साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील काही तरूण मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन गरीब आणि गरजू लोकांना ‘दारुल कजा’ नावाने ‘अनाज बँक’ योजना सुरू केली आहे. अनाज बँकेमार्फत गरीब आणि गरजू परिवाराला ८ किलो गहू, ५ किलो तांदूळ, २ किलो गोडेतेल, २ किलो साखर, डाळी, कपडे धुण्याचे साबण, आंघोळीचे साबण हे सगळे झोपडपट्टी परिसरात जाऊन आपले कार्य करीत आहेत. जी मुले शाळेत जात नाहीत त्यांच्यासाठी शिक्षण घ्यावे. यासाठीही संस्था-कार्यरत आहे. संस्थेमार्फत हिंदु-मुस्लिम असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. चाळीसगाव शहरातील तरूण विद्यार्थी तसेच काही व्यापारी, काझी परिवार तसेच समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ति संघटनेची टिम कार्य करीत आहे.
शहरात गेल्या ७ वर्षापासून ‘दारुल कजा’ काम करीत आहे. संघटनेची स्थापना केली आहे. ‘दारुल कजा’ ही संघटना हे अन्नधान्य महिन्याच्या शेवटी चार-पाच दिवस वाटप करते. कार्यक्रमाचा कुठलाही सोशल मीडियाद्वारे प्रचार, प्रसार केला जात नाही किंवा जाहिरातही केली जात नाही. त्यामुळे शहरात उत्तम प्रकारे संघटना कार्य करीत आहे. ‘दारुल कजा’ संघटनेसाठी नाझीमोद्दीन काजी, अदील चउस, पत्रकार मुराद पटेल, पत्रकार गफ्फार मलिक रफीक शेठ, फिरोज हाजी, जुबेर मुबंया, आसीफ मनसे, रिजवान शेख, वसीम बागवान, वसीम टेलर आदी काम करीत आहेत.