार सादर करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव मतदार संघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अहमदनगरचे डॉ. संजय कळमकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा, असे आवाहन केले. आपले आदर्श चित्रपटातील नट, नटी न ठेवता आई-वडिलांना आदर्श माना, असे प्रतिपादनही त्यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात क्रीडा स्पर्धेत पारितोषिके मिळविली. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करुन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही. टी.जोशी, प्रा.सुभाष तोतला, गो.से हायस्कुलचे चेअरमन खलील देशमुख, दगाजी वाघ, सतीश चौधरी, प्रकाश पाटील, योगेश पाटील, पाचोरा पोलीस स्टेशनचे धरमसिंह सुंदरडे, रंगराव पाटील, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, माजी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील, डॉ.एस.एम.पाटील, उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा. जी.बी.पाटील, पर्यवेक्षक प्रा.साहेबराव पाटील, प्रा.राजेश मांडोळे, प्रा. डॉ.श्रावण तडवी, डॉ. जे.पी.बडगुजर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, सूत्रसंचालन प्रा.डॉ.माणिक पाटील, प्रा.वैशाली बोरकर, डॉ.अतुल सूर्यवंशी, प्रा.डॉ. सुनीता गुंजाळ तर आभार डॉ.जितेंद्र बडगुजर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here