Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»सात तालुक्यात जनावरांचे आठवडा बाजार बंद
    कृषी

    सात तालुक्यात जनावरांचे आठवडा बाजार बंद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर आणि धरणगाव अशा ७ तालुक्यातील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये सांसर्गिक लम्पी आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या तालुक्यातील सर्व जनावरांचा आठवडे बाजार हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. या तालुक्यातील जनावरे लम्पी साथ रोगाने बाधीत जनावरे आढळून आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर भागातील निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रोग विषाणुजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये. म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणण्यासाठी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जनावरांची खरेदी विक्रीसाठी ७ तालुक्यातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद राहणार आहेत.

    जिल्ह्यात इतर राज्यामधून आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतरतालुका पशुधनाची होणारी वाहतुक बंद ठेवण्यात यावी. त्याकरिता जिल्हा पोलिस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी आंतरराज्य सीमेवरील चेक नाक्यावर कसून तपासणी करावी. ज्या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून २८ दिवस पूर्ण झालेले आहे त्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्यास वाहतुकीस परवानगी असेल.

    जिल्ह्यातील ७ बाधीत तालुक्यात पशुधन एकत्र येतील, असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक गुरांसाठीचे पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद पुढील १५ दिवस बंद ठेवण्यात यावे. रोगाचा प्रसार बाह्य किटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड, इत्यादी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्य किटकांच्या निर्मुलनासाठी ग्रामपंचायतीनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करावी. बाधित परिसरात गोठा स्वच्छता तसे निवारणी करावी. ग्रामपंचायतीनी पशुधन मृत झाल्यास त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी ४ बाय ८ फुट आकाराचे खड्डे करण्याची व्यवस्था करावी. व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर शक्य नसल्यास गटविकास अधिकारी यांच्यामार्फत बांधकाम विभाग पंचायत समिती किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे करण्याची व्यवस्था करावी. पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पध्दतीने मृत पशुधनाची विल्हेवाट लावावी. सर्व खासगी पदविकाधारक यांनी पशुपालकांनी लम्पी आजाराची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे.

    परस्पर उपचार केल्यास कायदेशिर कार्यवाही

    लम्पी आजाराच्या पशुधनाचे उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसारच करण्यात यावे. खासगी पदविकाधारक यांनी परस्पर उपचार केल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करून उपलब्ध करुन घेण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशात नमूद केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.